Loader
Loader

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

आरोग्य संजीवनी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी

हॉस्पीटलायझेशनच्या आर्थिक तणावापासून संरक्षण

आपल्या व आपल्या प्रियजनांसाठी हॉस्पीटलायझेशन केअर
Arogya Sanjeevani Standard Health Insurance Policy by Bajaj Allianz

आपल्या व आपल्या प्रियजनांसाठी सर्वसमावेशक लाभ परवडणाऱ्या किमतीमध्ये

तुमच्यासाठी यामध्ये काय आहे?

 हेल्थ प्राईम रायडरसह 09 प्लॅन्स/पर्याय कव्हर करा

₹ 5 लाख पर्यंत सम इन्श्युर्ड पर्याय

आयुष उपचारांसाठी कव्हरेज

प्रीमियम भरण्यासाठी हप्त्यांची सोय

आरोग्य संजीवनी इन्श्युरन्स पॉलिसी काय आहे?

आपल्यासाठी मौल्यवान असणाऱ्याची काळजी घेणे ही एक नैसर्गिक भावना आहे.. आणि आम्हाला माहित आहे की आपले आरोग्यच आपल्यासाठी सर्वात जास्त मौल्यवान आहे.आपण जर तंदुरुस्त असाल, तर आपण जगही जिंकू शकता. मात्र, आपल्या आरोग्याची परिपूर्ण काळजी घ्यायची असेल, तर आपल्याला योग्य त्या आर्थिक आधाराची आवश्यकता असते. विशेषतः जेव्हा एखादे गंभीर आजारपण किंवा अपघात यासारख्या परिस्थितीत जेव्हा तातडीने मदत लागते, तेव्हा अशा आर्थिक आधाराची अधिक तीव्रतेने आवश्यकता भासते.

बजाज आलियान्झची आरोग्य संजीवनी पॉलिसी हेल्थ इन्श्युरन्स तुम्हाला फायनान्शियल सपोर्ट प्रदान करेल आणि हॉस्पिटलायझेशन वेळी तुमच्यावर निर्माण होणाऱ्या आर्थिक भारापासून तुम्हाला संरक्षित करेल. आरोग्य संजीवनी हेल्थ इन्श्युरन्स सह तुमच्या सेव्हिंग्स वर ताण निर्माण होण्याच्या चिंतेपासून दूर राहाल आणि मेडिकल आपत्कालीन स्थितीला योग्य प्रकारे सामोरे जाल.

आरोग्य संजीवनी पॉलिसी आपल्या पाठीशी असताना प्रकृतीत बिघाड झाल्यावर आपल्याला औषधोपचारांसाठी लागणाऱ्या पैशांची चिंता करण्याची गरजच भासणार नाही.

आरोग्य संजीवनीचे लाभ/ वैशिष्ट्ये

बजाज आलियान्झ हेल्थ इन्श्युरन्सची आरोग्य संजीवनी पॉलिसी तुम्हाला ती आर्थिक सहाय्य मिळवण्यास आणि हॉस्पिटलायझेशनच्या वेळी तुम्हाला आर्थिक बोजापासून संरक्षित करण्यास मदत करेल. सह आरोग्य संजीवनी हेल्थ इन्श्युरन्स, तुम्ही तुमची सेव्हिंग्स संपण्याविषयी चिंता करणे थांबवू शकता आणि कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करू शकता.

  • Extensive Coverage एक्सटेन्सिव्ह कव्हरेज

    आरोग्य संजीवनी हेल्थ इन्श्युरन्स आपल्याला या बाबतीत कव्हर पुरवते*:

    a) हॉस्पिटलायझेशन:
    ✓ खोलीचे भाडे, बोर्डिंग, नर्सिंगचा खर्च
    ✓ अतिदक्षता विभाग (ICU)/हृदयरोग अतिदक्षता विभाग (ICCU)
    ✓ रुग्णवाहिका कव्हर

    b) सूचित समाविष्ट आधुनिक उपचार पद्धती

    c) ऑल डे केअर ट्रीटमेंट

    d)  आयुष ट्रीटमेंट: आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी पद्धतींच्या औषधोपचारांसाठी प्रत्येक पॉलिसी वर्षात कोणत्याही आयुष हॉस्पिटलमध्ये पॉलिसी शेड्यूलमध्ये नमूद केल्याप्रमाणे सम इन्श्युअर्ड मर्यादेपर्यंत वैद्यकीय खर्च.

