Loader
Loader

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी

आपल्या आरोग्यामध्ये गुंतवणूक करा आणि सुरक्षित रहा

सर्वसमावेशक हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स
Port Health Insurance Policy

तुमच्यासाठी हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी

कृपया नाव एन्टर करा
/health-insurance-plans/individual-health-insurance-plans/buy-online.html कोटेशन मिळवा
कोटेशन पुन्हा मिळवा
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा
सबमिट करा

तुमच्यासाठी यामध्ये काय आहे?

Cashless Facility hospitals

कॅशलेस ट्रीटमेंट
6500 + नेटवर्क हॉस्पिटल्स मध्ये

इन-हाऊस हेल्थ
ॲडमिनिस्ट्रेशन टीम

कॅशलेस प्रतिसाद वेळ
60 मिनिटांमध्ये

हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी म्हणजे काय?

हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी संकल्पना समजून घेण्यासाठी सर्वप्रथम 'पोर्टेबल' म्हणजे काय ते जाणून घेणे आवश्यक आहे. पोर्टेबल अशा अर्थाने वापरले जाते. ज्या गोष्टी सहजपणे कुठेही घेऊन जाऊ शकतो व कुठूनही आणू शकतो. याठिकाणी इन्श्युरन्स पोर्टेबिलिटीचा अर्थ पॉलिसीच्या अशा अधिकाराशी आहे. जो पॉलिसीधारकाला (कौटुंबिक कव्हरसह) प्राप्त होतो.

हा पर्याय इन्श्युअर्ड व्यक्तीद्वारे सध्याच्या कंपनीकडून नवीन इन्श्युरन्स कंपनीकडे स्विच करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. इन्श्युरन्स कंपनी बदलाची कोणती कारणे प्रामुख्याने महत्वपूर्ण ठरतात? वेगवेगळ्या इन्श्युरन्स कंपनीकडून चांगल्या ऑफरिंग यासहित अनेक कारणे इन्श्युरन्स प्रोव्हायडर्सच्या बदलासाठी कारणीभूत ठरतात.

त्यामुळे, कोणताही इन्श्युरन्स खरेदी करताना कोणत्याही व्यक्तीला विविध कंपन्यांद्वारे ऑफर केलेल्या सर्वोत्तम पर्यायांची निवड करण्याचा अधिकार सुलभ केला आहे. मार्केटमध्ये अनेक इन्श्युरन्स कंपन्या उपलब्ध आहेत. त्यामुळे हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी तुमच्यासाठी सर्वोत्तम ट्रंप कार्ड ठरु शकते.

<

← स्वाईप/स्क्रोल →

>

बजाज आलियान्झ मध्ये हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी का पोर्ट करावी आणि त्याचे फायदे काय?

A हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती सारख्या गंभीर परिस्थितीत तुमच्या आर्थिक खर्चाची देखरेख करणारी गुंतवणूक म्हणून कार्य करते. परंतु जेव्हा मार्केटमध्ये एकाधिक इन्श्युरन्स कंपन्यां असतात. तेव्हा नेमकी कशाची निवड करावी यावरुन खरेदीदारामध्ये मोठा गोंधळ असतो. बजाज आलियान्झ अंतर्भृत लाभ आणि कव्हरेज प्लॅन्ससह विविध हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी ऑफर करतो.

