Loader
Loader

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

मोटर इन्श्युरन्स

वैध नोंदणी क्रमांक एन्टर करा
PAN कार्डनुसार नाव प्रविष्ट करा
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया प्रॉडक्ट निवडा
road side assistance cover

24x7 रोडसाईड असिस्टन्स

on spot claim disbursements

ऑन द स्पॉट क्लेम सेटलमेंट्स

car insurance repair

7,200+ नेटवर्क गॅरेज

 

About Motor Insurance

मोटर इन्श्युरन्सविषयी

मोटर इन्श्युरन्स ही एक वाहन इन्श्युरन्स पॉलिसी आहे जी ट्रक, कार, जीप, बाईक, स्कूटर इ. सारख्या वाहनांसाठी अनिवार्य आहे.. ही पॉलिसी अपघात किंवा इतर प्रकारच्या हानीमुळे होणाऱ्या वित्तीय नुकसानीसाठी वाहन मालक/ड्रायव्हरला कव्हरेज देऊ करते.

संभाव्य आर्थिक जोखीमांपासून वाहन मालकांना संरक्षित करण्यासाठी भारतात वैध मोटर इन्श्युरन्स असणे अनिवार्य आहे. अपघातानंतर महत्त्वाचे खर्च टाळण्यासाठी ही सर्वोत्तम प्रकारची सिक्युरिटी आहे. सरकारने मोटर वाहनांद्वारे प्रवास करणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी अनिवार्य केले आहे.

वाहन खरेदी करणे ही घर खरेदीनंतर व्यक्तीच्या आयुष्यातील दुसरी सर्वात महागडी गुंतवणूक असते हे कुणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे, अनपेक्षित घटनांपासून गुंतवणुकीचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. वाहन दुरुस्तीतील वाढते शुल्क आणि ड्रायव्हिंगमधील जोखीम विचारात घेता, दुर्दैवाने अपघातात तुम्हाला मोठा खर्च लागू शकतो.

मोटर इन्श्युरन्स पॉलिसीसाठी तुम्ही भरलेले वार्षिक प्रीमियम होणाऱ्या फायद्यांच्या तुलनेत कमी आहे आणि काही दुर्घटना झाल्यास तुम्हाला कव्हरेज मिळेल. पॉलिसीबद्दल अनेक चुकीच्या कल्पना आहेत, तरीही त्यातून विविध परिस्थितीत उद्भवणाऱ्या भौतिक नुकसानीसाठी तुम्हाला निश्चितच भरपाई मिळेल.

 

तुम्ही वाहन इन्श्युरन्स पॉलिसी का खरेदी करावी?

विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, भारतात गाडी चालविण्यात अनेक धोके आहेत. लाखो लोकांकडे ड्रायव्हिंग परवाना आहे आणि घरात किमान एक वाहन आहे. वाहने प्रवासाचे महत्त्वपूर्ण साधन बनले आहेत, ज्यामुळे लोकांना सार्वजनिक वाहतुकीद्वारे प्रवास करण्याची आवश्यकता पडत नाही. त्याच वेळी, आपल्याला माहीत आहे की खासगी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रस्त्यावरील अपघातांचा धोका आणि नियम तोडण्याचा धोका देखील वाढतो. अशा गोष्टींमुळे वाहन इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करणे महत्त्वाचे आहे. यासोबत, सर्वसमावेशक मोटर इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्यासाठी जी प्राथमिक कारणे आहेत , त्यांचा आढावा घेऊ.

  • कायदेशीर आवश्यकता:

    सरकारी कायदे आणि नियमांचे अनुसरण करणे हे पहिले कारण आहे. व्यक्तीने वाहन रस्त्यावर नेण्यापूर्वी किमान कव्हरेजसह मोटर इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करावी.

  • थर्ड-पार्टी नुकसान कव्हरेज:

    पुरेशा कव्हरेजसह, तुम्ही थर्ड-पार्टीशी झालेल्या अपघातानंतर झालेल्या नुकसानासाठी पेमेंट करू शकता. मोटर इन्श्युरन्स नसेल तर तुम्हाला तुमच्या खिशातून पेमेंट करावे लागेल आणि कव्हरेजची योग्य रक्कम अशा प्रकारचे खर्च व्यवस्थापित करू शकते.

  • चोरी झाल्यास सिक्युरिटी:

    वाहनांसाठी चोरी हा सर्वात मोठा धोका आहे.. परंतु वाहन इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये तुम्ही चोरी, तोडफोड आणि सर्व मानवनिर्मित हानीपासून संरक्षित आहात.

  • हानीमुळे झालेल्या खर्चाचे कव्हरेज:

    वाहनाच्या दुरुस्तीच्या खर्चामुळे तुमच्यावर आर्थिक ताण येईल.. तथापि, तुमच्याकडे पुरेसे कव्हरेज असल्यामुळे तुम्ही इन्श्युरन्समधून अशा नुकसानीसाठी पैसे भरू शकता.

  • वैयक्तिक दुखापतीसाठी इन्श्युरन्स:

    प्रत्येक वाहन मालक अपघातांत कोणतीही इजा न होण्यास तेवढा भाग्यवान नाही.. मोटर इन्श्युरन्स पॉलिसी अपघातांमुळे होणाऱ्या सर्व लहान आणि मोठ्या दुखापतींसाठी पैसे भरेल.

पॉवर-पॅक्ड मोटर इन्श्युरन्स, आता तुमच्या हातात

 

POWER-PACKED MOTOR INSURANCE, AT YOUR FINGERTIPS

 

 

मोटर इन्श्युरन्स पॉलिसीची वैशिष्ट्ये

वाहन इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे, जे केवळ वाहन मालकांसाठी नाही तर इतर पार्टीसाठीही लाभदायक आहेत. इन्श्युरन्स कंपन्या वाहन मालकाला त्यांच्या कस्टमर्सना आणि इतरांना खालील वैशिष्ट्ये प्रदान करून रस्त्यावर सुरक्षित ठेवण्यास मदत करतात.

  • किमान प्रयत्नांसह मोटर इन्श्युरन्स ऑनलाईन प्राप्त करण्याचा सोपा मार्ग.
  • संपूर्ण संरक्षणासाठी सर्वसमावेशक आणि थर्ड पार्टी इन्श्युरन्स घ्या.
  • प्रवासात तुमचा वेळ वाया न घालवता किंवा फॉर्मची हार्ड कॉपी न भरता इन्श्युरन्स ऑनलाईन रिन्यू करा.
  • पूर, भूकंप, चोरी, अपघात आणि तोडफोडीसह नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींसाठी योग्य कव्हरेज मिळवा.
  • इतर पार्टीच्या नुकसानीसाठी भरपाई देण्यासाठी थर्ड-पार्टी लायबिलिटी कव्हरेजचा समावेश होतो.
  • अपघात आणि चोरीच्या बाबतीत पुरेसे पुरावे दाखवून कॅशलेस क्लेम करणे देखील सोपे आहे.
  • बहुतांश कंपन्यांकडे गॅरेजचे नेटवर्क आहे जेथे तुम्ही दुर्घटनेनंतर वाहनाच्या स्थितीचे मूल्यांकन करू शकता.
  • नो क्लेम बोनस वैशिष्ट्यामुळे वाहन मालकाला कोणत्याही वेळी क्लेम दाखल करता येतो आणि इतर इन्श्युररना हस्तांतरण करता येते.
  • सर्व मोटर इन्श्युरन्स कंपन्या कस्टमर्सना मोटर इन्श्युरन्स पॉलिसी आणि क्लेम स्थितीसंबंधी अपडेटेड ठेवण्यासाठी संपूर्ण असिस्टन्स आणि कस्टमर सपोर्ट सर्व्हिस प्रदान करतात.
  • कस्टमर्सना कोणत्याही वेळी पॉलिसीमध्ये कव्हरेज जोडण्याची अनुमती देण्यासाठी ॲड-ऑन फीचर्स देखील उपलब्ध आहेत.

 

मोटर इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी करण्याचे लाभ

काही काळापूर्वी लोकांना इन्श्युरन्स पॉलिसीबद्दल जाणून घेण्यासाठी स्टोअरला भेट द्यावी लागायची. परंतु सर्व सर्व्हिसेसच्या डिजिटायझेशनमुळे, कस्टमर्स आता ऑनलाईन मोटर इन्श्युरन्स खरेदी करू शकतात. इन्श्युरन्स मिळविण्याच्या पारंपारिक पद्धतीपेक्षा हे खूप चांगले आहे आणि तुमच्या निर्णयाची तुलना करण्यासाठी आणि ते अंतिम करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग देखील आहे.

मोटर वाहन इन्श्युरन्स ऑनलाईन मिळविण्याचे काही प्रमुख लाभ खालीलप्रमाणे.

 

  • Easy Comparison

    सोपी तुलना:

    अनेक स्टोअरला भेट देण्याऐवजी, तुम्ही शक्य तितक्या मोटर इन्श्युरन्स प्रोव्हायडर्स कडून कोटेशन मिळवू शकता आणि कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय त्यांच्या सर्व्हिसेस आणि रेट्सची तुलना करू शकता. बहुतांश कंपन्या त्यांच्या प्लॅन्ससाठी तपशीलवार स्पष्टीकरण देतात, ज्यामुळे कस्टमर्सना सहजपणे वैशिष्ट्य आणि लाभ यातील तफावत पाहणे शक्य होते.