    ई)  मोतीबिंदू उपचार: मोतीबिंदूच्या उपचारांसाठी झालेला वैद्यकीय खर्च

    *मर्यादाधीन

  • Medical Procedures Covered वैद्यकीय प्रक्रिया कव्हर्ड

    आरोग्य संजीवनी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी हॉस्पिटलमधील इन-पेशंट किंवा डे केअरमध्ये समाविष्ट होणाऱ्या पुढील प्रक्रिया कव्हर करते*:

    a) युटेराईन आर्टरी इम्बोलायझेशन आणि एच आय एफ यु (हाय इंटेन्सिटी फोकस्ड अल्ट्रासाउंड)

    b) बलून सिनुप्लास्टी

    c) डीप ब्रेन स्टीम्युलेशन

    d) ओरल केमोथेरपी

    e) इम्युनोथेरपी - इंजेक्शनमधून दिली जाणारी मोनोक्लोनल अँटीबॉडी

    f) इंट्रा व्हायट्रीयल इंजेक्शन्स

    g) रोबोटिक सर्जरी

    h) स्टीरियोटॅक्टिक रेडीओ सर्जरी

    i) ब्रोंकायकल थर्मोप्लास्टी

    j) वेपरायझेशन ऑफ द प्रोस्ट्रेट (ग्रीन लेझर ट्रीटमेंट किंवा होल्मियम लेझर ट्रीटमेंट)

    k) आय ओ एन एम – (इंट्रा ओपरेटीव्ह न्युरो मॉनिटरिंग)

    l) स्टेम सेल थेरपी: हिमाटोलॉजिकल कंडीशनसाठी केल्या जाणाऱ्या बॉन मॅरो ट्रांसप्लांटसाठी हेमाटोप्योटीक स्टेम सेल्स कव्हर केल्या जाईल.

    *मर्यादाधीन

  • Policy Type पॉलिसी टर्म

    आरोग्य संजीवनी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी दोन प्रकारच्या आहेत. दोन्ही पॉलिसी एकेक वर्षाच्या आहेत:

    a) आरोग्य संजीवनी पॉलिसी, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी – इंडीव्हिजुअल

    b) आरोग्य संजीवनी पॉलिसी, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी – इंडीव्हिजुअल – फॅमिली फ्लोटर

  • Premium Payment in Instalment हप्त्यांमध्ये प्रीमियम पेमेंट

    प्रीमियमचे पेमेंट आपण एकाच वेळी किंवा सहा महिने, तीन महिने किंवा प्रतिमास अशा हप्त्याने भरू शकता.

  • Annual Policy वार्षिक पॉलिसी

    आरोग्य संजीवनी हेल्थ इन्श्युरन्सद्वारे आपल्या व आपल्या संपूर्ण कुटुंबाला एक वर्षापर्यंत कव्हर मिळेल.

  • Lifetime Renewal लाईफटाईम रिन्युअल

    आरोग्य संजीवनी पॉलिसीमध्ये लाईफटाईम रिन्युअलचे लाभदेखील समाविष्ट आहेत.

  • Discounts डिस्काउंट

    फॅमिली डिस्काउंट: एकाच पॉलिसीद्वारे नियमात बसणाऱ्या एकाच कुटुंबातील 2 सदस्यांना कव्हर पुरवायचा असल्यास 10% सूट देण्यात येईल तसेच एकाच पॉलिसीद्वारे नियमात बसणाऱ्या एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक सदस्यांना कव्हर पुरवायचा असल्यास 15% सूट देण्यात येईल या सवलती नवीन पॉलिसी आणि रिन्युअल पॉलिसी या दोन्ही प्रकारच्या पॉलिसीसाठी लागू आहेत.