बजाज आलियान्झ कडून हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्याचे लाभ

  • बजाज आलियान्झ 6,000 हून अधिक हॉस्पिटल्स सोबत सहयोग आहे आणि तुम्हाला कॅशलेस हेल्थ इन्श्युरन्स क्लेम सुविधा प्रदान करते.
  • क्लेम सेटलमेंट सर्व्हिससाठी फोनवर 24/7 असिस्टन्स उपलब्ध आहे.
  • इन-हाऊस हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम (HAT) जलद आणि अधिक कार्यक्षम क्लेम सेटलमेंटसाठी सक्षम करते.
  • पॉलिसीधारकाला त्यांच्या ॲप-इन्श्युरन्स वॉलेटद्वारे क्लेम रजिस्टर करण्याची परवानगी असलेले हेल्थ सीडीसी लाभ आहे.
  • कस्टमरला 100% पर्यंतच्या प्रत्येक क्लेम-फ्री वर्षासाठी 10% संचयी बोनस लाभ देऊ केला जाते.
  • इन्श्युअर्ड मुलासह डेली कॅश लाभ दिला जातो.
  • बजाज आलियान्झची पॉलिसी इन्श्युअर्ड रकमेपर्यंत अवयव दात्याचा खर्च कव्हर करते.
  • हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी व रिन्यू करण्यासाठी प्रोसेस ऑनलाईन सुद्धा आहे. त्यामुळे किचकट पेपरवर्कचे अडथळे दूर होत असल्यामुळे वेळेत मोठी बचत होते.
  • याद्वारे बॅरिएट्रिक सर्जरी सारख्या जटिल प्रक्रियेसाठी कव्हरेज लाभ प्रदान करते.
  • इन्श्युरन्स कंपन्या हेल्थ इन्श्युरन्स तज्ज्ञांद्वारे त्यांच्या शंकांचे प्रभावी आणि जलद निराकरण प्राप्त करू शकता.
  • आयकर कायद्याच्या कलम 80D अंतर्गत कपातीसह रु. 100,000 पर्यंत टॅक्स सुटीचा लाभ देखील प्रदान केले जातो. 

बजाज आलियान्झ द्वारे ऑफर केलेले कव्हरेज

  • बजाज आलियान्झ त्यांच्या कस्टमरला रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच्या आणि नंतरच्या खर्चासाठी कव्हरेज प्रदान करते.
  • मातृत्व आणि नवजात बाळाच्या खर्चासाठी कव्हरेज प्लॅन ऑफर केला जातो.
  • यामध्ये इन-हॉस्पिटल खर्च, खोलीचे भाडे आणि बोर्डिंग खर्चासाठी देखील कव्हरेज प्रदान केले जाते.
  • बजाज आलियान्झकडून खरेदी केलेली हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला आयुर्वेद, योग आणि होमिओपॅथी सारख्या पर्यायी उपचारांसाठी कव्हरेज प्रदान करते.
  • डॉक्टरांचे कन्सल्टेशन आणि ॲम्ब्युलन्स शुल्क देखील बजाज आलियान्झ द्वारे प्रदान केलेल्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये कव्हर केले जातात. 

तुम्ही तुमच्या हेल्थ पॉलिसीमध्ये पोर्ट करू शकणाऱ्या गोष्टींची यादी

जेव्हा तुम्ही हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करता, तेव्हा स्पष्टपणे समजून घेण्याची गरज असलेल्या विविध गोष्टी आहेत. तुम्ही तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये पोर्ट करू शकणाऱ्या गोष्टींविषयी जाणून घेण्यासाठी खाली नमूद केलेली सूची आहे.

  1. तुम्ही तुमचे सध्या इन्श्युअर्ड सदस्य पोर्ट करू शकता.
  2. तुम्ही विशिष्ट आजारांसाठी प्रतीक्षा कालावधी देखील पोर्ट करू शकता.
  3. प्रतीक्षा कालावधी आधीच अस्तित्वात असलेले आजार यांचा देखील पोर्टिंग लिस्ट मध्येही समावेश केला जाऊ शकतो.
  4. सध्याची इन्श्युअर्ड रक्कम देखील पोर्ट करू शकता.
  5. जर तुम्ही तुमचा मातृत्व लाभ प्रतीक्षा कालावधी निवडला असेल तर ते देखील पोर्ट केले जाऊ शकते.
  6. तुमचा संचयित संचयी बोनस देखील या यादीमध्ये जोडला जाऊ शकतो.