  • Time-Saving

    वेळेची-बचत:

    मोठ्या प्रमाणात पेपरवर्क करावे लागत नाही आणि त्यामुळे वेळेचीही बचत होते! वाहन इन्श्युरन्स ऑनलाईन सर्व्हिसेस कमी तपशील संकलित करून काम करतात आणि संपूर्ण प्रक्रिया सोपी बनवतात. माहितीवर सहजपणे प्रक्रिया केली जाते आणि अधिक विलंबाशिवाय जारी केले जाते.

  • Secure Transactions

    सुरक्षित ट्रान्झॅक्शन:

    मोटर इन्श्युरन्स पॉलिसीच्या ऑफलाईन खरेदीमध्ये गोपनीय डाटा असलेल्या बऱ्याच कागदपत्रांची आवश्यकता पडते. ऑनलाईन प्रोसेसिंग ही जोखीम काढून टाकते आणि ट्रान्झॅक्शन्स डॉक्युमेंटेशन शिवाय सुरक्षित केले जातात.

  • Multiple Payment Modes

    अनेक पेमेंट पद्धती:

    बहुतांश कंपन्या इन्श्युरन्स पॉलिसीसाठी कॅशलेस ट्रान्झॅक्शन्स आणि प्रीमियम पेमेंट्स प्राप्त करण्यासाठी अनेक पेमेंट पद्धतीचा पर्याय देतात. तुम्ही आता पॉलिसी ऑनलाईन रिन्यू करू शकता.

  • Customisation Option

    कस्टमायझेशन पर्याय:

    कस्टमर्स कोणत्याही कव्हरेज प्लॅनची निवड करू शकतात आणि तुम्हाला हवे तेव्हा पॉलिसीवर ॲड-ऑन्स मिळवू शकता. तसेच, तुम्ही सर्वोत्तम प्लॅन शोधण्यासाठी विविध कंपन्यांच्या वैशिष्ट्य आणि पॉलिसीविषयी सर्व काही जाणून घेऊ शकता.

  • Transparency

    पारदर्शकता:

    गोंधळात टाकणारे मोटर इन्श्युरन्स एजंट्सशी संबंधित पारंपारिक शोध आता आवश्यक नाहीत.. खरेदीदारांना आश्वस्त करण्यासाठी एजंट अनेक गोष्टी लपवायचे. परंतु वाहन इन्श्युरन्सच्या ऑनलाईन कव्हरमध्ये सर्व प्रक्रिया आता पारदर्शक आहे

  • No Middleman

    मध्यस्थ नाही:

    वर नमूद केल्याप्रमाणे, मोटर इन्श्युरन्स एजंट किंवा थर्ड-पार्टी पॉलिसीचे प्रत्येक पैलू, नियम आणि नियमन स्पष्ट करत नाहीत.. परंतु ऑनलाईन प्रक्रिया मध्यस्थ काढून टाकते आणि सर्वोत्तम प्लॅन निवडण्याच्या मार्गातील अनिश्चितता दूर करते.

  • Immediate Policy Issuance

    तत्काळ पॉलिसी जारी करते:

    जर तुम्ही वाहन इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी केला तर सर्व डॉक्युमेंट्स प्रोसेसिंग करण्यासाठी लागणारा वेळ काही मिनिटांपर्यंत कमी होतो. तुम्ही त्वरित पॉलिसी मिळवू शकता, आणि तुम्ही सबमिट केलेले तपशील इन्श्युररकडे सेव्ह होतील

  • Convenient

    सोयीस्कर:

    तुम्ही शहराबाहेर असाल किंवा व्यस्त असाल तरीही तुम्ही घरी किंवा ऑफिसमध्ये बसूनही हवे असलेले मोटर इन्श्युरन्स कव्हरेज खरेदी करू शकता.

  • Online Renewal

    ऑनलाईन रिन्यूअल:

    ऑनलाईन मोटर इन्श्युरन्सचा महत्त्वाचा लाभ म्हणजे तुम्हाला पॉलिसीची स्थिती अपडेट केली जाईल आणि त्यामुळे एक्स्पायर होण्यापूर्वी प्लॅन रिन्यू करू शकता.

 

 

बजाज आलियान्झ मोटर इन्श्युरन्स का निवडावे?

फीचर बजाज आलियान्झ ऑफर्स
खर्चाचे कव्हर नैसर्गिक आपत्ती किंवा वाहनाच्या अकार्यक्षमतेमुळे झालेल्या अपघात आणि नुकसानीसाठी संपूर्ण संरक्षण
थर्ड पार्टी लायबिलिटी इतरांना झालेल्या नुकसानीसाठी भरपाई
वैयक्तिक लाभ अपघातामुळे गंभीर इजा किंवा कायमस्वरुपी अपंगत्व झाल्यानंतर आर्थिक सहाय्य
PA कव्हर ₹15 लाखांपर्यंत
क्लेम सेटलमेंट रेशिओ 98%
नो क्लेम बोनस 50% पर्यंत
ॲड-ऑन लाभ झिरो डेप्रीसिएशन कव्हर, ब्रेकडाउन असिस्टन्स, वाहतुकीचा लाभ, उपभोग्य कव्हर आणि खूप काही
ऑनलाईन सर्व्हिसेस पेपरलेस-डिजिटल इन्श्युरन्स ॲप्लिकेशन आणि प्रोसेसिंग, ऑनलाईन क्लेम, स्पॉट सर्व्हिसेस आणि कव्हरेज अडॉप्शन
क्लेम प्रोसेस डिजिटल - 20 मिनिटांच्या आत*

 

भारतातील मोटर इन्श्युरन्सचे प्रकार

तुम्ही खासगी कार, टू-व्हीलर किंवा कमर्शियल हेतूसाठी वाहन खरेदी करत असाल, तर मोटर इन्श्युरन्स प्लॅन्सचे विस्तृतपणे दोन प्रकारांत वर्गीकरण केले जाते:

  • सर्वसमावेशक इन्श्युरन्स पॉलिसी

    या पॉलिसीसह, तुम्ही तुमच्या मोटरबाईक, खासगी कार, स्कूटर आणि कमर्शियल वाहनांना झालेले नुकसान भरून काढू शकता.


  • थर्ड-पार्टी इन्श्युरन्स पॉलिसी

    थर्ड-पार्टी मोटर इन्श्युरन्स पॉलिसी हे दायित्व कव्हरेज आहे जे सर्व वाहनांसाठी एकसमान लागू आहे. मोटर व्हेईकल्स ॲक्ट 1988 नुसार, थर्ड पार्टी कार इन्श्युरन्स आणि बाईकसाठी थर्ड पार्टी इन्श्युरन्स भारतीय रस्त्यांवर चालणाऱ्या वाहनांसाठी अनिवार्य आहे. या नियमाचे पालन करण्यास अयशस्वी ठरलेल्या व्यक्तीस मोटर सुधारणा कायदा, 2019 नुसार मोठा दंड भरावा लागेल.


  • जेवढा प्रवास, तेवढे पेमेंट

    ही एक नवीन प्रकारची पॉलिसी आहे जी पॉलिसीधारकांना किती किलोमीटर प्रवास केला आहे, त्यानुसार पेमेंट करण्यास अनुमती देते.

या दोन मोटर इन्श्युरन्स पॉलिसीसह, वाहन इन्श्युरन्सचे प्रकार खालीलप्रमाणे वर्गीकृत केले जातात.

  • Car Insurance

    कार इन्श्युरन्स

    तुमच्या खासगी फोर-व्हीलरला सुरक्षित करण्यासाठी आदर्श निवड आहे कार इन्श्युरन्स. हा एक करार आहे, जो वाहन मालक आणि इन्श्युरन्स कंपनी दरम्यान तयार केलेला आहे जो सर्वसमावेशक पॉलिसी आणि थर्ड-पार्टी दोन्ही दायित्वाला कव्हर करतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला खालील लाभ मिळतील:

    • कॅशलेस क्लेम
    • पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर
    • हानी/नुकसान संरक्षण
    • थर्ड-पार्टी इजा आणि मृत्यूच्या क्लेमसाठी अमर्यादित दायित्व
  • Two Wheeler Insurance

    टू-व्हीलर इन्श्युरन्स

    नावाप्रमाणे, टू-व्हीलर इन्श्युरन्स किंवा बाईक इन्श्युरन्स स्कूटर, बाईक आणि अन्य टू-व्हीलर्ससाठी हा एक प्रकारचा वाहन इन्श्युरन्स आहे. टू-व्हीलरमध्ये वैयक्तिक दुखापतीची जोखीम थोडी जास्त असल्याने तुमच्या सुरक्षित राईडचा विचार या इन्श्युरन्समध्ये केला आहे.. प्लॅनमध्ये समाविष्ट केलेले लाभ:

    • सर्वसमावेशक कव्हरेज
    • 2/3 वर्षे स्वत:च्या नुकसानीसाठी मोटर इन्श्युरन्स
    • नो क्लेम बोनस संरक्षण
    • महागाई संरक्षण
  • Commercial Vehicle Insurance

    कमर्शियल व्हेईकल इन्श्युरन्स

    कमर्शियल वाहनांना नुकसानीची जोखीम खासगी वाहनांपेक्षा जास्त असते. म्हणून, कमर्शियल व्हेईकल इन्श्युरन्स दुर्घटनांमध्ये होणारे नुकसान कमी करण्यासाठी ड्रायव्हर्सना मदत करते. यामध्ये ट्रॅक्टर, क्रेन, टॅक्सी, माल वाहतुकीचे वाहन, प्रवासी वाहतुकीचे वाहन इ. वाहनांचा समावेश होतो. लाभांमध्ये खालील बाबींचा समावेश असेल:

    • दुखापत आणि मृत्यूच्या क्लेमसाठी अमर्यादित दायित्व कव्हरेज
    • पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर
    • नुकसान आणि हानी संरक्षण देऊ करते
    • इतरांच्या प्रॉपर्टीसाठी नुकसानभरपाई

    तुम्ही एक योग्य वाहन इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करू शकता, जी सर्व प्रकारच्या वाहनांना कठीण परिस्थितीत संरक्षित करते.. आग, चोरी, दरोडा, भूकंप, पूर, वादळ किंवा अपघात अशा सर्व परिस्थितीत तुम्ही सुरक्षित राहू शकता.

