Loader
Loader

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

क्रिटी केअर पॉलिसी

बजाज आलियान्झ क्रिटी केअर इन्श्युरन्स
Criti Care Policy

तुमच्यासाठी क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स पॉलिसी

तुमच्यासाठी यामध्ये काय आहे?

Critical Care Cancer


कॅन्सर केअर,
हे कॅन्सरच्या सुरुवातीच्या तसेच ॲडव्हान्स टप्प्याला कव्हर करते

Long Term


बहु वर्षीय पॉलिसी,
1/2/3 वर्षांसाठी घेतली जाऊ शकते


43 गंभीर आजारांना कव्हर्ड

क्रिटी केअर पॉलिसी म्हणजे काय?

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीची क्रिटी केअर पॉलिसी ही विविध प्रकारच्या जीवघेण्या आरोग्य स्थितीपासून सर्वसमावेशक फायनान्शियल सपोर्ट प्रदान करण्यासाठी डिझाईन केलेला वैशिष्ट्यपूर्ण क्रिटिकल हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन आहे. या क्रिटिकल केअर इलनेस इन्श्युरन्स द्वारे कॅन्सर, कार्डिओव्हॅस्क्युलर विकार, किडनी समस्या, न्यूरोलॉजिकल विकार आणि अवयव प्रत्यारोपण यासारख्या प्रमुख आरोग्यविषयक जोखमींसाठी कव्हरेज ऑफर केले जाते. पॉलिसीमध्ये 43 गंभीर आजारांचा समावेश होतो आणि उपचारांच्या खर्चाशिवाय निदानावर एकरकमी पेआऊट प्रदान केले जाते, ज्यामुळे व्यक्तींना आर्थिक बोजाची चिंता न करता रिकव्हरीवर लक्ष केंद्रित करता येते. बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीच्या हेल्थ आणि क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये आजीवन रिन्यूवल समाविष्ट आहे. जेणेकरुन व्यक्तीच्या संपूर्ण हयातीत संरक्षण प्राप्त करण्याची सुनिश्चिती मिळते. तसेच, गंभीर आजार कव्हरचे उपयोजन गरजांवर आधारित केले जाऊ शकते. व्यापक, दीर्घकालीन संरक्षणासाठी लवचिक सम ॲश्युअर्ड पर्याय देऊ करते. हे सर्वसमावेशक कव्हरेज हे मनःशांती सुरक्षित करण्यासाठी आणि अनपेक्षित वैद्यकीय खर्चापासून तुमच्या भविष्याचे संरक्षण करण्यासाठी आदर्श उपाय बनवते.

बजाज आलियान्झ क्रिटी केअर पॉलिसी का?

गंभीर आजारांचा व्यक्तीच्या आयुष्यावर आणि दैनंदिन जगण्यावर लक्षणीय परिणाम होतो. यामुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात मानसिक आणि भावनिक तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळेच त्यांच्यावरील आर्थिक बोजा मोठ्या प्रमाणात असतो आणि व्यक्ती तसेच कुटूंब त्यांचे दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष करीत असतात. 

याला सहाय्यभूत म्हणून, जीवनात व्यक्तीला सामना करावा लागू शकणाऱ्या विविध प्रकाराच्या गंभीर आजारांना कव्हर करण्यासाठी बजाज आलियान्झने क्रिटी केअर पॉलिसीची आखणी केली आहे क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स विशिष्ट जीवघेण्या आजारांच्या उपचारांशी संबंधित मोठ्या खर्चापासून प्लॅन संरक्षक म्हणून काम करेल.

महत्त्वाची वैशिष्ट्ये

  • पॉलिसी अंतर्गत बेस कव्हरेज उपलब्ध

    5 विस्तृत कॅटेगरी मध्ये विभाजित केलेल्या गंभीर आजारांची विस्तृत रेंज (एकूण 43 आजार). कॅन्सर केअर, कार्डिओ व्हॅस्क्युलर केअर, किडनी केअर, न्यूरो केअर, ट्रान्सप्लांट केअर आणि सेन्सरी ऑर्गन केअर.