 

हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटीसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स

हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटीचा लाभ घेताना, इन्श्युरन्स कंपनीकडे खालील डॉक्युमेंट्स सबमिट करा. आवश्यक डॉक्युमेंट्स उल्लेख करणारी सूची खाली दिली आहे. 

  1. तुम्हाला मागील पॉलिसी डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतील. सातत्यपूर्ण वर्षांची संख्या सबमिट केलेल्या पॉलिसींच्या अधीन असेल.
  2. प्रपोजल फॉर्म देखील आवश्यक आहे.
  3.  तुम्हाला मागील क्लेमचा तपशील सबमिट करण्यास सांगितले जाईल.
  4. वयाचा पुरावा दाखवण्यासाठी डॉक्युमेंट्स.
  5. तपासणी, डिस्चार्ज कार्ड, रिपोर्ट, नवीनतम प्रीस्क्रिप्शन आणि क्लिनिकल स्थिती यासारख्या कोणत्याही सकारात्मक घोषणापत्र असल्यास तुम्हाला विचारले जाईल.

हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी ऑनलाईन पोर्ट कशी करावी?

पॉलिसीधारकाला विद्यमान इन्श्युरन्स पॉलिसी दुसऱ्या इन्श्युरन्स कंपनीकडे पोर्ट करण्याचा हक्क असला तरीही, ती करण्याची प्रोसेस थोडी गुंतागुंतीची आहे. त्यामुळे, बजाज आलियान्झ द्वारे ऑफर केलेली पोर्टेबिलिटी प्रोसेस तुमचा अनुभव सुलभ करण्यासाठी आणि एका इन्श्युरन्स कंपनीकडून दुसऱ्या इन्श्युरन्स कंपनीकडे सुरळीत ट्रान्झिशन सुनिश्चित करण्यासाठी सुलभ करण्यात आली आहे. तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट करण्यासाठी तुम्हाला केवळ तीन स्टेप प्रोसेस फॉलो करणे आवश्यक आहे.

स्टेप 1 : इन्श्युअर्ड व्यक्तीचे नाव आणि वय यासह विद्यमान इन्श्युरन्स तपशिलासह पोर्टेबिलिटी फॉर्म भरा.

स्टेप 2 : नवीन इन्श्युरन्स कंपनीच्या संपूर्ण तपशिलासह प्रपोजल फॉर्म भरा.

स्टेप 3 : संबंधित डॉक्युमेंट्स सबमिट करा.

आयआरडीए नुसार हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी नियम

हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी, ज्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला तुमची विद्यमान इन्श्युरन्स पॉलिसी दुसऱ्या इन्श्युरन्स कंपनीमध्ये पोर्ट करण्याचा अधिकार देते, त्यामध्ये नियमांचा एक संच असतो ज्याचे पालन करणे आवश्यक आहे.

इन्श्युरन्स कंपनी स्विचिंग नियमन करणारा कोणताही हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी कायदा अस्तित्वात नसला तरीही नियम व रेग्युलेशन आयआरडीए द्वारे निर्धारित केले जातात. म्हणून, इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट करताना इन्श्युरन्स कंपनी आणि पॉलिसीधारक या निश्चित नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. 

पॉलिसीधारकाचे हक्क

●     पॉलिसीचा प्रकार: पॉलिसीधारक केवळ समान प्रकारच्या पॉलिसीसाठी इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट करणे आवश्यक आहे.. पोर्टेबिलिटी प्रोसेस दरम्यान कव्हरेजमध्ये किंवा पॉलिसीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात बदल करण्याची शक्यता नाही.

●     इन्श्युरन्स कंपनी: एका इन्श्युरन्स कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे स्विच करताना, पॉलिसीधारकाला लाईफ इन्श्युरन्स कंपनी आणि जनरल इन्श्युरन्स कंपनीमधील फरक समजून घेणे आवश्यक आहे.