    ऑनलाईन/डायरेक्ट बिझनेस डिस्काउंट: थेट/ऑनलाइन चॅनेलद्वारे विहित केलेल्या धोरणांसाठी या प्रॉडक्ट साठी 5% सूट दिली जाईल.

    सूचना: ही सवलत एम्प्लॉइ डिस्काउंट मिळणाऱ्या नोकरदारांना लागू होणार नाही

आरोग्य संजीवनी हेल्थ इन्श्युरन्स

सुलभ, त्रासमुक्त आणि त्वरित क्लेम सेटलमेंट

कॅशलेस क्लेम प्रोसेस (केवळ नेटवर्क हॉस्पिटलमधील उपचारांसाठीच उपलब्ध):

नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा वर्षभर 24x7 व अखंडित स्वरूपात उपलब्ध आहे. उपरोक्त कॅशलेस सुविधा ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे, अशा सर्व प्रकारच्या हॉस्पिटलची यादी दिलेली आहे व यामध्ये पूर्वसूचनेशिवाय बदल करण्याचे अधिकार कंपनीच्या स्वाधीन आहेत. रुग्णालयात भर्ती होण्यापूर्वी ही यादी तपासून घ्यावी. अद्ययावत यादी आमच्या वेबसाईटवर तसेच कॉल सेंटरवर उपलब्ध आहे.. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शासनप्रमाणित ओळखपत्र व बजाज आलियान्झ हेल्थ कार्ड अनिवार्य आहे.

जेव्हा आपल्याला कॅशलेस क्लेम सुविधेचा पर्याय निवडायचा असेल, तेव्हा खालील पायऱ्यांनुसार कार्यवाही करावी:

  • प्री-ऑथोरायझेशन रिक्वेस्ट फॉर्म भरा आणि उपचार करणाऱ्या डॉक्टर किंवा हॉस्पिटलकडून तसेच रुग्ण अथवा सदस्याने त्यावर स्वाक्षरी करावी.
  • नेटवर्क हॉस्पिटल हा रिक्वेस्ट फॉर्म हेल्थ अॅडमिनीस्ट्रेशन टीमला (HAT) फॅक्स करेल.
  • HAT डॉक्टर्स हा प्री-ऑथोरायझेशन रिक्वेस्ट फॉर्म तपासून पॉलिसीमधील नियम व अटींची पडताळणी करून कॅशलेस सुविधेच्या उपलब्धतेविषयी निर्णय घेतील.
  • प्लॅन व त्यातील लाभांनुसार ऑथोरायझेशन लेटर (AL)/ डीनायल लेटर / अॅडीशनल रिक्वायरमेंट लेटर 3 तासाच्या आत जारी करण्यात येईल.
  • डिस्चार्जच्या वेळी हॉस्पिटल आपले एकूण बिल आणि डिस्चार्जचे तपशील HAT ला अदा करेल आणि त्याची तपासणी केल्यानंतर फायनल सेटलमेंट प्रक्रिया पूर्ण केली जाईल. इन्शुअर केलेल्या व्यक्तीने त्याची पडताळणी करणे व डिस्चार्जच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करणे तसेच अवैद्यकीय खर्च तसेच पॉलिसी अपात्र खर्च यांची पूर्तता करणे बंधनकारक राहील.

महत्त्वाचे मुद्दे

  • पूर्वनियोजित भरतीसाठी आपली हॉस्पिटलमधील जागा नेटवर्क हॉस्पिटलच्या प्रक्रियेप्रमाणे रजिस्टर किंवा राखीव करून ठेवा.
  • खाटेच्या उपलब्धतेनुसार प्रवेश दिला जाईल.
  • कॅशलेस सुविधा ही आपल्या पॉलिसीच्या नियम व अटींच्या अधीन असेल.
  • पॉलिसी पुढील बाबी कव्हर करत नाही:
    • टेलीफोन
    • नातेवाईकांसाठी मागवलेले खाद्यपदार्थ व पेये
    • टॉयलेट्रीज

    उपरोक्त बाबींचा खर्च आपणच करावयाचा आहे व तो डिस्चार्जपूर्वी संबंधित रुग्णालयास द्यावयाचा आहे.