    गंभीर आजारांपैकी काही नावे- 

    •    किडनी फेल्युअर,
    •    कॅन्सर,
    •    अँजिओप्लास्टी प्रक्रिया आणि हार्ट ट्रान्सप्लांट सह कार्डिओ व्हॅस्क्युलर विकार,
    •    स्ट्रोक आणि ब्रेन सर्जरी, आणि
    •    बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन सह प्रमुख ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन
  • पॉलिसी टर्म

    क्रिटी केअर हेल्थ इन्श्युरन्स वैयक्तिक सम इन्श्युअर्डच्या आधारावर उपलब्ध आहे. ज्यामध्ये प्रत्येक कुटुंबातील सदस्याला त्याच्या/तिच्याकडे स्वतंत्र सम इन्श्युअर्ड असेल.. याद्वारे व्यक्तीला सम अ‍ॅश्युअर्डच्या विस्तृत श्रेणीमधून पर्याय निवडण्याची अनुमती मिळते.

  • बहु-वर्षीय पॉलिसी

    पॉलिसी 1/2/3 वर्षांसाठी घेतली जाऊ शकते.

    सामान्य परिस्थितीत, पॉलिसीअंतर्गत उपलब्ध असलेल्या सर्व लाभांसह पॉलिसी रिन्यू केली जाऊ शकते. तसेच, पॉलिसी कालबाह्य तारखेपासून 30 दिवसांचा ग्रेस कालावधी प्रदान करते.

  • हप्त्यांमध्ये प्रीमियम पेमेंट

    काही अटी व शर्तीं अंतर्गत इंस्टॉलमेंट मध्ये पॉलिसी रक्कम भरली जाऊ शकते. तसेच, जर व्यक्ती निर्दिष्ट देय तारखेला इंस्टॉलमेंट भरत नसेल तर शून्य इंटरेस्टची आकारणी केली जाईल. पॉलिसीसाठी देय इंस्टॉलमेंटचा प्रीमियम भरण्यासाठी व्यक्तीला 15 दिवसांचा शिथिलता कालावधी दिला जाईल. परंतु शिथिलता कालावधीमध्ये प्रीमियम भरण्यात अयशस्वी ठरल्यास पॉलिसी रद्द केली जाईल.

  • सम अश्यूअर्ड

    त्यांच्या प्लॅननुसार इन्श्युअर्ड व्यक्तीला प्रदान केलेली रक्कम ही सम अ‍ॅश्यूअर्ड असते.. निवडलेला सेक्शन आणि व्यक्तीचे वय यानुसार सम अश्यूअर्ड बदलत असतो. 

    सर्व पाच विभागांतर्गत

    •      प्रवेश वय 18-65 वयोगटासाठी किमान एसए 1 लाख आहे.
    •      प्रति सेक्शन प्रवेश वय 60 वयोगटासाठी किमान एसए 50 लाख आहे.
    •      प्रति सेक्शन प्रवेश वय 61-65 वयोगटासाठी किमान एसए 10 आहे.

    टीप: 

    a. प्रति सदस्य सम अश्यूअर्ड कमाल 2 कोटी असेल

    ब. पॉलिसीमध्ये 5 सेक्शन्स आहेत. यापैकी प्रत्येक पाच सेक्शनमध्ये दोन कॅटेगरी समाविष्ट आहेत. सर्वसाधारणपणे कॅटेगरी A मध्ये किरकोळ/प्रारंभिक टप्प्यातील आजारांचा आणि श्रेणी B मध्ये गंभीर/प्रगत टप्प्यांवरील आजारांचा समावेश होतो.

हे क्रिटिकल इलनेस कव्हर कोणी खरेदी करावे?