 

 

मोटर इन्श्युरन्स कव्हरेज



कव्हरेज थर्ड-पार्टी सर्वसमावेशक
नैसर्गिक आपत्तींसाठी नाही होय
मानवनिर्मित आपत्तींसाठी नाही होय
पर्सनल ॲक्सिडेंट कव्हरेज होय होय
थर्ड-पार्टी खर्चाचे कव्हरेज होय होय
आगीमुळे होणारे नुकसान नाही होय
इंजिन प्रोटेक्शन नाही होय
डेप्रीसिएशन संरक्षण नाही होय
सीएनजी किट कव्हर नाही अ‍ॅड ऑन
ॲक्सेसरीज कव्हरेज नाही अ‍ॅड ऑन

 

समावेश

वाहन इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी, तुम्हाला प्लॅन्ससह येणाऱ्या कव्हरेजची मर्यादा पाहणे आवश्यक आहे. बजाज आलियान्झद्वारे ऑफर केलेल्या सर्वसमावेशक पॉलिसीमध्ये समाविष्ट बाबींची यादी येथे दिली आहे. लक्षात ठेवा की सर्वसमावेशक वाहन इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये थर्ड-पार्टी दायित्व देखील संरक्षित आहे.

  • थर्ड-पार्टी कव्हरेज : थर्ड-पार्टी कव्हरेज तुमचे दायित्व पूर्ण करण्यासाठी इतर लोकांना आणि त्यांच्या प्रॉपर्टीच्या नुकसानीसाठी देय करेल

  • पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर :  कायमस्वरुपी अपंगत्व किंवा व्यक्तीचा मृत्यू झाल्यास चालक किंवा वाहन मालकाला थर्ड पार्टीला ₹ 15 लाख भरपाई देता येईल.

  • मानवनिर्मित आपत्तींमुळे होणारे नुकसान :तुमच्या वाहन इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये घरफोडी, दंगे, संप, चुकीची कृत्ये, चोरी, तोडफोड आणि यासारख्याच इतर बाबीही कव्हर केल्या जातात.
    थर्ड-पार्टी दायित्व आणि सर्वसमावेशक कव्हरेज हे सर्व वाहन मालक आणि चालकांसाठी कायद्याने गरजेचे आहे. यामध्ये खासगी कार, टू-व्हीलर आणि कमर्शियल वाहनांचा समावेश होतो. जर तुमच्याकडे ते नसेल, तर तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते. त्यामुळे, तुम्हाला शारीरिक, मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेसे कव्हरेज प्रदान करणारी पॉलिसी निवडल्याची खात्री करा.
    तुमच्या इच्छित प्लॅनच्या समावेश असलेल्या आणि नसलेल्या बाबींच्या तपशीलवार यादीसाठी, रेफर करा मोटर इन्श्युरन्स पॉलिसी वर्डिंग्ज.

IRDAI च्या नियमानंतर अपडेटेड वाहन इन्श्युरन्स कव्हर

IRDAI ने वाहन मालकांसाठी वाहन इन्श्युरन्स अधिक परवडणारा बनवण्यावर जोर दिला आहे. म्हणून, मोटर इन्श्युरन्सशी संबंधित नियम अपडेट केले जातात.

इन्श्युरन्स कव्हर IRDAI 2018 रेग्युलेशन IRDAI 2020 रेग्युलेशन
थर्ड पार्टी ओन्ली कव्हर कारसाठी 3-वर्षाचा TP इन्श्युरन्स आणि 5-वर्षाचा TP कव्हर टिकवून ठेवले
थर्ड पार्टी + सर्वसमावेशक कव्हर 3-वर्ष आणि 5-वर्ष TP + सर्वसमावेशक कव्हर 3-वर्ष आणि 5-वर्षाचे TP + 1-वर्षाच्या सर्वसमावेशक कव्हरमध्ये अपडेट केले
स्टँडअलोन सर्वसमावेशक कव्हर (TP कव्हर अनिवार्य) 3-वर्ष आणि 5-वर्षाचे सर्वसमावेशक कव्हर 1-वर्षाचे सर्वसमावेशक OD कव्हर

पॉलिसीधारकांवर परिणाम करणारे सर्वात महत्त्वाचे बदल खालीलप्रमाणे:

  • खासगी कारसाठी तीन वर्षांपर्यंतचा सम इन्श्युअर्ड रोड टॅक्स/रजिस्ट्रेशन, ऑन-रोड वाहन किंमत आणि उत्पादक ॲक्सेसरीजवर आधारित असेल.
  • जर तुम्ही भिन्न तारखेला स्टँडअलोन OD पॉलिसी खरेदी केली, तर लाँग-टर्म पॉलिसी समाप्ती तारीख आणि तर थर्ड-पार्टी समाप्ती तारीख जुळणार नाही.
  • वाहनांच्या IDV, भौगोलिक क्षेत्र, कार निर्माण, मॉडेल, इंजिन क्षमता किंवा इतर गोष्टींवर प्रीमियम आधारित असण्याऐवजी, तो वैयक्तिक चालवण्याच्या सवयीवर अवलंबून असेल.
  • IRDAI ने 20-50% च्या रिन्यूअल श्रेणीसह सर्व वाहन इन्श्युरन्स पॉलिसीसाठी नो क्लेम बोनस ग्रिडचे मानक केले आहे.
  • चोरी आणि एकूण नुकसान/कंस्ट्रक्टिव्ह टोटल लॉस क्लेम केलेले वाहनांचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट रद्द केले जाईल आणि डॉक्युमेंट्स सरेंडर केले जातील.
  • अनिवार्य वजावट आता स्टँडर्ड आहे आणि या वजावटीवर माफी कमी अस्पष्टतेसाठीही उचलली जाते.
  • क्लेम सेटलमेंट दरम्यान सेटल केलेल्या वाहनाच्या डेप्रीसिएशन मूल्याची मोजणी करण्यासाठी स्टँडर्ड ग्रिडचा प्रस्ताव आहे.
  • मोटर वाहनांमधील प्रवाशांना अपघात झाल्यास ₹25,000 वैद्यकीय खर्चाचे कव्हर मिळेल आणि ते बेसिक पॉलिसी अंतर्गत आहे.
  • पॉलिसी शेड्यूलमध्ये चालकाचा तपशील समाविष्ट करण्यासाठी खासगी कार आणि टू-व्हीलर्ससाठी नाव दिलेली चालक पॉलिसी स्वीकारली जाते.
  • इलेक्ट्रिक वाहन इन्श्युरन्स प्रीमियमला 15% सवलत मिळेल. एका कंपनीकडून दीर्घकालीन कव्हर विद्ड्रॉ करण्याची आणि दुसऱ्या कंपनीशी जोडल्या जाण्याची संधी कस्टमर-फ्रेंडली आहे. अनेक सकारात्मक बदलांमुळे आता भारतात वाहन इन्श्युरन्स निश्चितच परवडणारे झाले आहे.

मोटर इन्श्युरन्स पॉलिसी अपवाद

अपवाद जाणून घेतल्यामुळे क्लेम करताना तुम्हाला कोणत्याही आव्हानांचा सामना करावा लागणार नाही:

  • वाहनाचे डेप्रीसिएशन मोटर इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत कव्हर केले जात नाही कारण सामान्य वेअर आणि टेअर, घटकांचे वाढलेला कालावधी हे परिणामी नुकसान आहे.
  • प्रतिबंधित पदार्थांचे सेवन करून वाहन चालवल्यास तुम्ही क्लेमसाठी पात्र राहत नाही. आम्ही सर्व परिस्थितीत सुरक्षित वाहन चालविण्यास प्रोत्साहन देतो.
  • अवैध परवाना तुमच्या इन्श्युरन्स संरक्षणाला निरर्थक ठरवेल, कारण वैध परवान्याशिवाय वाहन चालविणे बेकायदेशीर आहे.
  • युद्ध, बंडखोरी किंवा आण्विक हल्ला यासारखे प्रतिकूल धोके अव्यवस्थित आणि अनियंत्रित आहेत, ज्यांना इन्श्युरन्स पॉलिसीमधून वगळण्यात आले आहे.

वाहन इन्श्युरन्स प्रीमियमवर परिणाम करणारे घटक

शॉर्ट-टर्म आणि लाँग-टर्म दोन्हीत वाहन इन्श्युरन्स प्रीमियमवर परिणाम करणारे घटक खालीलप्रमाणे.

  • मॉडेल/मेक/प्रकार: वाहनाची मूलभूत रचना, त्याचा प्रकार, इंजिनची क्यूबिक क्षमता इ. चा मोटर इन्श्युरन्स प्रीमियमवर थेट परिणाम होतो.

  • वय आणि इंजिन प्रकार : आयुर्मान हे घसारा डेप्रिसिएशन वॅल्यू आणि इन्श्युअर्ड डिक्लेर्ड वॅल्यूशी संबंधित आहे. जे वेळेनुसार वाहनाचे मूल्य कमी करते. इंजिनचा प्रकार म्हणजेच, पेट्रोल किंवा डिझेल, आयडीव्ही वर परिणाम करते, प्रीमियम वाढवते.

  • जनसांख्यिकी:अपघातांतील वाढीच्या जोखीममुळे मेट्रो क्षेत्रात कार चालवणे महाग आहे.

  • कव्हर:सर्वसमावेशक कव्हरेजमुळे तुम्हाला स्टँडअलोन थर्ड-पार्टी लायबिलिटी कव्हरेजपेक्षा जास्त खर्च होईल.

  • ॲड-ऑन्स:सिक्युरिटी वैशिष्ट्य आणि झिरो डेप्रीसिएशन, प्रवाशाचे कव्हर इ. सारखे कव्हर जोडल्यामुळे प्रीमियम रक्कम वाढेल.

  • नो क्लेम बोनस:जर तुम्ही मागील पॉलिसी कालावधीमध्ये क्लेम केला नसेल तर तुम्हाला पॉलिसी प्रीमियमवर सवलत मिळते.

  • वजावट: पूर्वनिर्धारित रक्कम देऊन मोटर इन्श्युरन्स प्रीमियम कमी करण्यासाठी तुम्हाला स्वैच्छिक वजावट निवडण्याचा पर्याय मिळेल.

  • अँटी-थेफ्ट फीचर्स:ARAI द्वारे प्रमाणित अँटी-थेफ्ट डिव्हाईस इंस्टॉलेशन तुम्हाला मोटर इन्श्युरन्स प्रीमियमवर चांगली सवलत मिळवण्यास मदत करेल.

  • विक्रेता:मोटर इन्श्युरन्स प्रीमियम कमी करण्यासाठी, एजंटकडे जाण्याऐवजी थेट विक्रेत्याकडून पॉलिसी खरेदी करा.

  • डिजिटल इन्श्युरन्स:डिजिटल-फर्स्ट प्लॅनमध्ये पॉलिसीची नवीन खरेदी आणि रिन्यूअल करण्यासाठी बाजारापेक्षा कमी किंमतीत विविध फीचर उपलब्ध आहेत.

वाहन इन्श्युरन्स कॅल्क्युलेटर कसे वापरावे?

बहुतांश कंपन्या निवडलेल्या कव्हरेजसाठी प्रीमियम रक्कम निश्चित करण्यासाठी स्टॅंडर्ड मोटर इन्श्युरन्स कॅल्क्युलेटर वापरतात. जरी विविध कंपन्या विशिष्ट निकषांचे अनुसरण करीत असल्या, तरीही आम्ही मोजणी सुलभ आणि समजण्यास सोपी केली आहे. तुम्ही तुमच्या गरजांविषयी काही आवश्यक माहिती देऊन आमच्या ऑनलाईन कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता.

नवीन कारसाठी, मोटर इन्श्युरन्स प्रीमियमची मोजणी करण्यासाठी तुम्हाला खालील माहिती द्यावी लागेल.

  • वाहन उत्पादकाचे नाव
  • कार मॉडेल
  • कारचे रजिस्ट्रेशन राज्य
  • उत्पादन वर्ष
  • कार मालकाचा तपशील

वापरलेल्या कारसाठी, वाहन इन्श्युरन्स कॅल्क्युलेटरला काही व्हेरिएबल माहितीची आवश्यकता आहे:

  • वापरत असलेल्या कारचा प्रकार आणि इंधन
  • मागील कार मोटर इन्श्युरन्स प्लॅन तपशील
  • रजिस्ट्रेशन नंबर
  • मालकी डॉक्युमेंट्स बदलणे (लागू असल्यास)
  • क्लेमचा इतिहास

या तपशिलांसह, तुम्ही खरेदी करू इच्छित असलेल्या इन्श्युरन्स कव्हरेजसाठी आम्ही सर्वोत्तम प्रीमियम मूल्य कॅल्क्युलेट करून देऊ शकतो.

वाहन इन्श्युरन्स खरेदी करताना विचारात घेण्याची गोष्टी

खरेदी करताना, सर्वसमावेशक कव्हरेजवर सर्वोत्तम रेट्स मिळविण्यासाठी तुम्ही खालील गोष्टींचा विचार करावा.

  • ✓   कव्हरेज : तुम्हाला त्वरित सर्वसमावेशक कव्हरेज हवंय की थर्ड-पार्टी लायबिलिटी कव्हरेज पाहिजे हे ठरवा. आमच्या मते, ऑनलाईन सर्वसमावेशक वाहन इन्श्युरन्स घेणे कधीही चांगले.

  • ✓   अ‍ॅड-ऑन : कंपनीद्वारे प्रदान केलेल्या ॲड-ऑन वैशिष्ट्यांविषयी जाणून घ्या आणि तुमच्या विशिष्ट प्रकरणात योग्य अतिरिक्त कव्हरेज निवडा.

  • ✓   पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर : वैयक्तिक अपघातांच्या बाबतीत तुम्ही खरेदी करत असलेली पॉलिसी तुम्हाला कव्हर करेल की नाही हे नेहमी पाहा.

  • ✓   क्लेम प्रक्रिया : तुम्हाला क्लेम दाखल करण्याच्या स्थितीत काही मुद्द्यांवर क्लेम प्रक्रिया कशी जटिल असू शकते हे जाणून घेण्यासाठी क्लेम प्रक्रियेचा अभ्यास करा.

  • ✓   गॅरेजेस : सर्व मोटर इन्श्युरन्स प्रोव्हायडर्सकडे गॅरेजचे नेटवर्क आहे, जिथे वाहन सेवा आणि दुरुस्ती स्थानिक गॅरेजपेक्षा अधिक स्वस्तात होते. तुम्ही त्यांचा विचार करायला हवा, कारण प्रवासानुसार तुमच्या वाहनाची अधिक वारंवार सर्व्हिसिंग करणे आवश्यक आहे.

  • ✓   झिरो डेप्रीसिएशन कव्हर :  शोरूममधून बाहेर पडल्यानंतर कारचे मूल्य जवळपास निम्मे होते. वाहनाचे आर्थिक मूल्य राखण्यासाठी तुम्ही डेप्रिसिएशन नंतर झालेल्या नुकसानीचा सामना करण्यासाठी झिरो डेप्रीसिएशन कव्हरची निवड करणे आवश्यक आहे.

  • ✓   NCB : कालबाह्यतेनंतर पॉलिसीचे रिन्यूवल करण्याची गरज असताना मोटर इन्श्युरन्स प्रोव्हायडर्स सर्वोत्तम नो क्लेम बोनस आणि इतर लाभ देतात का हे जाणून घ्या. तुम्ही इन्श्युरन्सचा क्लेम न करता खर्च केलेल्या प्रत्येक वर्षासह पुढील वर्षाच्या प्लॅनसाठी सवलत प्रगतीशीलपणे वाढते.

  • ✓   आयडीव्ही : केवळ विश्वसनीय इन्श्युरन्स प्रोव्हायडर तुम्हाला डेप्रीसिएशन रक्कम कपात केल्यानंतर वाहनाचे सर्वोत्तम मार्केट मूल्य देऊ करतील. यासह, तुमच्या वाहनाची चोरी किंवा एकूण हानी झाल्यास तुम्हाला भरपाई मिळू शकते ज्याला सम इन्श्युअर्ड संबोधले जाते.

  • ✓   पॉलिसी डॉक्युमेंट : पॉलिसी वाचल्याशिवाय आणि रिव्ह्यू न करता कोणत्याही डॉक्युमेंट्स वर स्वाक्षरी करू नका. डॉक्युमेंटमध्ये अनेक कलम आहेत जे तुम्हाला गोंधळात टाकू शकतात. त्यामुळे, नेहमीच डॉक्युमेंट्स काळजीपूर्वक पाहा आणि नंतरच खरेदीचा निर्णय अंतिम करा.

  • ✓   प्रीमियम्स : कंपनी तुमच्या मोटर इन्श्युरन्ससाठी ऑनलाईन प्रीमियमचे कॅल्क्युलेशन कसे करते यासाठी तपशीलवार स्पेसिफिकेशन्स विचारा. तुम्हाला शंका असणाऱ्या कोणत्याही घटका विषयी अगदी मनमोकळेपणाने विचारा.

वाहन इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स

मोटर इन्श्युरन्सचा लाभ घेण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स खाली दिली आहेत.

    • ✓ ओळखीचा पुरावा (पासपोर्ट/ड्रायव्हिंग परवाना/आधार/PAN कार्ड/सरकारने जारी केलेला फोटो ID)
    • ✓ पासपोर्ट/DL/बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक/सरकारने जारी केलेल्या फोटो ID द्वारे ॲड्रेस पुरावा
    • ✓ अलीकडील पासपोर्ट साईझ फोटो
    • ✓ वाहनचालक परवाना
    • ✓ वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट

वाहन इन्श्युरन्ससाठी ऑनलाईन अप्लाय कसे करावे

आमच्या सर्व कस्टमर्ससाठी आमच्या सर्व्हिसेस चांगल्या करण्यासाठी, आम्ही भारतातील वाहन इन्श्युरन्सच्या खरेदी आणि रिन्यूअल साठी सर्वांना काळजीपूर्वक गाईड करतो.

  • वाहन इन्श्युरन्स स्थिती तपासा

    मोटर इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम कारणांपैकी एक म्हणजे तुम्ही ऑनलाईन स्थिती तपासू शकता. इन्श्युरन्स डॉक्युमेंट्स ऑनलाईन मिळतील आणि तुम्हाला एक्स्पायरी तारखेचा अलर्ट देखील मिळेल. तुम्ही डॉक्युमेंट्समध्ये प्लॅनची सुरुवातीची आणि समाप्तीची तारीख शोधू शकता. आमच्या डिजिटल-फर्स्ट सर्व्हिससह, तुम्ही तुमचे क्रेडेन्शियल्स वापरून लॉग-इन करू शकता आणि ऑनलाईन स्थिती तपासू शकता. त्याशिवाय, स्थिती तपशिलाची विनंती करण्यासाठी तुम्ही आम्हाला कॉल करू शकता किंवा ईमेल ड्रॉप करू शकता. माहिती लवकरच तुमच्या नंबर आणि ईमेल ॲड्रेसवर पाठविण्यात येईल.