  • खोलीचे भाडे व नर्सिंगचा खर्च समाविष्ट आहे. जर आपण अधिक किमतीची खोली निवडली असेल, तर अतिरिक्त खर्च आपल्याला करावा लागेल.
  • जर आपले उपचार आपल्या पॉलिसीमध्ये कव्हर केले जात नसतील, तर कॅशलेस अथवा रिएम्बर्समेंट या कोणत्याही स्वरूपातील क्लेम नाकारले जातील.
  • पुरेशा वैद्यकीय माहितीअभावी कॅशलेस क्लेमचे प्री – ऑथोरायझेशन नाकारले जाऊ शकते.
  • कॅशलेस सुविधा नाकारली तरीही त्यामुळे आपल्या वैद्यकीय उपचार अथवा निगराणी यावर कोणताही परिणाम होत नाही.

प्री/पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्चाचे रिइम्बर्समेंट

पॉलिसी अनुसार रुग्णालयात भर्तीपूर्वी अथवा डिस्चार्जनंतर करण्यात आलेल्या संबंधित वैद्यकीय खर्चाची परतफेड केली जाईल. यासाठी सही केलेल्या क्लेम फॉर्मसहित प्रिस्क्रिप्शन तसेच बिल अथवा पावती बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्सकडे सुपूर्त करणे अनिवार्य आहे.

आरोग्य संजीवनी इन्श्युरन्स क्लेम प्रोसेस

हॉस्पिटलायझेशन संदर्भात बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्सच्या HAT ला माहिती द्यावी.

आपलाहेल्थ इन्श्युरन्स क्लेम ऑनलाईन नोंदवा.

आपला क्लेम ऑफलाइन नोंदविण्यासाठी, आमच्या टोल-फ्री क्रमांकावर आम्हाला कॉल करा: 1800-209-5858.

रिएम्बर्समेंट साठी इन्शुअर्ड व्यक्तीने सर्व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या वेळेच्या मर्यादेत खालील पद्धतीने हेल्थ अडमिनिस्ट्रशन टीम (HAT) कडे सुपूर्त करावीत:

क्लेमचे प्रकार दिलेली वेळेची मर्यादा
हॉस्पिटलायझेशन, डे केअर व प्री-हॉस्पिटलायझेशनचे खर्च हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत
पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्चाचे रिएम्बर्समेंट पोस्ट हॉस्पिटलायझेशन उपचार पूर्ण झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत

रिएम्बर्समेंट क्लेमसाठी आवश्यक कागदपत्रे:

  • पूर्ण भरलेला क्लेम फॉर्म
  • रुग्णाचा ओळखपत्र पुरावा
  • वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचे प्रवेशाचा सल्ला देणारे प्रिस्क्रिप्शन.
  • मूळ बिले वस्तू निहाय ब्रेक-अप सह
  • पैसे भरल्याच्या पावत्या
  • इतर तपशीलांसोबत रुग्णाच्या संपूर्ण वैद्यकीय इतिहासासह डिस्चार्ज सारांश
  • तपासणी / डायग्नोस्टिक चाचणी अहवाल इ. वैद्यकीय व्यावसायिकाकडे उपस्थित राहण्यापासून दिलेल्या प्रिस्क्रिप्शनद्वारे समर्थित
  • जेथे लागू असेल तेथे, ओटी नोट्स किंवा केलेल्या ऑपरेशनचा तपशील देणारे सर्जनचे सर्टिफिकेट
  • जेथे जेथे लागू असेल तेथे, इम्प्लांट्सचे स्टिकर / बील.
  • एमएलआर (मेडिको लिगल रिपोर्ट) ची प्रत - केली असल्यास आणि लागू असल्यास एफआयआर (प्रथम माहिती अहवाल) नोंदविला असल्यास.
  • NEFT तपशील (क्लेम रक्कम थेट बँक खात्यात जमा करणे सुरु करण्यासाठी) आणि रद्द केलेला धनादेश
  • एएमएल मार्गदर्शक तत्वानुसार प्रस्तावकचा (पत्त्यासह ओळख पुरावा), जिथे क्लेमची देय रक्कम रुपये 1 लाखाहून अधिक आहे एएमएल मार्गदर्शक सूचनांनुसार 1 लाख.
  • जेथे लागू असेल तेथे, कायदेशीर वारस / वारसाहक्क सर्टिफिकेट
  • क्लेमच्या मूल्यांकनासाठी कंपनी / टीपीएला आवश्यक असलेले इतर कोणतेही संबंधित कागदपत्र