व्यक्तीने समान प्रकारची इन्श्युरन्स कंपनी निवडल्यावर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीची पोर्टेबिलिटी केली जाऊ शकते. असे स्पष्टीकरण विद्यमान आणि संभाव्य इन्श्युरन्स कंपनीच्या जबाबदारी अंतर्गत येते.

●     वर्तमान इन्श्युरन्स कंपनीकडून प्रतिसाद: वर्तमान इन्श्युररला पॉलिसीधारकाची पोर्टेबिलिटी विनंती स्वीकारण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी घेण्याची परवानगी आहे.

●     पोर्टिंग शुल्क: विद्यमान इन्श्युरर किंवा नवीन व्यक्ती हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट करण्यासाठी शुल्क आकारू शकत नाही.. हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी बाबतीत आयआरडीए द्वारे निर्धारित केलेल्या नियमांपैकी हा एक आहे.

●     ग्रेस कालावधी: हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी ॲप्लिकेशन प्रोसेस मध्ये असताना अतिरिक्त ग्रेस कालावधी प्राप्त करण्याचा अधिकार पॉलिसीधारकाला दिला जातो.

30 दिवसांचा कालावधी दिला जातो, ज्यादरम्यान पॉलिसीधारकाला प्रो-रेटा आधारावर प्रीमियम भरावा लागेल. त्यामुळे, जुनी पॉलिसी ॲक्टिव्ह असलेल्या दिवसांच्या संख्येनुसार आकारले जाणारे प्रीमियम कॅल्क्युलेट केले जाईल.

●     सम इन्श्युअर्ड आणि कव्हरेजची व्याप्ती: पॉलिसीधारकाला वाढविण्याचा अधिकार असेल सम इन्शुअर्ड आणि नवीन पॉलिसीच्या कव्हरेजची व्याप्ती. परंतु हे संपूर्णपणे इन्श्युरन्स कंपनी आणि त्यांच्या मंजुरीवर अवलंबून असते.

पूर्ण करावयाच्या अटी

●     गॅप्स: पॉलिसी रिन्यूवल मध्ये काही गॅप्स असल्यास ती पॉलिसी दुसऱ्या कंपनीकडे पोर्ट केली जाऊ शकत नाही.. विद्यमान पॉलिसीमधील गॅप्स हा सर्व प्रकारच्या इन्श्युरन्स कंपन्यांसाठी कस्टमरच्या सर्व्हिसच्या ॲक्सेसला प्रतिबंधित करण्यासाठी एक मोठा अडथळा मानला जातो.

त्यामुळे, हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी वेळी तुमच्या पॉलिसीच्या रिन्यूवल मध्ये कोणताही गॅप्स नसावा.

●     इन्श्युरन्स कंपनीला सूचित करणे: पॉलिसीधारकाला वर्तमान इन्श्युरन्स कंपनीला सूचित करणे आवश्यक आहे आणि त्यांना स्विच विषयी माहिती देणे आवश्यक आहे.. विद्यमान इन्श्युरन्स प्लॅनच्या रिन्यूवलच्या 45 दिवसांपूर्वी नोटिफिकेशन द्यावे.

●     प्रीमियममधील बदल: कोणत्याही हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचे प्रीमियम एकाधिक घटकांवर आधारित इन्श्युरन्स कंपनीद्वारे निश्चित केले जातात. तुमच्या जुन्या इन्श्युरन्स कंपनीकडून स्विच करताना तुम्हाला अतिरिक्त प्रीमियम भरावा लागेल.

जेव्हा नवीन इन्श्युरर त्याच प्रकारच्या पॉलिसीसाठी भिन्न प्रकारचे प्रीमियम आकारते तेव्हा हे घडते.