अनपेक्षित आरोग्य आव्हानांपासून फायनान्शियल स्थिरता सुरक्षित करण्याची इच्छा असलेल्या कोणालाही क्रिटिकल इलनेस कव्हर फायदेशीर आहे. हे विशेषत: यासाठी महत्त्वाचे आहे:

  • कुटुंबातील आजाराचे रेकॉर्ड असलेल्या व्यक्ती :

    जेव्हा कुटुंबात कर्करोग किंवा हृदयरोग यासारख्या गंभीर आजारांची गस्त असते तेव्हा कुटुंबातील अन्य सदस्यांना लागण होण्याची शक्यता अधिक असते. बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीच्या क्रिटी केअर सारख्या क्रिटिकल इलनेस पॉलिसीद्वारे कव्हरेज सुरक्षित करणे हे रिस्क प्रभावीपणे मॅनेज करण्यास मदत करू शकते.

  • घरातील कमवते सदस्य :

    कुटुंबातील एकमेव कमाई करणारे व्यक्तींसाठी, फायनान्शियल सिक्युरिटी आवश्यक असल्याची खात्री करा. क्रिटिकल इलनेस हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी लवकर निवडण्याद्वारे ते गंभीर आजाराच्या स्थितीत प्रियजनांचे आर्थिक अस्थिरतेपासून संरक्षण करू शकतात.

  • हाय-रिस्क व्यवसाय असलेल्या व्यक्ती :

    अति दबावाखाली काम करण्यामुळे गंभीर आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. अशा प्रकारचे काम करणाऱ्या व्यक्तींसाठी क्रिटिकल केअर इलनेस इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी केल्यामुळे आरोग्य जोखीम निर्माण झाल्याच्या स्थितीत महत्वपूर्ण सपोर्ट मिळतो.

  • विशिष्ट वयोगटातील व्यक्ती :

    व्यक्तीने 40 वर्षाचा टप्पा गाठल्यानंतर गंभीर आजारांना सामोरे जाण्याची शक्यता अधिक बळावते. हेल्थ आणि क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये इन्व्हेस्ट करणे हे सुनिश्चित करते की, भविष्यातील अनिश्चितता टाळण्यासाठीची योग्य पूर्व-तयारी आहे. त्यामुळे वाढत्या वयानुसार कोणतीही चिंता न बाळगता मन:शांती मिळवू शकतो.

  • महिलांसाठी :

    महिलांमध्ये कॅन्सर सारख्या आजारांचे वाढते प्रमाण हे प्रीव्हेंटिव्ह हेल्थ कव्हरेजचे महत्त्व दर्शविते. क्रिटिकल इलनेस कव्हरसह महिला या सक्रियपणे त्यांचे आरोग्य आणि फायनान्शियल स्थिरता सुरक्षित करू शकतात.

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीमध्ये, आम्ही एक विशेष क्रिटिकल इलनेस हेल्थ प्लॅन प्रदान करतो. जो व्यक्ती आणि कुटुंबांसाठी प्राप्त करण्यायोग्य आहे. ज्यामध्ये जेव्हा सर्वात आवश्यक असेल तेव्हा अधिकाधिक सपोर्ट प्रदान करण्यासाठी गंभीर आजारांची सर्वसमावेशक यादी कव्हर केली जाते.