क्लेम दस्तऐवजांचा पूर्ण संच पाठविला जाणे आवश्यक आहे

हेल्थ अॅडमिनीस्ट्रेशन टीम,
बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लि.
2nd मजला, बजाज फिनसर्व्ह बिल्डिंग, वेकफिल्ड आयटी पार्कच्या मागे, नगर रोड, विमान नगर-पुणे - 411 014.

हेल्थ इन्श्युरन्सचे सुलभीकरण

आरोग्य संजीवनी हेल्थ केअर इन्श्युरन्स पॉलिसी म्हणजे काय?

आरोग्य संजीवनी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी ही एक अशी पॉलिसी आहे, जी आपल्याला हॉस्पिटलमध्ये भर्ती करताना येणाऱ्या आर्थिक तणावाचे नियोजन करण्यात मदत करते यामुळे आपल्याला आपले आयुष्य, प्रकृतीत बिघाड झाल्यावर आपल्याला औषधोपचारांसाठी येणाऱ्या आर्थिक चणचणीच्या चिंतेशिवाय आनंदाने जगण्यासाठी सहाय्यक ठरते.

आरोग्य संजीवनी पॉलिसीद्वारे कुटुंबातील सदस्यांना इन्शुअर करता येते का?

हो. आरोग्य संजीवनी पॉलिसीद्वारे आपण आपल्या स्वतःसाठी, कायद्याने विवाह झालेल्या आपल्या जोडीदारासाठी, आपल्यावर अवलंबून असणाऱ्या अपत्यांसाठी, पालक व सासू-सासरे यांचे कव्हर इन्डीव्हिजुअल तसेच फ्लोटर या दोन्ही माध्यमांतून घेऊ शकता

स्टँडर्ड हेल्थ इन्श्युरन्स अंतर्गत कोणकोणते सम-इन्शुअर्ड पर्याय उपलब्ध आहेत?

एस आय पर्याय पाहण्यासाठी कृपया पुढील तक्त्याचा आधार घ्यावा:

अनुक्रमांक कव्हरेज सम-इन्शुअर्ड (किमान) सम-इन्शुअर्ड (कमाल) शेरा
1 हॉस्पिटलायझेशन रुपये. 1,00,000 रुपये. 5,00,000

1 खोलीचे भाडे, बोर्डिंग, नर्सिंगचा खर्च- सम इन्शुअर्ड पैकी 2% कमाल मर्यादा रू. 5000/- / - प्रति दिवस

2 अतिदक्षता विभाग (ICU)/हृदयरोग अतिदक्षता विभाग (ICCU)-सम इन्शुअर्ड पैकी 5% कमाल मर्यादा रू. 10,000 / - प्रति दिवस

3 रुग्णवाहिका कमाल मर्यादा रुपये. 2000/- per hospitalization

2 आयुष ट्रीटमेंट रुपये. 1,00,000 रुपये. 5,00,000  
3 मोतीबिंदू उपचार सम इन्शुअर्ड पैकी 25% किंवा रुपये 40,000 यापैकी जे कमी असेल, एका पॉलिसी पिरीयडमध्ये एका डोळ्यासाठी.  
4 प्री हॉस्पिटलायझेशन कमाल आणि हॉस्पिटलायझेशन मधील सम इन्शुअर्डd 30 दिवस
5 पोस्ट हॉस्पिटलायझेशन 60 दिवस
6 आधुनिक उपचार पद्धती हॉस्पिटलायझेशन एसआय च्या 50%

1 युटेराईन आर्टरी इम्बोलायझेशन आणि एच आय एफ यु (हाय इंटेन्सिटी फोकस्ड अल्ट्रासाउंड)