●     प्रतीक्षा कालावधी: कव्हरेजची व्याप्ती म्हणजे अतिरिक्त प्रतीक्षा कालावधी पूर्ण करण्यासाठी अवलंबून असलेला घटक.. जर पॉलिसीधारक कव्हरेज वाढवायचे असेल आणि इन्श्युरन्स कंपनीद्वारे त्याला मंजूरी दिली गेली असेल तर नवीन इन्श्युरन्स कंपनीच्या अटी व शर्तींनुसार पॉलिसीधारकाने प्रतीक्षा कालावधी पूर्ण करायला हवा.

तुम्ही हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटीचा विचार कधी करावा?

●     जेव्हा तुम्ही तुमच्या इन्श्युरन्स सर्व्हिसेसबाबत समाधानी नसाल: दिल्लीतील श्री. करण विद्यमान इन्श्युरन्स कंपनीद्वारे प्रदान केलेल्या सर्व्हिसेसबद्दल समाधानी नसल्यामुळे त्यांना हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट करण्याची इच्छा होती.. म्हणून, कमी वयात असल्याने, त्यांना बजाज आलियान्झकडून जास्त फायदे मिळाले आणि हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी घेण्याचा निर्णय घेतला.. त्याचप्रमाणे, 58 वयाचे मुंबईतील श्री. विश्वास यांनी बजाज आलियान्झ कडून त्यांना मिळू शकणाऱ्या चांगल्या सेवांविषयी जाणून घेण्यासाठी आले. त्यामुळे त्यांनी हेल्थ पॉलिसी पोर्टेबिलिटी साठीचा निर्णय घेतला.

●     जेव्हा तुम्हाला अतिरिक्त कव्हर मिळत नसेल: बंगळुरूमधील श्रीमती लता यांनी पॉलिसीधारकाला प्रदान केलेल्या अधिक इन्श्युअर्ड रकमे विषयी जाणून घेतल्यावर बजाज आलियान्झ सह हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटीचा निर्णय घेतला.

●     जेव्हा तुम्हाला सर्वोत्तम पर्याय मिळतात: जेव्हा तुम्ही दोन भिन्न इन्श्युरन्स कंपन्यांची तुलना करता तेव्हा तुम्हाला प्रत्येक कंपनीचे विविध लाभ समजतात.. चंदीगडमधील श्रीमती अनिता यांनी रिन्यूवल साठी वयोमर्यादा, खोली भाडे मर्यादा आणि पॉलिसी प्रीमियम जाणून घेतल्यानंतर बजाज आलियान्झसह हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी करण्याचा निर्णय घेतला.

●     पारदर्शकतेत समस्या उद्भवल्यास: बजाज आलियान्झ पॉलिसीमध्ये समाविष्ट डॉक्युमेंट्सची पारदर्शकता सुनिश्चित करते.. पुण्याचे श्री. कार्तिक यांनी कंपनीच्या पारदर्शकता धोरणाविषयी सखोलपणे वाचले आणि त्यानंतर हेल्थ पॉलिसी पोर्टेबिलिटीचा निर्णय घेतला.

हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटीचे फायदे आणि तोटे

तुम्ही गॅजेट खरेदी करत असाल किंवा हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी दोन्हींसाठी फायदे व तोटे निश्चितपणे असू शकतात. आणि जर तुम्ही हे हेल्थ पॉलिसी पोर्टेबिलिटी करण्याचे फायदे आणि तोटे वाचले नसल्यास तुम्हाला दीर्घकाळापर्यंत खेद करावा लागू शकतो. त्यामुळे, हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटीचा विचार करताना तुम्हाला अंतर्भृत फायदे आणि तोटे यांची माहिती असणे आवश्यक आहे. 