क्रिटी केअर इन्श्युरन्स प्लॅनद्वारे कव्हर केलेले आजार

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीचा क्रिटी केअर इन्श्युरन्स प्लॅन गंभीर आजारांच्या अनेक कॅटेगरीसाठी सर्वसमावेशक कव्हरेज प्रदान करतो. ज्यांची वर्गवारी प्रामुख्याने पाच प्रमुख सेक्शन मध्ये केली जाते: कॅन्सर केअर, कार्डिओव्हॅस्क्युलर केअर, किडनी केअर, न्यूरो केअर आणि ट्रान्सप्लांट आणि सेन्सरी ऑर्गन केअर. प्रत्येक सेक्शनमध्ये प्रारंभिक टप्प्यातील (25% सम ॲश्युअर्ड) आणि ॲडव्हान्स्ड (100% सम ॲश्युअर्ड) म्हणून वर्गीकृत केलेल्या अटींसह अनेक अटी कव्हर केल्या जातात. उदाहरणार्थ, कॅन्सर केअर सेक्शनमध्ये प्रारंभिक टप्प्यातील आणि ॲडव्हान्स्ड कॅन्सर दोन्ही समाविष्ट आहेत, तर कार्डिओव्हॅस्क्युलर केअर सेक्शनमध्ये अँजिओप्लास्टी, हार्ट ट्रान्सप्लांट आणि प्रमुख शस्त्रक्रिया यासारख्या गंभीर स्थितीचा समावेश होतो. इतर सेक्शन मध्ये किडनी ट्रान्सप्लांट, स्ट्रोक आणि ब्रेन सर्जरी आणि आवश्यक अवयव प्रत्यारोपण यासारख्या परिस्थितीसाठी न्यूरो केअर कव्हर केले जाते. हा क्रिटिकल इलनेस हेल्थ इन्श्युरन्स या गंभीर आरोग्य स्थितींसाठी फायनान्शियल संरक्षण प्रदान करतो आणि चालू किंवा भविष्यातील उपचारांच्या खर्चाची चिंता न करता तुम्हाला लाभ प्राप्त होतील याची सुनिश्चिती प्रदान करतो.

सर्वोत्तम क्रिटिकल इलनेस कव्हर ऑनलाईन कसे निवडावे?

भारतात योग्य क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स निवडण्यात अनेक प्रमुख घटकांचा विचार करणे समाविष्ट आहे. तुमच्या गरजांसाठी सर्वोत्तम क्रिटिकल इलनेस हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन निवडण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी येथे चेकलिस्ट आहे:

  • कव्हरेज :

    गंभीर आजारादरम्यान पेआऊटमध्ये फायनान्शियल गरजा कव्हर केल्याची खात्री करा.

  • प्रीमियम दर :

    स्पर्धात्मक रेट्स शोधण्यासाठी ऑनलाईन प्रीमियम कॅल्क्युलेटर वापरून पॉलिसींची तुलना करा.

  • प्रतीक्षा कालावधी :

    प्रतीक्षा कालावधी तपासा; बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी गंभीर आजारांसाठी स्टँडर्ड 90-दिवसांचा कालावधी ऑफर करते.

  • कव्हर केलेले आजार :

    कव्हर केलेल्या स्थितींचा विशेषत: जर काही आजारांचा कौटुंबिक इतिहास असेल तर रिव्ह्यू करा.

  • रिन्यूवल पॉलिसी :

    कोणत्याही वयात निरंतर कव्हरेजसाठी आजीवन रिन्यू लाभ असलेला प्लॅन निवडा.

  • क्लेम आणि सब-लिमिट :

    अनपेक्षित खर्च टाळण्यासाठी क्लेम प्रोसेस आणि शस्त्रक्रिया, निदान चाचण्या आणि इतर प्रक्रियेसाठी सब-लिमिट समजून घ्या.

बजाज आलियान्झ क्रिटी केअरचे काही अतिरिक्त लाभ आणि सवलत

प्रत्येक सेक्शन आणि सवलती अंतर्गत कव्हर्ड कॅटेगरी
Critical Care Cancer

कॅन्सर रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी:

जर सेक्शन I (कॅन्सर केअर) च्या कॅटेगरी B अंतर्गत तुमचा क्लेम मंजूर झाला तर बजाज आलियान्झ अधिक वाचा

जर सेक्शन I (कॅन्सर केअर) च्या कॅटेगरी B अंतर्गत तुमचा क्लेम मंजूर झाला तर बजाज आलियान्झ सम इन्श्युअर्डच्या अतिरिक्त 10% भरेल. इन्श्युअर्ड करिता कॅन्सर रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी साठी (जसे की ब्रेस्ट, हेड किंवा नेक) लंपसम लाभ रक्कम योग्य आहे.