2 बलून सिनुप्लास्टी

3 डीप ब्रेन स्टीम्युलेशन

4 ओरल केमोथेरपी

5 इम्युनोथेरपी – इंजेक्शनमधून दिली जाणारी मोनोक्लोनल अँटीबॉडी

6 इंट्रा व्हायट्रीयल इंजेक्शन्स

7रोबोटिक सर्जरी

8 स्टीरियोटॅक्टिक रेडीओ सर्जरी

9 ब्रोंकायकल थर्मोप्लास्टी

10 वेपरायझेशन ऑफ द प्रोस्ट्रेट (ग्रीन लेझर ट्रीटमेंट किंवा होल्मियम लेझर ट्रीटमेंट)

11 आय ओ एन एम – (इंट्रा ओपरेटीव्ह न्युरो मॉनिटरिंग)

12 स्टेम सेल थेरपी: हिमाटोलॉजिकल कंडीशनसाठी केल्या जाणाऱ्या बॉन मॅरो ट्रांसप्लांटसाठी हेमाटोप्योटीक स्टेम सेल्स कव्हर केल्या जाईल

आरोग्य संजीवनी पॉलिसी अंतर्गत कोणकोणते वैद्यकीय खर्च कव्हर केले जातात?

हॉस्पिटलायझेशन, प्री-हॉस्पिटलायझेशन व पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्च आरोग्य संजीवनी पॉलिसी अंतर्गत कव्हर केले जातात.

मी आरोग्य संजीवनी हेल्थ इन्श्युरन्सचा लाभ कसा घेऊ शकतो/शकते?

आपण आरोग्य संजीवनी हेल्थ इन्श्युरन्स पुढे दिलेल्या पायऱ्या पूर्ण करून खरेदी करू शकता:

  • 1 तपशिलासाठी आमची वेबसाईट (www.bajajallianz.com) ला भेट द्या.
  • 2 आपला वैयक्तिक तपशील आणि हेल्थ प्रोफाइल दर्शविणारा प्रस्ताव फॉर्म भरा.
  • 3 आम्ही आपल्या प्रस्तावावर प्रक्रिया करू. आपण दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला आमच्या नेटवर्क डाय्ग्नोस्टीक सेंटरमधून प्री-पॉलिसी वैद्यकीय तपासणी करून घ्यावी लागू शकते. (याचा खर्च आपण स्वतः करायचा आहे).
  • 4 आपल्या तपासणीनंतर जर आपला प्रस्ताव स्वीकारला गेला, तर आम्ही सिंगल प्रीमियमची पावती मिळाल्यानंतर आपल्याला पॉलिसी प्रदान करू.
  • 5 जर पॉलिसी प्रदान केली गेली, तर आम्ही आपल्या प्री-पॉलिसी तपासणीचे 100% शुल्क परत देऊ.
  • 6 पॉलिसी शेड्युल, पॉलिसी वर्डिंग, कॅशलेस कार्ड्स आणि हेल्थ गाईड आपल्याला आपल्या प्रपोजल फोर्मवर दिलेल्या ईमेल आयडीवर पाठवण्यात येईल.

कृपया नोंद घ्यावी, की या पॉलिसीसाठी आपण वार्षिक, सहामाही, तिमाही किंवा प्रतिमास हप्त्यांनी प्रीमियम भरू शकता.

स्टँडर्ड हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनसाठीच्या पात्रतेची पडताळणी मी कशी करू?

आपण या स्टँडर्ड हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनचा लाभ घेण्यासाठी पात्र आहात जर:

  • 1 आपण किंवा कायद्याने आपला/ आपली जोडीदार/पालक/सासू-सासरे जर 18 ते 65 वयोगटातले असाल तर
  • 2 आपल्यावर अवलंबून असलेले आपले अपत्य जर 3 महिने-25वर्ष या वयोगटात बसत असेल तर

आपले अपत्य जर 18 पेक्षा अधिक वयाचे व आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असेल, तर ते सबसिक्वेंट रिन्युअल दरम्यानच्या कव्हरेजमध्ये अपात्र ठरतील.

सम इन्शुअर्ड अंतर्गत सब-लिमिट्स काय आहेत?

आरोग्य संजीवनी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत उप-मर्यादा आहेत:

मी माझे सम-इन्शुअर्ड कसे वाढवू? उप मर्यादा
दर दिवशी खोलीचे भाडे- सामान्य सम इन्शुअर्ड पैकी 2% कमाल मर्यादा रू. 5000/-
अतिदक्षता विभाग (ICU)/हृदयरोग अतिदक्षता विभाग (ICCU) प्रति दिवस सम इन्शुअर्ड पैकी 5% कमाल मर्यादा रू. 10,000/-
मोतीबिंदू शस्रक्रिया सम इन्शुअर्ड पैकी 25% किंवा रुपये 40,000 यापैकी जे कमी असेल,
रोड अ‍ॅम्ब्युलन्स 2000/- प्रति हॉस्पिटलायझेशन
आधुनिक उपचार पद्धती सम इन्शुअर्ड च्या 50%

मी माझे सम-इन्शुअर्ड कधी वाढवू शकतो/ते?

कंपनीच्या अंडररायटिंगच्या नियमाच्या अधीन राहून सम इन्शुअर्ड केवळ रिन्युअलच्या वेळी किंवा कोणत्याही वेळी बदलता (वाढवता/कमी करता) येऊ शकते एस आय मध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यासाठी प्रतीक्षा कालावधी फक्त वाढवलेल्या सम इन्शुअर्डसाठी नव्याने सुरु करावा.

क्लेमच्या वेळी कोणते को-पेमेंट आहेत काय?

हो, आपण ही पॉलिसी निवडल्यावर 5% आवश्यक असणारे को-पेमेंट लागू होते.

जर इन्शुअर्ड एखाद्या हॉस्पिटलमध्ये भर्ती झाला, तर 5% को-पेमेंट कन्झ्युमेबल व औषधे सोडून हॉस्पिटलायझेशनच्या सर्व खर्चावर लागू होतील.

आमच्या सेवांद्वारे स्मितहास्य पसरविणे

रामा अनिल माटे

तुमच्या वेबसाईटवर ऑनलाईन हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी नूतनीकरण सुलभ, यूजर-फ्रेंडली आणि सहज आहे.

सुरेश कडू

बजाज आलियान्झ अधिकाऱ्यांकडून सर्वोत्तम सपोर्ट प्रदान केला जातो आणि नक्कीच प्रशंसनीय आहे. धन्यवाद.

अजय बिंद्रा

बजाज आलियान्झ अधिकारी पॉलिसीचे लाभ योग्य प्रकारे समजावून सांगतात. महिला अधिकाऱ्याचे संवाद कौशल्य सर्वोत्तम होते आणि योग्य प्रकारे माहिती दिली.

आरोग्य संजीवनी हेल्थ इन्श्युरन्स आपल्या हॉस्पिटलमध्ये भर्ती करताना येणाऱ्या आर्थिक तणावाचे नियोजन करण्यासाठी

कोटेशन मिळवा

आपण आपले विस्तारित कुटुंबदेखील यामधून कव्हर करू शकता, जसे कि सासू-सासरे.

आरोग्य संजीवनी हेल्थ इन्श्युरन्सचे अतिरिक्त लाभ

आरोग्य संजीवनी हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन अनेक लाभांसह एक्सटेन्सिव्ह कव्हरेज देऊ करते:
Renewability

रिन्यूअ‍ॅबिलिटी

लाईफ टाईम रिन्युअलचे फायदे या पॉलिसीमध्येही उपलब्ध आहेत.

Hassle-free claim settlement

विनासायास क्लेम सेटलमेंट

आमच्या कॅशलेस आणि रिएम्बर्समेंट क्लेम सेटलमेंट प्रक्रियेच्या माध्यमातून आम्ही क्लेम सेटलमेंट प्रक्रियेतील माहिती भरणे, ट्रॅक करणे अत्यंत सोपी व सोयीची केली आहे.

Premium Payment in Instalment

हप्त्यांमध्ये प्रीमियम पेमेंट

प्रीमियम हप्त्यांमध्येही भरता येईल – वार्षिक, सहामाही, तिमाही किंवा प्रतिमास.