फायदे  तोटे
निरंतरता लाभ: हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटीचे सर्वात मोठे लाभ म्हणजे तुम्हाला प्रदान केलेल्या कोणत्याही लाभांतून बाहेर पडण्याची गरज नाही. तुम्ही लाभांच्या निरंतरतेचा आनंद घेऊ शकता. रिन्यूवल दरम्यान हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी: हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी पोर्टेबिलिटी साठीची महत्वाची बाब म्हणजे केवळ पॉलिसी कालबाह्य तारखेपूर्वीच लाभ घेता येईल. 
नो क्लेम बोनस ठेवा: हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी तुम्हाला तुमच्या नवीन इन्श्युरन्स पॉलिसी प्रीमियममध्ये दिसणारा नो क्लेम बोनस ठेवण्यास मदत करेल.  मर्यादित प्लॅन बदल: हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटीसाठी प्लॅन अंतिम केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्लॅनमध्ये अनेक बदल करू शकत नाही. जर तुम्हाला प्लॅनमधील बदल कस्टमाईज करायचे असतील तर प्रीमियम आणि इतर अटी व शर्ती मध्ये देखील त्यानुसार बदल करावे लागतील.
प्रतीक्षा कालावधीवर कोणताही परिणाम नाही: जेव्हा तुम्ही हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट करता तेव्हा तुमच्या पॉलिसीचा प्रतीक्षा कालावधी प्रभावित होत नाही. विस्तृत कव्हरेजसाठी जास्त प्रीमियम: तुम्हाला तुमच्या मागील प्लॅनच्या तुलनेत जास्त कव्हरेज पाहिजे असल्यास, हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी नंतर तुम्हाला जास्त प्रीमियम भरावा लागेल.

तुमची हेल्थ पॉलिसी पोर्टेबिलिटी विनंती केव्हा नाकारली जाऊ शकते?

इन्श्युरर हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटीसाठी तुमची विनंती नाकारू शकतो. त्यामुळे तुम्हाला हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट करण्यासाठी आवश्यक असलेल्या काही गोष्टींचा विचार करावा लागेल.

●     जेव्हा तुम्ही अपूर्ण माहिती प्रदान करता: तुम्हाला हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी वेळी नवीन इन्श्युरन्स प्रोव्हायडर सोबत पारदर्शक असणे आवश्यक आहे.. इन्श्युअर्ड आणि संबंधित घटकांविषयी माहिती दडविल्यामुळे नकार मिळण्याची शक्यता अधिक असते.. म्हणूनच इन्श्युरर सोबत वैयक्तिकरित्या संपर्क साधण्याचा आणि आवश्यक माहिती प्रदान करण्याचा सल्ला दिला जातो.

●     डॉक्युमेंट सबमिशन मध्ये डीले: पॉलिसीधारक हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ठराविक कालमर्यादा फॉलो करणे आवश्यक आहे.. त्यामुळे, तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स सबमिट करण्यास डीले करू नये आणि तुम्ही हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट करण्याची योजना बनवत असल्याचे इन्श्युररला सूचित करावे.

●     क्लेम रेकॉर्डचा मंजुरीवर परिणाम: जर फसवणुकीचा क्लेम रेकॉर्ड असेल तर नाकारण्याची शक्यता अनेक पटीने वाढते.. प्रदान केलेल्या माहितीमध्ये कोणतीही फसवणूक किंवा चुकीची माहिती आढळल्यास इन्श्युरन्स कंपनीला हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी साठीची तुमची विनंती नाकारण्याचा अधिकार आहे. 

तुमची मागील पॉलिसी अद्याप कालबाह्य झाली नाही?

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया तारीख निवडा

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.

बजाज आलियान्झ का?

  • इंडस्ट्री मधील सर्वोत्तम सर्व्हिस..
  • इन-हाऊस क्लेमचे जलद सेटलमेंट..
  • सुस्पष्ट अंडररायटिंग प्रॅक्टिससाठी कंपनीची सातत्यपूर्ण कामगिरी.
  • हॉस्पिटलायझेशन कव्हर, वैयक्तिक अपघाताचे कव्हर, टॉप-अप गंभीर आजार, इतर आवश्यक घटकांसह हॉस्पिटल कॅश यांसारख्या उत्पादनांचे व्यापक स्पेक्ट्रम.
  • संपूर्ण भारतात कॅशलेस लाभ प्रदान करते.
  • केवळ कंपनी मार्केटमध्ये ई-ओपिनियन प्रदान करते.