कार्डिॲक नर्सिंग:

जर सेक्शन II (कार्डिओव्हॅस्क्युलर केअर) च्या कॅटेगरी B अंतर्गत तुमचा क्लेम मंजूर झाला तर बजाज आलियान्झ देय करेलअधिक वाचा

जर सेक्शन II (कार्डिओव्हॅस्क्युलर केअर) च्या कॅटेगरी B अंतर्गत तुमचा क्लेम मंजूर झाला तर बजाज आलियान्झ सम इन्श्युअर्डच्या अतिरिक्त 5% भरेल. इन्श्युअर्ड साठी कार्डियॅक नर्सिंगसाठी लंपसम लाभ रक्कम निर्देशित केली जाते.

Criti Care Care Dialysis

डायलिसिस केअर:

जर सेक्शन III (किडनी केअर) च्या कॅटेगरी B अंतर्गत तुमचा क्लेम मंजूर झाला तर बजाज आलियान्झ देय करेल अधिक वाचा

जर सेक्शन III (किडनी केअर) च्या कॅटेगरी B अंतर्गत तुमचा क्लेम मंजूर झाला तर बजाज आलियान्झ सम इन्श्युअर्डच्या अतिरिक्त 10% भरेल. इन्श्युअर्डच्या डायलिसिस केअरसाठी एकरकमी लाभ रक्कम निर्देशित केली जाते.

Critical Illeness care Insurance

फिजिओथेरपी केअर

जर सेक्शन IV (न्यूरो केअर) च्या कॅटेगरी B अंतर्गत तुमचा क्लेम मंजूर झाला तर बजाज आलियान्झ देय करेल अधिक वाचा

जर सेक्शन IV (न्यूरो केअर) च्या कॅटेगरी B अंतर्गत तुमचा क्लेम मंजूर झाला तर बजाज आलियान्झ सम इन्श्युअर्डच्या अतिरिक्त 5% भरेल. इन्श्युअर्डच्या फिजिओथेरपी केअरसाठी एकरकमी लाभ रक्कम निर्देशित केली जाते.

Critical Illeness care Insurance

सेन्सरी केअर

जर सेक्शन V च्या कॅटेगरी B अंतर्गत तुमचा क्लेम मंजूर झाला असेल (ट्रान्सप्लांट केअर आणि सेन्सरी ऑर्गन केअर), अधिक वाचा

जर सेक्शन V च्या कॅटेगरी B अंतर्गत तुमचा क्लेम (ट्रान्सप्लांट केअर आणि सेन्सरी ऑर्गन केअर) मंजूर झाला तर बजाज आलियान्झ सम इन्श्युअर्डच्या 5% अतिरिक्त रक्कम अदा करेल. स्पीच थेरपी, श्रवण दोष उपचार जसे की कोक्लेयर इम्प्लांट घेत असलेल्या इन्श्युअर्ड व्यक्तीसाठी लंपसम लाभ रक्कम निर्देशित केली जाते.

Wellness discount

वेलनेस सवलत

बजाज आलियान्झ क्रिटी केअर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत इन्श्युअर्ड कोणतीही व्यक्ती 5% सवलतीसाठी पात्र आहे अधिक वाचा

बजाज आलियान्झ क्रिटी केअर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत इन्श्युअर्ड कोणतीही व्यक्ती प्रत्येक रिन्यूवल वर 5% सवलतीसाठी पात्र आहे. तथापि, नियमितपणे शारीरिक व्यायमांचा समावेश करून व्यक्तीला फिट आणि निरोगी जीवनशैली राखणे आवश्यक आहे.. शारीरिक व्यायामामध्ये दर आठवड्याला किमान 15,000 स्टेप्स किंवा प्रत्येक महिन्याला 60,000 स्टेप्स घेतल्या जातात हे दर्शविले जाते.

 

ही वेलनेस सवलत वर्षातून एकदा रिडीम केली जाऊ शकते, मात्र इन्श्युअर्डने सर्वोत्तम प्रकारे विकसित प्रयोगशाळेत केलेला टेस्ट रिपोर्ट सबमिट करणे अपेक्षित आहे.

