रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सेवा: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

ENG

Claim Assistance
Get In Touch
1 Crore Health Insurance
मार्च 17, 2021

1 कोटी हेल्थ इन्श्युरन्स

आपण जीवघेण्या आजारांच्या युगात प्रवेश करीत असल्यामुळे स्वत:चे आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करणे ही काळाची गरज बनली आहे. या महत्त्वपूर्ण काळात हेल्थ इन्श्युरन्स बचावात्मक लस म्हणूनच कार्य करते. ज्याद्वारे आपल्या आर्थिक आरोग्याचे संरक्षण होते. 1 कोटी हेल्थ इन्श्युरन्स म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम टर्म हेल्थ इन्श्युरन्स समजून घेणे महत्त्वाचे आहे. हेल्थ इन्श्युरन्स हा एक इन्श्युरन्स आहे जो तुमच्या वैद्यकीय उपचारांचा समावेश करतो जसे की अवयव प्रत्यारोपण, केमोथेरपी, डायलिसिस, आपत्कालीन हॉस्पिटलायझेशन इ.

1 कोटी हेल्थ इन्श्युरन्स म्हणजे काय?

आपणा सर्वांना माहित आहे की हेल्थ इन्श्युरन्स काय आहे. त्यामुळे आपण समजून घेऊ या 1 कोटीचा हेल्थ इन्श्युरन्स काय आहे. हेल्थ इन्श्युरन्समध्ये ₹1 लाख पासून सुरू होणारे अनेक कव्हरेज आहेत. या आधुनिक काळात, वैद्यकीय उपचारांचा खर्च गेल्या दशकाच्या तुलनेत अधिक महागला आहे. भारतात मोठ्या प्रमाणात लोक सार्वजनिक आरोग्यसेवेच्या उपचारांसाठी खासगी आरोग्यसेवेला प्राधान्य देतात. अशा प्रकारे, 1 कोटी हेल्थ इन्श्युरन्स एक सामान्य आवश्यकता बनली आहे. कारण लोक केवळ स्वत:लाच कव्हर करत नाहीत तर त्यांच्या कुटुंबालाही कव्हर करतात. पुरेसे हेल्थ इन्श्युरन्स कव्हर न निवडण्याद्वारे अनेक लोक त्यांचे आयुष्य आणि त्यांच्या कुटुंबाचे जीवन जोखीममध्ये घालतात. याव्यतिरिक्त, पर्याप्त प्लॅनची निवड न केल्यानंतर कर्करोग किंवा डायलिसिस सारखे प्रमुख रोग किंवा आजारांना सामोरे जावे लागल्यास मोठा आर्थिक ताण सहन करावा लागू शकतो. त्यामुळे एकदा आजाराचे निदान झाल्यावर 1 कोटी हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन खरेदी करणे तुम्हाला मदत करणार नाही. उदाहरणार्थ, तुम्ही कारमध्ये प्रवास करीत आहात आणि अपघात झाला. अपघातात मोठ्या प्रमाणात इजा झाल्यामुळे त्वरित शस्त्रक्रियेची गरज भासते. तुमच्या शस्त्रक्रियेसाठी एकूण खर्च ₹30 लाख आहे. जो तुमच्या सध्याच्या इन्श्युरन्स प्लॅनच्या कव्हरच्या तुलनेत अधिक आहे. अशा परिस्थितीत, 1 कोटी हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन तुमच्या मदतीला येतो जो अशा अनपेक्षित परिस्थितीसाठी सर्व खर्च कव्हर करण्याची शक्यता आहे. सामान्यपणे, लोक कमी इन्श्युरन्स प्रीमियम. पेमेंटसाठी कमी किंमतीचा प्लॅन निवडण्याचा निर्णय घेतात. हजार रुपयांचा फरक असताना ते दुर्लक्ष करतात की जर मोठे संकट आल्यास लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागू शकतो. 1 कोटी हेल्थ इन्श्युरन्सच्या काही सर्व साधारण लाभांमध्ये रुग्णवाहिका कव्हर, इनपेशंट हॉस्पिटलायझेशन, सम इन्श्युअर्डचे ऑटोमॅटिक रिस्टोरेशन, रिन्यूवल योग्यता, नो क्लेम बोनस, हॉस्पिटलायझेशन पूर्वी आणि नंतर खर्च इ. समाविष्ट आहे. नवीन 1 कोटी वैयक्तिक आणि फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये डे-केअर प्रक्रिया जसे की मोतीबिंदू, सांधे उपचार, पित्ताशय काढणे, स्नायू उपचार इ. बाबींचा समावेश होतो.. सध्याच्या काळात 1 कोटी हेल्थ इन्श्युरन्स कव्हर केवळ तुमचे नव्हे तर तुमच्या प्रियजनांचे देखील सरंक्षण करतो. भविष्य अनिश्चित आहे. त्यामुळे उपचारापेक्षा प्रतिबंध निश्चितच चांगला आहे!!  