हेल्थ इन्श्युरन्स कशासाठी घ्यावा?

आरोग्य हा आपल्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यास अत्यंत काळजीपूर्वक संरक्षित करणे आवश्यक आहे. आपल्या वर्तमान जीवनशैलीमुळे आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये वाढ होऊ शकते.. अशा स्थितीत, हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीसह तयार राहणे महत्त्वाचे आहे.

video_alt

तुम्ही हेल्थ इन्श्युरन्स पोर्ट करण्यापूर्वी जाणून घेण्याच्या गोष्टी

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे तुमचे शरीर, मन आणि खिशावर देखील प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीकडे हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी नसेल तर त्याची संपूर्ण सेव्हिंग्स एकाचवेळी खर्च होऊ शकते. म्हणून, हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचे सर्व लाभ घेण्यासाठी व्यक्तीने योग्य कव्हर खरेदी करणे आवश्यक आहे. पॉलिसी खरेदी करताना जर तुम्ही तुमच्या गरजा, जीवनशैली आणि कव्हरेजचा विचार केला नाही तर तुमच्या क्लेमची रक्कम प्रभावित होऊ शकते. त्यामुळे, तुम्ही नवीन कंपनीकडे हेल्थ इन्श्युरन्स पोर्ट करताना तुम्हाला काही गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे.
Drive Smart Benefit Smart Benefit

वर्तमान पॉलिसी समाप्ती तारीख

एकदा का कालबाह्य झाल्यानंतर तुम्ही तुमची पॉलिसी पोर्ट करू शकत नाही. त्यामुळे, तुम्ही रिन्यूवल तारीख काळजीपूर्वक लक्षात ठेवणे आवश्यक आहे अधिक वाचा

वर्तमान पॉलिसी समाप्ती तारीख

एकदा का कालबाह्य झाल्यानंतर तुम्ही तुमची पॉलिसी पोर्ट करू शकत नाही. त्यामुळे, तुम्हाला तुमच्या पॉलिसीच्या रिन्यूवल तारखेच्या बाबत काळजी घेणे आवश्यक आहे कारण तुम्ही ते केवळ रिन्यूवलच्या वेळी पोर्ट करू शकता. तसेच, तुम्हाला रिन्यूवल तारखेच्या 45 दिवसांपूर्वी पोर्टिंग बाबत वर्तमान इन्श्युररला सूचित करणे आवश्यक आहे

नामंजुरी टाळण्यासाठी प्रामाणिक व्हा

तुम्ही नवीन इन्श्युरन्स प्रोव्हायडर सह पारदर्शकता राखणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमचे सर्व शेअर करणे आवश्यक आहे अधिक वाचा

नामंजुरी टाळण्यासाठी प्रामाणिक व्हा

तुम्हाला नवीन इन्श्युरन्स प्रोव्हायडर सह पारदर्शकता राखणे आवश्यक आहे. इन्श्युरन्स प्रोव्हायडर कडून नकार टाळण्यासाठी तुम्हाला तुमचे सर्व वैद्यकीय रेकॉर्ड आणि क्लेम रेकॉर्ड शेअर करणे आवश्यक आहे.

विविध लाभांसह समान प्लॅन्स

तुम्हाला लक्षात ठेवणे आवश्यक आहे की विविध इन्श्युरन्स कंपन्यांद्वारे ऑफर केलेले समान प्लॅन्स अधिक वाचा

विविध लाभांसह समान प्लॅन्स

तुम्हाला लक्षात ठेवणे आवश्यक आहे की विविध इन्श्युरन्स कंपन्यांद्वारे ऑफर केलेले समान प्लॅन्स तुम्हाला विविध लाभ प्रदान करू शकतात. त्यामुळे, लाभांविषयी वाचताना तुम्हाला गोष्टी गृहीत धरण्याची गरज नाही.