Long Term policy

लाँग टर्म पॉलिसी सवलत

जर पॉलिसी दोन वर्षांसाठी निवडली असेल तर 4% सवलत लागू होईल. अधिक जाणून घ्या

  • जर पॉलिसी दोन वर्षांसाठी निवडली असेल तर 4% सवलत लागू होईल.
  • जर पॉलिसी तीन वर्षांसाठी निवडली असेल तर 8% सवलत लागू होईल.

 

नोंद: जर इन्श्युअर्डने इंस्टॉलमेंट प्रीमियम पर्याय निवडला असेल तर ही सवलत लागू नाही

Family discount

ऑनलाईन सवलत

वेबसाईटद्वारे ऑनलाईन बुक केलेल्या सर्व पॉलिसींसाठी, थेट ग्राहकांना 5% सवलत लाभ मिळेल.

हेल्थ इन्श्युरन्स डॉक्युमेंट्स डाउनलोड करा

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया तारीख निवडा

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.

क्रिटी केअर इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे

  • समावेश

  • अपवाद

कॅन्सरसंबंधी निगा

या सेक्शनमध्ये कॅन्सरच्या सुरुवातीच्या स्टेज सोबतच अ‍ॅडव्हान्स्ड स्टेजचा देखील समावेश होतो

कार्डिओव्हॅस्क्युलर केअर

या सेक्शनमध्ये हृदयाशी संबंधित गंभीर आजारांचा समावेश होतो आणि अँजिओप्लास्टी खर्च देखील कव्हर केला जातो.

किडनी केअर

या सेक्शन मध्ये किडनीशी संबंधित किरकोळ आणि गंभीर शस्त्रक्रिया कव्हर केल्या जातात. जसे की, एखादी किडनी काढून टाकणे आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी इ.

न्यूरो केअर

या सेक्शन मध्ये मेंदू किंवा चेतासंस्था यांच्याशी संबंधित गंभीर आजारांचा समावेश होतो.

ट्रान्सप्लांट केअर व सेन्सरी ऑर्गन केअर

या सेक्शन मध्ये फुफ्फुस किंवा यकृत सारख्या अवयवांसाठी ट्रान्सप्लांट कव्हर केले जाते.. हे अंधत्व, बधिरपणा इ. सारख्या सेन्सरी ऑर्गन संबंधित विकारांवरील ट्रीटमेंट देखील कव्हर करते.

1 चे 1

प्रतीक्षा कालावधी

गंभीर आजार किंवा त्याची चिन्हे आणि लक्षणे यांचे निदान इन्श्युअर्डला पहिल्या 180/120 दिवसांत झाल्यास

अधिक जाणून घ्या

जर इन्श्युअर्डला गंभीर आजार किंवा त्याची चिन्हे आणि लक्षणे पहिल्या पॉलिसीच्या प्रारंभीच्या पहिल्या 180/120 दिवसांच्या आत निदान झाल्यास इन्श्युरन्स अंतर्गत त्याचा समावेश केला जाणार नाही.

तथापि, जेव्हा कोणत्याही ब्रेकशिवाय पुढील वर्षांसाठी कव्हरेज रिन्यू केले जाते तेव्हा ते वगळले जात नाही.

निदान तारीख ते गंभीर आजाराच्या पूर्ततेपर्यंत पॉलिसी शेड्यूलमध्ये नमूद केल्याप्रमाणे इन्श्युअर्ड व्यक्ती 0/7/15 दिवसांसाठी जगला असल्यास क्लेमचा लाभ दिला जातो.

लैंगिक संक्रमित रोग

इन्श्युरन्स अंतर्गत लैंगिक संक्रमित आजारांचा समावेश केला जाणार नाही.

जन्मजात अपंगत्व आणि विकृती

जन्मजात अपंगत्व आणि विसंगतीमुळे उद्भवणारा आजार इन्श्युरन्स अंतर्गत समाविष्ट केला जाणार नाही.

अपवाद जसे की

जर घोषित केले किंवा नसेल तर कोणत्याही प्रकारचे युद्ध, परदेशी शत्रूचे कृत्य, सैन्य किंवा सत्ता बळकावणे, दंगल, संप, लॉक आऊट, लष्करी किंवा जनतेचे उठाव इ.