एफएक्यू:

  1. 1 कोटी इन्श्युरन्स प्लॅन प्राधान्याने कुणी खरेदी करायला हवा? हा प्लॅन खरेदीची आवश्यकता यांच्यासाठी:

    • जर कुटुंबात गंभीर आजार असेल तर
    • जर तुमचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त असेल
    • जर तुमच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असेल आणि कमावणारे एकमेव व्यक्ती असाल
  2. मला आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत दरवर्षी हेल्थ इन्श्युरन्ससाठी प्रीमियम भरावा लागेल का?

    • नाही, तुमच्याकडे 5/8/12/15 वर्षे यासारख्या कालावधीसाठी स्वतंत्रपणे पेमेंट कालावधीची निवड करण्याचा पर्याय आहे.
  3. 1 कोटी हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन का निवडावा?

    • कल्पना करा की तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्याला जीवघेण्या आजाराचे निदान होते. त्यादरम्यान पुरेश्या प्रमाणात पैशांचे व्यवस्थापन करणे आव्हानात्मक ठरते. अशावेळी पर्याप्त कव्हर खरेदी न केल्याची खंत करण्याशिवाय पर्याय राहत नाही. पश्चातापापेक्षा सुरक्षित राहणे चांगले.
  4. मला धुम्रपान करण्याची आणि तंबाखू खाण्याची सवय आहे. इन्श्युरन्स माझ्यासाठी उपलब्ध आहे का?

    • होय, तुमच्याकडे कोणती सवय असली तरीही, तुम्ही हेल्थ इन्श्युरन्स घेऊ शकता.
  5. माझे स्वत:चे पैसे न देता इन्श्युरन्स घेण्याचा मार्ग आहे का?

    • होय, कॅशलेस ही एक सुविधा उपलब्ध आहे. जिथे कस्टमरला एकही पैसा देण्याची गरज भासत नाही आणि बिल इन्श्युरन्स कंपनीद्वारेच सेटल केले जाते.
  6. रिन्यूवल तारीख चुकल्यास काय होईल?

    • सुदैवाने जर रिन्यूवल तारीख चुकली असेल तर तुम्ही पुढील 30 दिवसांमध्ये रिन्यू करू शकता. जिथे तुम्हाला मागील पॉलिसीप्रमाणेच समान लाभ मिळतील. कृपया लक्षात घ्या की अतिरिक्त 30 दिवसांमध्ये क्लायंट कोणत्याही क्लेमसाठी कव्हर करीत नाही.
  7. जर मी 1 कोटी हेल्थ इन्श्युरन्स खरेदी केला तर मी एकाच वेळी किती क्लेम करू शकतो याची कोणतीही मर्यादा आहे का?

    • नाही, एकाच वेळी किती क्लेम करू शकतो यावर कोणतीही मर्यादा नाही. तुमची सम इन्श्युअर्ड मर्यादा पूर्ण होईपर्यंत तुम्ही क्लेम करू शकता.
  8. ऑनलाईन हेल्थ इन्श्युरन्स घेण्यासाठी कोणताही इन्कम टॅक्स लाभ आहे का?

    • स्वत:, पती/पत्नी आणि मुलांसाठी 80D अंतर्गत 25000 पर्यंत कपात आहे. जर पालक 60 पेक्षा कमी वयाचे असल्यास अतिरिक्त 25000 आणि 60 पेक्षा अधिक वयाचे असल्यास पालकांना अतिरिक्त 50,000 कपात उपलब्ध आहे.
  9. ऑनलाईन हेल्थ इन्श्युरन्स आणि प्रत्यक्ष खरेदी यामध्ये कोणता फरक आहे?

    • बेसिक कव्हरेज ऑनलाईन किंवा ऑफलाईन समानच आहे, परंतु असे असू शकते की ऑनलाईन हेल्थ इन्श्युरन्स मध्ये पारंपारिक इन्श्युरन्सपेक्षा विभिन्न डील्स असू शकतात.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत