कार खरेदी करणे ही निश्चितच जबाबदारीची बाब आहे. मात्र, प्रत्येक व्यक्ती तितक्या गांभीर्याने पाहत नाही.. तथापि, प्रत्येकाने आकस्मिक परिस्थिला सामोरे जाण्यासाठी निश्चितच तयार असायला हवे. म्हणून, तुमच्या मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करण्यासाठी आणि स्वत:ला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही कार इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करावी. इन्श्युरन्स क्लेम नाकारल्याबद्दल बऱ्याच अफवांची चर्चा सुरू असते आणि त्यामुळे इन्श्युरन्स खरेदी करण्याबद्दल लोकांमध्ये नेहमीच उत्साहाचा अभाव जाणवतो. क्लेम नाकारण्याच्या मागील वास्तविक कारणांच्या बाबत त्यांना पूर्ण माहिती असते असे नसतेच.. तुमच्या कार इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये निर्धारित अटी व शर्ती पूर्ण न झाल्यासच तुमचा क्लेम नाकारला जाण्याची शक्यता आहे. म्हणूनच, पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला पॉलिसी डॉक्युमेंट्सचा काळजीपूर्वक अभ्यास करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. या प्रकारे, तुम्ही तुमच्या गरजांची पूर्तता करणारा प्लॅन खरेदी करू शकता. जेव्हा तुम्ही खरेदी कराल तेव्हा तुम्ही तुमच्या पॉलिसीचे सर्व तपशील त्वरित ॲक्सेस करू शकता
ऑनलाईन कार इन्श्युरन्स . नंतर, आवश्यक असल्यास, तुम्ही क्लेम करू शकता जे तुमच्या क्लेम मंजुरीची शक्यता वाढविण्यासाठी इन्श्युररच्या अटी व शर्तींचा विचार करते. तुम्ही तुमचे पॉलिसी डॉक्युमेंट्स ऑनलाईन तसेच ऑफलाईन वाचू शकता. ऑनलाईन तपासण्यासाठी, तुम्ही इन्श्युरन्स कंपनीच्या वेबसाईटला भेट देऊ शकता जिथे तुम्ही इतर प्रॉडक्टशी संबंधित पूर्ण माहिती देखील शोधू शकता. अन्यथा, तुम्ही तुमच्या पसंतीच्या इन्श्युरन्स कंपनीच्या शाखा कार्यालयाला भेट देऊ शकता. खाली दिलेले 5 आवश्यक सेक्शन आहेत. जे तुम्ही तुमच्या सर्वसमावेशक कार इन्श्युरन्स पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये वाचणे आवश्यक आहे.
सर्वसमावेशक कार इन्श्युरन्स पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये समजून घेण्यासाठी 5 प्रमुख घटक
1. अनिवार्य थर्ड-पार्टी दायित्व घटक
मोटर व्हेईकल्स ॲक्ट 1988 नुसार, रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक कारला अनिवार्य असेल किमान
3rd पार्टी कार इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत इन्श्युअर्ड करा. हा प्लॅन तुम्हाला तुमच्या इन्श्युअर्ड वाहनाद्वारे थर्ड पार्टीला झालेल्या मालमत्तेला किंवा दुखापतीला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आर्थिक संरक्षण प्रदान करतो. तुमच्या पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये ऑफर केलेल्या कव्हरेजच्या समावेश आणि अपवादांविषयी सर्व माहिती समाविष्ट आहे.
2. कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर
A
सर्वसमावेशक कार इन्श्युरन्स प्लॅन केवळ थर्ड-पार्टीला झालेले नुकसान कव्हर करत नाही, तर तुमच्या इन्श्युअर्ड वाहनाला झालेले नुकसान देखील कव्हर करते. या सेक्शनमध्ये 'स्वत:चे नुकसान' संबंधित तपशील समाविष्ट आहे आणि सामान्यपणे 'इन्श्युअर्ड वाहनाचे नुकसान किंवा हानी' अंतर्गत नमूद केले आहे. क्लेम करताना नेहमी लक्षात ठेवा की समावेश यादी पाहायला विसरु नका. जेणेकरुन तुमच्या कारला झालेल्या नुकसानीचे कारण यादीत नमूद आहे किंवा नाही हे समजेल.. जर पॉलिसीमध्ये इव्हेंट नमूद केलेला नसेल किंवा अपवादांचा भाग असेल तर इन्श्युरन्स कंपनी तुमचा क्लेम नाकारण्याची शक्यता आहे.
3. मालक/चालकासाठी वैयक्तिक अपघात कव्हरेज
क्लेम रक्कम तसेच पॉलिसी अंतर्गत कव्हर्ड दुखापती यांच्याविषयी असलेला कोणताही गोंधळ दूर करण्याची संधी तुम्हाला या सेक्शनच्या माध्यमातून मिळेल.. तुम्हाला नुकसानभरपाईच्या संबंधित प्रमाणासह दुखापतीचे स्वरूप स्पष्ट करणारे तपशील देखील प्राप्त होतात.
4. समावेश आणि अपवाद
तुम्ही तुमच्या पॉलिसी डॉक्युमेंट्स वरील दुर्लक्ष करू न शकणारा महत्वाचा घटक म्हणजे समावेश आणि अपवाद यांची यादी होय. या यादीवर नजर टाका आणि तुमच्या इन्श्युरन्स प्रोव्हायडर द्वारे कोणत्या प्रकारचे संरक्षण प्रदान केले जाते याबाबत स्पष्टता मिळवा. तुम्हाला क्लेम दाखल करताना ही माहिती तुमच्याकडे असावी. जर तुम्हाला वाटत असेल की अनेक अपवाद आहेत आणि मूलभूत गोष्टी कव्हर होत नाहीत तर केवळ तुमचा इन्श्युरन्स प्रोव्हायडर बदला.
5. अटी व शर्ती
शेवटी, अटी व शर्ती काळजीपूर्वक पाहा. ही अशी गोष्ट आहे जी बहुतांश लोक दुर्लक्ष करतात. जेव्हा क्लेम दाखल करण्याची वेळ येते तेव्हा प्लॅन खरेदी करताना अटी व शर्ती समजून घेणे खूपच उपयुक्त ठरू शकते. काही इन्श्युरन्स कंपन्यांची क्लेम दाखल करण्याची प्रक्रिया ही अत्यंत किचकट स्वरुपाची असू शकते. काळजीपूर्वक निवड करा आणि सुलभ क्लेम प्रक्रिया असलेल्या कंपनीची निवड करा.
अंतिम विचार
कार इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही प्रीमियम आणि कव्हरेजसह सर्व तपशील ऑनलाईन तुलना करू शकता. आता, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एजंट किंवा मध्यस्थांवर आधारित काळजी करण्याची गरज नाही. ऑनलाईन पॉलिसी खरेदी करण्यासाठी तुम्हाला 10 मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागणार नाही. त्यामुळे, तुम्ही कदाचित शोधात असाल
तरुण चालकांसाठी कार इन्श्युरन्स किंवा अनुभवी रायडर, तुम्हाला प्लॅन खरेदी करण्यापूर्वी कलम काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे आणि त्याबद्दल पूर्ण समज असणे आवश्यक आहे.
प्रत्युत्तर द्या