No Pre-policy check-up till 45 years of age

45 व्या वर्षापर्यंत कोणतीही वैद्यकीय तपासणी नाही

45 व्या वर्षापर्यंत आपल्याला कोणतीही वैद्यकीय तपासणी करून घेण्याची आवश्यकता नाही.

Cumulative Bonus

संचयी बोनस

जर कोणत्याही खंडाशिवाय चालू वर्षामध्ये एकूण इन्शुअर्ड रकमेच्या जास्तीत जास्त 50% च्या अधीन राहून आणखी वाचा Read more

जर कोणत्याही खंडाशिवाय चालू वर्षामध्ये एकूण इन्शुअर्ड रकमेच्या जास्तीत जास्त 50% च्या अधीन राहून पॉलिसी रिन्यू केली प्रत्येक क्लेम-फ्री वर्षागणिक (कोणताही क्लेम केला गेला नाही तर) कम्युलेटीव्ह बोनस 5%ने वाढेल.

Free Look Period

मोफत लुकअप कालावधी

इन्शुअर्ड व्यक्तीला पॉलिसी घेतल्यानंतर नियम व अटी जाणून घेण्यासाठी व ते मान्य नसतील तर पॉलिसी रद् आणखी वाचा Read more

इन्शुअर्ड व्यक्तीला पॉलिसी घेतल्यानंतर नियम व अटी जाणून घेण्यासाठी व ते मान्य नसतील तर पॉलिसी रद्द करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात येईल.

आरोग्य संजीवनी पॉलिसी: खरेदी करण्यापूर्वी जाणून घेण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे

  • समावेश

  • अपवाद

प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन कव्हर

अनुक्रमे 30 आणि 60 दिवसांपर्यंतच्या रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचे आणि नंतरचे खर्च समाविष्ट करते.

रुग्णवाहिका खर्च

रुग्णवाहिकेसाठी कमाल मर्यादा रू. पर्यंत खर्च समाविष्ट आहे 2000/- प्रति हॉस्पिटलायझेशन.

प्री-पॉलिसी तपासणीची किंमत

प्रस्ताव स्वीकारल्यास व पॉलिसी जारी झाल्यास प्री-पॉलिसी चेक अपचा 100% खर्च परत केला जाईल.

डे केअर उपचारांचा खर्च

डे केअर उपचारांचा सर्व खर्च कव्हर करते.

1 चे 1

 हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी सुरू झाल्याच्या पहिल्या 30 दिवसांच्या दरम्यान झालेल्या कोणत्याही आजारास अपघात झाल्याने झालेल्या जखमांव्यतिरिक्त कव्हरेजमधून वगळले जाईल.

पूर्वीपासून असलेल्या आजारासाठी 48 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी लागू असेल.

हर्निया, पाइल्स, हिस्टेरेक्टोमी आणि टायपानोप्लास्टी या आजारांसाठी 24 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी लागू असेल.

भारताच्या भौगोलिक क्षेत्राबाहेर घेतले गेलेले उपचार पॉलिसी कव्हरेजमधून वगळण्यात आले आहेत.

बिगर अपघात परिस्थितीमध्ये सांध्यांच्या प्रत्यारोपणासाठी 48 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी लागू असेल.

1 चे 1

हेल्थ इन्श्युरन्स डॉक्युमेंट्स

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया तारीख निवडा

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.

कस्टमर रिव्ह्यू आणि रेटिंग

सरासरी रेटिंग:

4.75

(3,912 रिव्ह्यूज व रेटिंगवर आधारित)

Juber Khan

सुंदर कुमार मुंबई

कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीची सोपी ऑनलाईन खरेदी आवश्यक आहे.

पूजा मुंबई

बजाज अलायंझचे प्रतिनिधी अतिशय माहितीपूर्ण आणि मदतगार आहेत.

निधी सुरा मुंबई

पॉलिसी खूप जलद आणि सोप्या रीतीने जारी झाली.

बजाज अलायंझ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.

कॉलबॅकची विनंती

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया वैध पर्याय निवडा
कृपया निवडा
कृपया चेकबॉक्स निवडा

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

  • निवडा
    कृपया निवडा
  • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

आमच्यासह चॅट करा