  • मोबाईल ॲपद्वारे वाहन इन्श्युरन्स ऑनलाईन प्राप्त करा

    बजाज आलियान्झ वाहन इन्श्युरन्सचे रिन्यूअल देखील मोबाईल ॲपद्वारे शक्य आहे. मोटर इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी करण्यासाठी आमच्याकडे एक समर्पित मोबाईल ॲप्लिकेशन आहे. जे वेबसाईटच्या सर्व वैशिष्ट्यांना सपोर्ट करते आणि एजंट्सशी संपर्क साधण्यासाठी एक सोपा मार्ग आहे. ॲप एन्टर करा आणि जुने पॉलिसी तपशील प्रदान करण्यासाठी ऑनलाईन रिन्यूअल फॉर्म भरा. फॉर्ममध्ये माहिती तपासा आणि डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरून अंतिम पेमेंट करा. रिन्यू केलेले पॉलिसी डॉक्युमेंट त्वरित तयार होतील. डॉक्युमेंट सेव्ह करा आणि तुमच्या सवडीनुसार प्रिंट घ्या.

  • मोटर इन्श्युरन्स ऑफलाईन प्रक्रिया

    मोटर वाहन इन्श्युरन्स मिळवण्याचा आणि रिन्यूअल करण्याचा पारंपारिक मार्ग म्हणजे या सर्व डॉक्युमेंट्स सह शाखेला भेट देणे. ऑफलाईन प्रोसेस जवळपास सारखीच आहे. यात तुम्हाला केवळ तुम्हाला डॉक्युमेंट्सची प्रत्यक्ष प्रत द्यावी लागेल. नजीकच्या शाखेमध्ये तुमची भेट शेड्यूल करा आणि चेक, डेबिट कार्ड किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे पैसे भरून योग्य कव्हरेजसह पॉलिसी खरेदी करा.

भारतात मोटर इन्श्युरन्स का अनिवार्य आहे?

हा मोटर व्हेईकल्स ॲक्ट आहे, जो भारतात ड्रायव्हिंगच्या संदर्भात नियम आणि नियमन निर्दिष्ट करतो.. देशात दरवर्षी होणाऱ्या अपघातांची संख्या विचारात घेता सर्व चालक आणि वाहन मालकांसाठी मोटर वाहन इन्श्युरन्स अनिवार्य आहे.

मोटर व्हेईकल ॲक्ट काय सांगतो?

मोटर वाहन कायद्यानुसार, सार्वजनिक जागेत कार्यरत असलेल्या सर्व वाहनांना कोणत्याही परिस्थितीत पुरेसे मोटर वाहन संरक्षण प्राप्त करणे आवश्यक आहे.. अपघात किंवा दुर्घटनांमध्ये सहभागी असलेल्या इतर लोकांना प्रदान करण्यासाठी मूलभूत मोटर इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये किमान थर्ड-पार्टी लायबिलिटी कव्हरेज असणे आवश्यक आहे.

मोटर वाहन इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्याचे प्राथमिक कारण हे अपघातानंतर होणारे खर्च कमी करणे होय.. आणि विसरू नका, भारत हा एक असा देश आहे, जिथे लोकसंख्या अनियंत्रितपणे वाढत आहे.. परिणामस्वरूप, वाहनांच्या संख्येत देखील वाढ होत आहे.. रस्त्यावर उद्भवणाऱ्या धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी, वाहन इन्श्युरन्स हा सर्वोत्तम उपाय आहे.

1988 मध्ये सुधारणा झाल्यानंतर, चालकाने परवाना, वाहन रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट, परमिट, दायित्व कव्हरेज, इन्श्युरन्स कव्हर इ. गोष्टी बाळगणे आवश्यक आहे. आणि अलीकडील बदलांनंतर, या दायित्वांची पूर्तता करण्यास अयशस्वी झाल्यास ₹ 500 ते 25,000 किंमतीच्या दंडासह डॉक्युमेंट्स देखील जप्त केले जाऊ शकतात.

मोटर इन्श्युरन्स क्लेम कसा दाखल करावा

वाहन इन्श्युरन्स क्लेम दाखल करणे तुम्ही समजता त्याप्रमाणे निश्चितच कठीण नाही. मात्र, त्यासाठी तुम्हाला योग्य इन्श्युरन्स प्रोव्हायडरची निवड करणे महत्वपूर्ण असणार आहे. तुम्हाला काळजी घ्यावयाच्या काही महत्वाच्या बाबी खालीलप्रमाणे.

 

  • ✓ तुमचा अपघात झाल्यास तत्काळ तुमच्या इन्श्युररशी संपर्क साधा आणि एफआयआर दाखल करा.
  • ✓ अपघाताचे सर्व दृश्य पुरावे सुरक्षित केल्यानंतरच वाहनाला नजीकच्या गॅरेजमध्ये वाहून नेण्यासाठी मदत मिळवा.
  • ✓ नेटवर्क गॅरेज तुम्हाला दुरुस्तीच्या अंदाजित खर्चासंदर्भात कोट प्रदान करेल.
  • ✓ तुम्हाला इन्श्युरन्स प्रोव्हायडर्सना सादर करण्यासाठी त्या बिलाची आवश्यकता आहे.
  • ✓ इन्श्युरर डॉक्युमेंट्स व्हेरिफाय करेल आणि त्यांच्या प्रमाणिततेचे मूल्यांकन करेल, आणि त्यानंतरच क्लेम प्रोसेस सुरू होऊ शकते.
  • ✓ वजावट आणि डेप्रीसिएशन मूल्याचा क्लेम केला जाऊ शकत नाही हे जाणून घ्या. केवळ उर्वरित रक्कम तुम्हाला भरपाई म्हणून भरली जाईल.
  • ✓ या सर्व गोष्टींसाठी अकाउंटिंग केल्यानंतर, तुम्हाला फॉलो करण्याची प्रक्रिया याप्रमाणे असेल.
  • स्टेप 1: क्लेमसाठी रजिस्टर करा

    क्लेमसाठी रजिस्टर करण्यासाठी आमच्या वेबसाईटवर लॉग-इन करा किंवा आमच्या टोल-फ्री नंबरवर कॉल करा. तुम्ही क्लेम करण्यात आणि आमच्याशी संपर्क साधण्यात विलंब झाल्यास, तुम्ही वापरू शकणाऱ्या पुराव्यांशी छेडछाड होण्याची संधी अधिक आहे.

  • स्टेप 2: अनिवार्य डॉक्युमेंट्स सबमिट करा

    मोटर इन्श्युरन्स क्लेम प्रोसेस कोणत्याही अडचणीशिवाय करण्यासाठी तुम्ही आमच्याकडे खालील डॉक्युमेंट्स सबमिट करणे आवश्यक आहे.

    • ✓ चेसिस आणि इंजिन नंबर
    • ✓ अपघाताची तारीख आणि वेळ
    • ✓ इव्हेंटचे लोकेशन आणि वर्णन
    • ✓ कार तपासणी ॲड्रेस
    • ✓ किलोमीटर रीडिंग्स
    • ✓ पोलीस तक्रार (अपघात आणि चोरीच्या बाबतीत)
  • स्टेप 3: क्लेम सेटलमेंट

    तुम्ही डॉक्युमेंट्स सबमिट केल्यावर आम्ही प्रोसेस सुरू करू आणि प्राप्तकर्ता पार्टीला थेट पडताळणीनंतर पैसे पाठवू.

 

मोटर इन्श्युरन्स रिन्यूअलचे महत्त्व

तुम्ही यावर विश्वास ठेवणार नाही, परंतु सर्वेक्षणानुसार, भारतातील रस्त्यांवर 60% वाहने वैध इन्श्युरन्स शिवाय चालत आहेत. आणि याचे कारण हे आहे की लोकांना मोटर इन्श्युरन्स रिन्यूअलचे महत्त्व समजले नाही. मोटर इन्श्युरन्स हा तुमच्या सुरक्षेसाठी तसेच इतरांसाठी कायदेशीर आवश्यकता आहे. मोटर वाहनांशी संबंधित जोखीम आपण विचार करतो त्यापेक्षा खूप जास्त आहेत. म्हणून, एक्स्पायर होण्यापूर्वी आम्ही तुम्हाला तुमची इन्श्युरन्स पॉलिसी रिन्यू करण्यास सांगतोय.

  • कार इन्श्युरन्स क्लेम नाकारले जात नाहीत:

    एक्स्पायर होण्यापूर्वी तुमच्या पॉलिसीचे रिन्यूअल केल्यामुळे क्लेम प्रोसेस दरम्यान तुम्हाला कोणत्याही आव्हानांचा सामना करावा लागणार नाही. पॉलिसी लॅप्स झाल्यानंतर कोणताही मोठा अपघात झाल्यास, तुमच्याकडे दुरुस्ती किंवा वैद्यकीय खर्चासह डील करण्यासाठी कोणताही बॅक-अप असणार नाही.