नैसर्गिक आपत्ती

वेगवान वारे, वादळे, भूकंप, चक्रीवादळे, ज्वालामुखी उद्रेक यांसारख्या नैसर्गिक आपत्ती).

रेडिओ ॲक्टिव्ह प्रदूषण

रेडिओ ॲक्टिव्ह प्रदूषणामुळे होणारे विकार.

आत्महत्या प्रयत्न / बेकायदेशीर / गुन्हेगारी कारवाईत सहभाग

आत्महत्येच्या प्रयत्नामुळे किंवा गुन्हेगारी उद्देशाने बेकायदेशीर किंवा गुन्हेगारी कारवाईमध्ये सहभागामुळे झालेल्या दुखापती.

मादक औषधे / मद्यपान

वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने निर्देशित केल्याशिवाय मादक औषधे किंवा अल्कोहोल.

1 चे 1

कस्टमर रिव्ह्यू आणि रेटिंग

सरासरी रेटिंग:

4.75

(3,912 रिव्ह्यूज व रेटिंगवर आधारित)

Faiz Siddiqui

विक्रम अनिल कुमार

माझे हेल्थ केअर सुप्रीम पॉलिसी रिन्यूवल करण्यात तुम्ही मला सहकार्य केले त्याबद्दल मला खरोखर आनंद वाटतो. खूप खूप धन्यवाद. 

Rekha Sharma

पृथ्वी सिंग मियान

लॉकडाउन असूनही चांगली क्लेम सेटलमेंट सर्व्हिस. त्यामुळे मी अधिकाधिक कस्टमरना बजाज आलियान्झ हेल्थ पॉलिसी उपलब्ध केली

Susheel Soni

अमागोंड विट्टप्पा अराकेरी

बजाज आलियान्झ द्वारे सर्वोत्तम सर्व्हिस, त्रासमुक्त सर्व्हिस, कस्टमर्स साठी फ्रेंडली साईट, समजण्यास व ऑपरेट करण्यास सोपी. आनंदी मनाने कस्टमर्सना सर्व्हिस दिल्याबद्दल धन्यवाद टीम...

Critical Care Policy FAQs

क्रिटिकल केअर पॉलिसी एफएक्यू

गंभीर आजारांची व्याख्या

म्हणजे या पॉलिसीच्या अटी व शर्तींमध्ये नमूद केल्याप्रमाणे आजारपण, रोग किंवा आजार किंवा सुधारात्मक उपाय होय.

फिक्स्ड बेनिफिट पॉलिसीचा लाभ कोणते आहेत?

फिक्स्ड बेनिफिट हेल्थ इन्श्युरन्स हा हेल्थ इन्श्युरन्स प्रकार आहे. देय करावी लागणारी सम इन्श्युअर्ड रक्कम आधीच निश्चित केली जाते.

आधीच अस्तित्वात असलेले आजार म्हणजे काय?

आधीच अस्तित्वात असलेले आजार म्हणजे कोणतीही स्थिती, विकार किंवा दुखापत किंवा आजार. ज्याचे निदान चिकित्सकाद्वारे इन्श्युरर किंवा त्याच्या पुनर्स्थापना द्वारे जारी केलेल्या पॉलिसीच्या अंमलबजावणी तारखेपासून 48 महिन्यांच्या आत केले जाते. ज्यासाठी इन्श्युरर किंवा त्याच्या पुनर्स्थापना द्वारे जारी केलेल्या पॉलिसीच्या अंमलबजावणी तारखेच्या 48 महिन्यांच्या आत वैद्यकीय सल्ला किंवा उपचाराची शिफारस केली गेली किंवा प्राप्त झाली.

बजाज अलायंझ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.

कॉलबॅकची विनंती

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया वैध पर्याय निवडा
कृपया निवडा
कृपया चेकबॉक्स निवडा

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

  • निवडा
    कृपया निवडा
  • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

आमच्यासह चॅट करा