  • इन्श्युरन्स प्रीमियम मर्यादेत ठेवा:

    जर पॉलिसीचे विशिष्ट कालावधीत रिन्यूअल केलेले नसेल, तर वाहन इन्श्युरन्स प्राप्त करण्यासाठी तुमचे ॲप्लिकेशन नाकारले जाऊ शकतो. आणि जरी ॲप्लिकेशन स्वीकारले असेल, तरीही तुम्हाला भरपूर प्रीमियम भरावा लागेल. इन्श्युरन्सचे वेळेवर रिन्यूअल करून हे सर्वकाही टाळता येऊ शकते.

  • नो क्लेम बोनससह सेव्ह करा:

    नो क्लेम बोनस केवळ पॉलिसीधारकांना देऊ केला जातो, जे त्यांचा इन्श्युरन्स प्लॅन गंभीरपणे घेतात. जर तुमची पॉलिसी एक्स्पायर झाली असेल, वाहन मालकांसाठी अत्यंत फायदेशीर असलेली सवलत संपेल आणि तुम्हाला जास्त इन्श्युरन्स प्रीमियम भरावे लागतील.

  • रिन्यूअलसाठी सोपे इन्स्पेक्शन:

    कंपन्या वाहन इन्श्युरन्स रिन्यूअलसाठी स्टॅंडर्ड प्रक्रिया फॉलो करतात, ज्यामध्ये तुमच्या वाहनाच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठीच्या इन्स्पेक्शनचा समावेश होतो. मूल्यांकनासह, तुम्हाला किती इन्श्युरन्स कव्हरेज खरेदी करावे लागेल हे तुम्ही निर्धारित करू शकता.

  • क्विक आणि त्रास-मुक्त रिन्यूअल:

    पॉलिसी रिन्यू न केल्यामुळे इन्श्युरर कडून नकार मिळतो. नवीन इन्श्युरन्स प्रोव्हायडर प्रदाता शोधण्याचा त्रास टाळण्यासाठी तुम्हाला वेळेवर वाहन इन्श्युरन्स रिन्यूअल करणे आवश्यक आहे. आणि आमच्यावर विश्वास ठेवा, एकदा लॅप्स झाल्यानंतर तुमच्या बजेटनुसार प्रोव्हायडर मिळणे खूप अवघड आहे.

 

वाहन इन्श्युरन्स कस्टमर रिव्ह्यूज

 

4.75
आमच्या कस्टमर द्वारे दिलेले रेटिंग
832 रिव्ह्यूवर आधारित

 

सिबा प्रसाद मोहंती

कॅप्शन केलेल्या वाहनाचा अपघात 31.10.2020 रोजी झाला होता. वाहन आमच्या झोनल मॅनेजर सरांनी वापरले. अल्प कालावधीमध्ये वाहन वापरासाठी तयार होण्यासाठी तुम्ही वेळेवर आणि जलद सुरू केलेल्या कृतीचे आम्ही कौतुक करतो. सर्वांनी कृतीची प्रशंसा केली आहे.

प्रमोद चंद लाकडा

माझ्या क्लेमसाठी मला जो अनुभव आला तो मला खरोखरच आवडला. त्यामुळे कस्टमर डीलिंग व्यावसायिक तसेच मैत्रीपूर्ण होते आणि बजाज आलियान्झ डीलवरील माझा विश्वास वाढला आणि माझ्यासाठी आणि इतरांसाठी पुढील संदर्भासाठी याची नोंद घ्या.

चंदन कुमार दत्ता

मी बजाज आलियान्झ सर्व्हिसबद्दल खूपच समाधानी आहे. 2 तासांमध्ये माझा क्लेम लेटेस्ट OTS सर्व्हिसद्वारे सेटल करण्यात आला आणि सर्वेक्षक श्री. दुर्गा प्रसन्न गिरी यांनी मला उत्कृष्ट सर्व्हिस दिली .

आर गोवर्धन रेड्डी

माझ्यासारख्या सीनिअर सिटीझनला तुमच्या कर्मचाऱ्यांनी लॉकडाउन कालावधीमध्ये चांगली सर्व्हिस दिली. पुन्हा एकदा धन्यवाद. कृपया कुरिअरद्वारे पॉलिसी कॉपी पाठवा

रंगराजन शेषाद्री

सुरुवातीला लॉकडाउनच्या दरम्यान, मला वाटले की माझ्या शंकांचे प्रतिसाद देण्यासाठी कोणीही नसेल. एकदा कर्मचारी चांगले झाल्यानंतर, तुमच्या कस्टमर केअर टीमने चांगले काम केले आणि मला वाहन पॉलिसीची प्रत मिळाली. खरं तर अनेक लोकांनी माझ्या समस्येचे निराकरण झाल्याची खात्री करण्यासाठी मला कॉल केले. धन्यवाद.

पियल नाग

क्लेम सेटलमेंटचा प्रतिसाद जलद होता, विशेषत: COVID लॉकडाउन कालावधी दरम्यान. हे खूप सोपे होते..

बजाज अलायंझ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.

कॉलबॅकची विनंती

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया वैध पर्याय निवडा
कृपया निवडा
कृपया चेकबॉक्स निवडा

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

 

मोटर इन्श्युरन्स FAQS

 

 

 

   मोटर इन्श्युरन्ससाठी अप्लाय कसे करावे?

आमच्या ऑनलाईन पोर्टलचा वापर करून बजाज आलियान्झसह मोटर इन्श्युरन्ससाठी अप्लाय करण्यासाठी काही मिनिटांचा वेळ लागतो. तुम्ही आमच्या वेबसाईटद्वारे किंवा ॲपचा वापर करून फॉर्म भरू शकता आणि ॲप्लिकेशन पूर्ण करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स सबमिट करू शकता. डॉक्युमेंट्स पडताळले जातील आणि तुम्ही तुमच्या बजेटसाठी अनुकूल असलेला प्लॅन निवडू शकता आणि शक्य तितक्या जलद वाहन इन्श्युरन्स पॉलिसी अंतिम करू शकता. 

   मोटर पॉलिसी जारी केल्याचा कालावधी किती असतो?

सामान्यपणे, मोटर इन्श्युरन्स पॉलिसी एका वर्षासाठी वैध आहे. त्यानंतर, वाहन मालकाने कोणत्याही लॅप्सशिवाय देय तारखेच्या आधी पॉलिसी रिन्यू करावी; अन्यथा, ते NCB सवलत आणि प्रीमियम रेट्सवर परिणाम करेल. 

   आम्हाला कस्टमरकडून प्रस्ताव फॉर्म कधी आवश्यक आहे?

प्रपोजल फॉर्म या परिस्थितीत आवश्यक आहे:

● नवीन बिझनेस

● इतर कंपनी रिन्यूअल

● इंटरेस्ट ट्रान्सफरसाठी

● फक्त दायित्वाचे कव्हर पूर्ण पॅकेज पॉलिसीमध्ये कव्हर करण्यासाठी

● वाहनात बदल/पर्यायी व्यवस्था

● वर्तमान पॉलिसी दरम्यान किंवा रिन्यूअल दरम्यान वाहनात बदल किंवा सुधारणा 

   कव्हर नोट म्हणजे काय?

वाहन इन्श्युरन्सच्या तात्पुरते डॉक्युमेंटेशनचे वर्णन करणाऱ्या इन्श्युरन्स प्रोव्हायडर्ससाठी कव्हर नोट नेहमीचा वापरातील शब्द आहे. तुम्हाला अंतिम डॉक्युमेंट मिळवण्यापूर्वी तुमच्याकडे आगाऊ वैध इन्श्युरन्स असलेला पुरावा म्हणून ते काम करते. यामध्ये खालील तपशील जसे की नाव, ॲड्रेस, वाहन रजिस्ट्रेशन, वाहनाचा उद्देश, कव्हरची लेव्हल, पॉलिसी नंबर, समाप्ती तारीख आणि विशेष अटी यांचा समावेश होतो. 

   IDV म्हणजे काय?

IDV म्हणजे इन्श्युरन्स डिक्लेर्ड वॅल्यू, जेव्हा वाहनाचे नुकसान होते किंवा चोरीला जाते तेव्हा इन्श्युरर तुमच्या वाहनासाठी पेमेंट करीत असलेला कमाल क्लेम होय

   पूर्व-स्वीकृती इन्स्पेक्शन कधी करावे लागेल?

वाहनाचे प्री-इन्स्पेक्शन खालील परिस्थितींमध्ये केली जाते:

● ब्रेक-इन इन्श्युरन्स

● TP कव्हरचे OD कव्हरमध्ये रूपांतरण

● आयात वाहने कव्हर करते

● बाउन्स झालेल्या चेकनंतर फ्रेश पेमेंट मिळाले

● जेव्हा अंडररायटिंग विभागातील अधिकृत व्यक्ती वाहन तपासणीसाठी येते 

   मी नवीन वाहन खरेदी केल्यावर माझी मोटर इन्श्युरन्स पॉलिसी ट्रान्सफर केली जाईल का?

नाही, जर तुम्ही नवीन वाहन खरेदी केले तर तुम्हाला दोन्ही वाहनांसाठी वेगवेगळा इन्श्युरन्स घ्यावा लागेल. नियमांनुसार, तुमच्याकडे एकाच वेळी दोन वाहनांसाठी मुख्य इन्श्युरन्स पॉलिसी असू शकत नाही. तथापि, बजाज आलियान्झसह, एका पॉलिसीअंतर्गत दोन वाहनांसाठी पर्सनल ॲक्सिडेंट कव्हरची तरतूद आहे. 

   एंडोर्समेंटची आवश्यकता कधी आहे?

एंडोर्समेंट म्हणजे पॉलिसी बदलण्यासाठी प्रमाण म्हणून काम करणारे डॉक्युमेंट. जर कस्टमर कोणत्याही बदलासाठी विचारत असेल तर ते पॉलिसीच्या अटींमध्ये बदल समाविष्ट करतात आणि जारी करताना मोटर इन्श्युरन्स कंपनीशी संपर्क साधून हे केले जाते. 

   पॉलिसी रिन्यू करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत?

जर तुम्हाला पॉलिसी रिन्यू करायची असेल, तर तुम्हाला खालील डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतील:

● प्रीमियम चेक

● रिन्यूवल रिप्लाय फॉर्म

● नवीन पॉलिसीमध्ये कस्टमरला आवश्यक असलेले बदल

● जुने पॉलिसी तपशील

● वाहन रजिस्ट्रेशन नंबर

● पेमेंट तपशील

● ओळखीचा पुरावा

● ॲड्रेस आणि वाहन मालकीचा पुरावा 

   कर्मचारी भरपाई कायदा काय आहे? त्यामुळे TP इन्श्युरन्स क्लेमवर कसा परिणाम होतो?

कर्मचारी भरपाई कायद्यानुसार जर औद्योगिक अपघात किंवा व्यवसायाच्या संबंधित आजारामुळे कर्मचाऱ्याला अपंगत्व आले किंवा अचानक मृत्यू आला तर सर्व कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना भरपाई दिली जाईल. 

जेव्हा अशा दुर्दैवी घटना घडतात, जेथे तुमच्याकडून कुणाला तरी शारीरिकदृष्ट्या इजा होते आणि त्यात त्याचा मृत्यू होतो. अशावेळी तेव्हा थर्ड-पार्टी इन्श्युरन्स कव्हरेज इतर पार्टीच्या नुकसानीसाठी भरपाई देते, जे सामान्यत: न्यायालयीन कायद्यानुसार ठरवले जातात. 

   थर्ड-पार्टी मोटर इन्श्युरन्स क्लेमच्या निर्णयात न्यायपालिका कशाप्रकारे भूमिका निभावते?

मोटर व्हेईकल्स इन्श्युरन्स ॲक्ट कायद्याच्या अंमलबजावणीनंतर, संवर्धित इन्श्युरन्स प्रकरणे आणि फसवणुकीच्या वाढत्या घटना न्यायपालिकेद्वारे चांगल्या प्रकारे हाताळल्या जाऊ शकतात.. नैसर्गिक न्याय देताना न्यायपालिका बॅकलॉग क्लिअर करण्यास मदत करेल. 

   थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर म्हणजे काय? हे माझ्या मोटर इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत कव्हर केले जाते का?

थर्ड पार्टी इन्श्युरन्समध्ये थर्ड पार्टीला लाभ आणि नुकसान कव्हर मिळते. तिसरा लाभार्थी तो आहे जो ट्रान्झॅक्शनमध्ये सहभागी असलेल्या इतर दोन पार्टी व्यतिरिक्त असतो. मोटर इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत, इन्श्युअर्डला सर्वसमावेशक इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत कव्हर नसल्यामुळे अतिरिक्त थर्ड पार्टी इन्श्युरन्स मिळवावे लागेल. 

   थर्ड-पार्टी मोटर इन्श्युरन्समध्ये कोणत्या गोष्टी दुर्लक्षित राहतात?

निष्काळजीपणा म्हणजे ठरवलेल्या कर्तव्याचे उल्लंघन, ज्यामुळे दुखापत किंवा नुकसान होते. दोन प्रकारच्या निष्काळजीपणा पैकी, जेव्हा दुखापतग्रस्त इतर पार्टीला नुकसान पोहोचवतो तेव्हा सहयोगी निष्काळजीपणा होतो. अन्य पार्टीद्वारे अपघात झाला असेल आणि दुखापतग्रस्त त्यात प्रत्यक्षपणे सामील नसेल तर त्यास संमिश्र निष्काळजीपणा म्हणतात. 

   माझ्या वाहन इन्श्युरन्स प्लॅन अंतर्गत माझा नो क्लेम बोनस (NCB) ट्रान्सफर करण्यायोग्य आहे का?

होय, जर तुम्ही मागील इन्श्युरन्स वाहन कंपनीकडून नो क्लेम बोनस जमा केला असेल, तर NCB लाभ बजाज आलियान्झ मोटर इन्श्युरन्समध्ये ट्रान्सफर केले जाऊ शकतात.. तथापि, लाभ ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला केवळ 90 दिवस मिळतील. 

   वाहनाचा अपघात/चोरी झाल्यास मी काय करावे?

तुम्ही सर्वप्रथम कोणती गोष्ट करावी, तर तुमचे वाहन चोरीला गेलेल्या ठिकाणी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये FIR रजिस्टर करावे. त्यानंतर तुम्ही इन्श्युरन्स कंपनीकडे क्लेम करू शकता. तथापि, त्यासाठी तुम्हाला FIR आणि क्लेम डॉक्युमेंट्स सह अनेक आवश्यक डॉक्युमेंट्स सबमिट करणे आवश्यक आहे. तुम्ही ऑनलाईन क्लेम सबमिट करू शकता, प्रतिनिधीला विचारू शकता किंवा आम्हाला कॉल करू शकता. 

   मी माझ्या वाहनाचा इन्श्युरन्स रिन्यू कधी व का करावा?

सध्याची इन्श्युरन्स पॉलिसी एक्स्पायर होण्यापूर्वी तुमचा इन्श्युरन्स रिन्यू करणे कधीही उत्तम. इन्श्युरन्स पॉलिसी रिन्यू करणे आवश्यक आहे. कारण ते तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या नुकसानीपासून किंवा तुमच्या इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये कव्हर केलेल्या प्रसंगात वाहनाला सुरक्षित ठेवण्यास मदत करते. 

   मोटर इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्यासाठी कोणते पात्रता निकष आहेत?

मोटर इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्यासाठी कोणतीही विशेष अट नाही.. जर तुमच्याकडे कायदेशीररित्या प्राप्त झालेले वाहन असेल, तर तुम्ही बजाज आलियान्झकडून कोणत्याही प्रकारची मोटर इन्श्युरन्स पॉलिसी मिळवण्यास पात्र आहात. 

   भारतातील मोटर इन्श्युरन्सचे मूलभूत वर्किंग मॉडेल काय आहे?

मोटर इन्श्युरन्स पॉलिसी भारत एका सोप्या आणि प्रभावी सिस्टीम अंतर्गत काम करते. सुरुवातीला, खरेदीदाराला इन्श्युररकडून इन्श्युरन्स पॉलिसी मिळते आणि वाहनाला नुकसान झाल्यास पॉलिसीधारक क्लेम करून इन्श्युरर द्वारे त्याची पडताळणी करण्याची प्रतीक्षा करतो आणि त्यानंतर त्याला मंजुरी मिळते. इन्श्युरन्स कंपनी खरेदीच्या वेळी ठरवलेल्या अटी व शर्तींनुसार क्लेम सेटल करते. 

   भिन्न इन्श्युरन्स प्रदाता तसेच भिन्न इन्श्युरन्स प्लॅनमध्ये बदलणे शक्य आहे का?

अन्य इन्श्युरन्स प्लॅन निवडणे आणि भिन्न इन्श्युररकडून सर्व्हिसेस मिळवणे शक्य आहे पण तुमच्याकडे आधीच इन्श्युरन्स पॉलिसी असेल तरच ते केले जाऊ शकत नाही. पॉलिसी रिन्यू करताना तुम्ही पॉलिसी आणि प्रोव्हायडर बदलू शकता. 

   ऑनलाईन वाहन इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी प्रक्रियेसाठी किती वेळ लागेल?

ऑनलाईन इन्श्युरन्स खरेदी प्रक्रिया हा इन्श्युरन्स मिळविण्यासाठी सर्वात जलद आणि सर्वात सोपा मार्ग आहे.. ऑनलाईन वाहन इन्श्युरन्स खरेदी करण्यासाठी केवळ 3 ते 5 मिनिटे लागू शकतात. परंतु, तुम्हाला प्लॅन खरेदी करण्यापूर्वी तुमचा रिसर्च करणे आवश्यक आहे. 

   मोटर इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये काय कव्हर होते?

मोटर इन्श्युरन्स पॉलिसी कव्हर अंतर्गत इन्श्युअर्डला खालील मिळू शकते;

● त्यांच्या स्वत:च्या वाहनाच्या नुकसानीसाठी कव्हर.

● पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर

● प्रवाशांसाठी पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर

● तिसर्‍या व्यक्तीचा मृत्यू किंवा शारीरिक इजा

● थर्ड पार्टी प्रॉपर्टीला नुकसान

   इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक ॲक्सेसरीज वाहन इन्श्युरन्स अंतर्गत कव्हर केले जातात का?

ऑनलाईन वाहन इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत, युजरना इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक ॲक्सेसरीजसाठी कव्हर मिळू शकते, परंतु सध्याच्या इन्श्युरन्स पॉलिसीच्या अतिरिक्त ॲड-ऑन कव्हरसह. 

   मोटर इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत कोणत्या सवलतीची परवानगी दिली जाऊ शकते?

अंध, अपंग किंवा दिव्यांग व्यक्तींना विशेषत: डिझाईन केलेल्या आणि सुधारित वाहनांसाठी सवलत देण्यात आली आहे.. त्यामुळे, हे व्यक्ती कमी प्रीमियमवर मोटर इन्श्युरन्स पॉलिसी ऑनलाईन खरेदी करू शकतात. 

   मोटर इन्श्युरन्स अंतर्गत उपलब्ध अतिरिक्त PA कव्हर काय आहेत?

भारतातील मोटर इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत, अतिरिक्त PA कव्हरमध्ये समाविष्ट आहे;

● मालक, चालक आणि पगारी ड्रायव्हरसाठी PA. याव्यतिरिक्त, तुम्ही नाव नसलेल्या व्यक्तींसाठी आणि नाव दिलेल्या व्यक्तींसाठीही PA कव्हर मिळवू शकता. 

   जेव्हा मी माझे वाहन विक्री करेल तेव्हा माझी मोटर इन्श्युरन्स पॉलिसी ट्रान्सफर केली जाईल का?

अन्य व्यक्तीच्या नावावर वाहन इन्श्युरन्स ट्रान्सफर करणे शक्य आहे.. तथापि, ट्रान्सफरच्या तारखेपासून वाहन ट्रान्सफर केल्यानंतर ते केवळ 14 दिवसांच्या आत केले जाऊ शकते. जर सध्याचा मालक नवीन कार खरेदी करून इन्श्युरन्स नवीन वाहनावर ट्रान्सफर करू इच्छित असेल तर ट्रान्सफर केलेल्या वाहनाच्या मालकाला नवीन ऑनलाईन मोटर इन्श्युरन्स पॉलिसी मिळवावी लागेल. 

   मला विविध वाहनांसाठी अनेक PA कव्हरची गरज आहे का?

नाही, नवीन IRDAI च्या नियमांनुसार, अनेक वाहन मालक मोटर इन्श्युरन्स खरेदी करताना स्टँडअलोन पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर घेऊ शकतात. 

   मोटर TP इन्श्युरन्समध्ये 'फॉल्टी आणि नो फॉल्टी लायबिलिटी' म्हणजे काय?

नो फॉल्ट लायबिलिटी मोटर इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत, अपघात झाल्यास दावेदारास त्याची किंवा वाहनाची चूक किंवा निष्काळजीपणा सिद्ध करण्याची गरज नाही. नवीन मोटर इन्श्युरन्स कायद्यानुसार नो फॉल्ट लायबिलिटी वाहन इन्श्युरन्सचा क्लेम मृत्यू झाल्यास 5 लाख आणि दुखापत झाल्यास 2.5 लाख पर्यंत वाढवले आहेत. फॉल्ट लायबिलिटी अंतर्गत, इन्श्युरन्स लाभ मिळविण्यासाठी क्लेम करताना निष्काळजीपणा आणि डिफॉल्ट सिद्ध करणे आवश्यक आहे. 

   लाँग टर्म मोटर इन्श्युरन्स पॉलिसीची फीचर्स कोणती आहेत?

लाँग टर्म इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत इन्श्युअर्ड वाहनाशी संबंधित थर्ड पार्टी वाहन इन्श्युरन्स कव्हरेजचे सर्व लाभ क्लेम करू शकतात. त्याशिवाय या इन्श्युरन्स कव्हर अंतर्गत, इन्श्युअर्डला पॉलिसीअंतर्गत मिळणार्‍या जोखीम साठी त्वरित सुरुवात केल्यास लाभ मिळतील. लाँग टर्म ऑनलाईन मोटर इन्श्युरन्स पॉलिसी कारसाठी तीन वर्ष आणि टू-व्हीलरसाठी पाच वर्षांसाठी घेतली जाऊ शकते. 

   जर वाहन इतरांच्या नावे रजिस्टर केले असेल, परंतु माझ्याद्वारे चालविले जात आणि प्रीमियम देखील मी भरले जात असेल, तर मला पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर मिळेल का?

नियमांनुसार, पर्सनल ॲक्सिडेंट कव्हरमध्ये मालक-ड्रायव्हरकडून झालेल्या नुकसान आणि दुखापतींचा समावेश होतो. जर वाहनाचा अन्य चालक असेल, तर इन्श्युअर्डला अतिरिक्त प्रीमियम द्यावे लागणारे अतिरिक्त पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर खरेदी करावे लागेल. 

   वाहनाचे मूल्य (IDV - इन्श्युअर्ड डिक्लेर्ड वॅल्यू) कसे निर्धारित केले जाते?

वाहनाचे IDV कॅल्क्युलेट करण्यासाठी, आम्हाला तीन गोष्टी पाहणे आवश्यक आहे;

● उत्पादकाची लिस्टेड कार किंमत (ब्रँड आणि मॉडेलनुसार)

● वाहन इन्श्युरन्स पॉलिसीची सुरुवात (नवीन किंवा रिन्यूअल)

● डेप्रीसिएशन 

वाहनाच्या IDV च्या कॅल्क्युलेशनमध्ये, साईड कार आणि इतर ॲक्सेसरीजचा लिस्टिंगच्या किंमतीमध्ये समावेश करू नये. 

   माझ्या वाहनासाठी प्रीमियम काय असेल?

वाहन इन्श्युरन्स प्रीमियमच्या कॅल्क्युलेशनमध्ये खूप काही गोष्टींचा समावेश होतो.

● प्रकार

● मेक

● वापर (किलोमीटर चालवलेले)

● क्युबिक कॅपासिटी

● रजिस्ट्रेशन तारीख आणि ठिकाण

● मागील क्लेम

   मला माझ्या वाहनासाठी इन्श्युरन्स प्रीमियम कसा कमी करता येईल ?

सर्वात किफायतशीर वाहन इन्श्युरन्स पॉलिसी प्रीमियमसाठी, विविध ऑफर आणि इन्श्युरन्स प्लॅनची तुलना करा.. याव्यतिरिक्त, संपूर्ण कालावधीत इन्श्युरन्सच्या लाभासाठी क्लेम न केल्यास पुढील पॉलिसीसाठी प्रीमियम कमी होण्यास मदत होते.. अखेर सुरक्षा डिव्हाईस असलेल्या गाड्या आणि चांगले ड्रायव्हिंग रेकॉर्ड असलेल्या ड्रायव्हरना कमी प्रीमियम भरावा लागेल. 

   माझ्या मोटर इन्श्युरन्स प्रीमियमवर GST कसे परिणाम करते?

कार इन्श्युरन्स प्रीमियमवर 18% GST लागतो. यापूर्वी सर्व्हिस टॅक्स असताना, इन्श्युरन्स प्रीमियम 15% होता. परंतु GST नुसार, युजरला मागील स्कीमपेक्षा 3% जास्त टॅक्स भरावा लागेल. 

   अपघातात पादचारी जखमी झाल्यास मी वाहन इन्श्युरन्स क्लेम करावा का?

जखमी व्यक्तीची काळजी घेण्याव्यतिरिक्त, तुम्हाला अपघाती जागा सुरक्षित करणे आणि वाहनाची आणि जखमी व्यक्तींचे पुरेसे फोटो घ्यावे लागतील.. पोलिसांना सूचित करा आणि अपघाताच्या जागेपासून दूर पळू नका, कारण हे अपराधीपणाची कबुली देते आणि तुमच्या पॉलिसीवर सर्वसमावेशक क्लेम सांगण्यास प्रवृत्त करते. प्रोसेस फॉलो करून तुम्हाला सहयोगी क्लेम करण्याची संधी आहे. 

   या वाहन इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत कोणत्या प्रकारचे इव्हेंट किंवा नुकसान कव्हर केले जात नाहीत?

मोटर इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत, तुम्हाला खालील कारणांमुळे झालेल्या नुकसानीसाठी लाभ प्राप्त होणार नाहीत:

● ब्रेकडाउन (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल)

● जास्त वयामुळे वाहनाची स्थिती खराब झाल्यास

● डेप्रीसिएशन आणि परिणामी नुकसान

● जाणीवपूर्वक केलेल्या अपघातांमुळे झालेले नुकसान

● प्रभावाखाली वाहन चालवण्यामुळे झालेले नुकसान

● परवाना शिवाय वाहन चालवल्यामुळे झालेले नुकसान

   मी वाढीव कालावधीमध्ये माझ्या वाहन इन्श्युरन्स पॉलिसीचा क्लेम करू शकतो/शकते का?

वाढीव कालावधी म्हणजे इन्श्युररकडून इन्श्युअर्डला प्रीमियम वेळेवर भरला नसल्यामुळे दिलेली वाढ होय. तथापि, वाढीव कालावधी दरम्यान इन्श्युअर्ड क्लेम करू शकत नाही, कारण वाढीव कालावधीमध्ये कोणतेही कव्हरेज प्रदान केले जात नाही. 

   मी वाहन इन्श्युरन्स क्लेम दाखल केल्यानंतर क्लेम सेटलमेंटला किती वेळ लागतो?

इन्श्युरन्स कंपनी प्रोव्हायडरद्वारे प्रदान केलेला क्लेम सेटल करण्याचा आदर्श कालावधी 14 ते 28 दिवस आहे. परंतु ते क्लेमची परिस्थिती आणि सध्याच्या अटींवर देखील अवलंबून असते. 

   जर माझी मोटर इन्श्युरन्स पॉलिसी एक्स्पायर झाली तर काय होईल?

जर तुमचे वाहन इन्श्युरन्स एक्स्पायर झाले असेल, तर तुम्हाला त्वरित नवीन पॉलिसी मिळवण्याचा सल्ला दिला जातो. इन्श्युरन्स पॉलिसीशिवाय भारतातील रस्त्यांवर गाडी चालविण्याची अनुमती नाही. सर्वोत्तम पद्धत म्हणजे तुमची इन्श्युरन्स पॉलिसी एक्स्पायर होण्यापूर्वी रिन्यू करणे, परंतु एक्स्पायर झाल्यानंतर तुम्ही पुन्हा ते सुरू करू शकता. 

 

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

  • निवडा
    कृपया निवडा
  • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

आमच्यासह चॅट करा