मर्यादा आणि उप-मर्यादा

हेल्थ इन्श्युरन्सच्या प्रत्येक प्रकारच्या कव्हरेजवर क्लेम करण्यायोग्य रकमेवर काही मर्यादा आहे अधिक वाचा

मर्यादा आणि उप-मर्यादा

हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीच्या प्रत्येक प्रकारच्या कव्हरेजवर क्लेम करण्यायोग्य रकमेवर एक विशिष्ट मर्यादा आहे. उदाहरणार्थ, दैनंदिन खोलीचे भाडे ₹ 3500 पर्यंत मर्यादित केले जाऊ शकते. म्हणून, जेव्हा तुम्ही तुमची पॉलिसी पोर्ट करता तेव्हा तुम्हाला अशा मर्यादा तपासणे आवश्यक आहे. पॉलिसी पोर्ट करण्यापूर्वी, मर्यादा आणि उप-मर्यादा तुमच्यासाठी योग्य आहेत याची खात्री करा.

हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी विनंत्या नाकारण्याची प्रमुख कारणे

हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी तुम्हाला लाभ गमावल्याशिवाय तुमची पॉलिसी एका इन्श्युररकडून दुसऱ्या इन्श्युररकडे ट्रान्सफर करण्याची परवानगी देते. तथापि, विनंत्या अनेक कारणांसाठी नाकारल्या जाऊ शकतात:
 

1. विद्यमान वैद्यकीय स्थिती: जर तुम्ही पूर्व-विद्यमान स्थिती उघड करण्यात अयशस्वी झालात तर इन्श्युरर्स तुमची पोर्ट हेल्थ इन्श्युरन्स विनंती नाकारू शकतात.
 

2. कालबाह्य पॉलिसी: पॉलिसी ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे; कालबाह्य पॉलिसी पोर्टेबिलिटीसाठी अपात्र आहेत.
 

3. अपूर्ण डॉक्युमेंटेशन: अनुपलब्ध किंवा चुकीचे डॉक्युमेंट्स नाकारण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
 

4. पॉलिसी जुळत नाही: नवीन पॉलिसीने विद्यमान पॉलिसीच्या समान कव्हरेज देऊ करणे आवश्यक आहे.
 

5. क्लेम रेकॉर्ड: क्लेम्सची उच्च संख्या तुमच्या पोर्ट विनंतीच्या स्वीकृतीवर परिणाम करू शकते.
 

अधिक माहितीसाठी, भेट द्या बजाज अलायंझ जनरल इन्श्युरन्स कंपनी ला - IRDA नुसार भारतातील टॉप हेल्थ इन्श्युरन्स कंपन्यांपैकी एक.
 

Health Insurance Portability FAQs

हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी एफएक्यू

हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटीचे लाभ कोणते आहेत?

हेल्थ पॉलिसी पोर्टेबिलिटीचे काही अंतर्गत सूचीबद्ध लाभ आहेत:

  • तुम्हाला तुमच्या गरजांसाठी अनुरुप पॉलिसी मिळतील.
  • तुम्ही देय केलेल्या प्रीमियमसाठी चांगले मूल्य.
  • सम इन्श्युअर्ड मध्ये वाढीची शक्यता.
  • क्लेम-सेटलमेंट त्रासमुक्त केले जातात.
  • तुम्ही कव्हरेजच्या निरंतरतेचा आनंद घेऊ शकता.
  • नो क्लेम बोनस फॉरवर्ड केला जाऊ शकतो.

 

कोणत्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट केल्या जाऊ शकतात?

तुम्हाला जनरल इन्श्युरन्स कंपनी किंवा विशेष हेल्थ इन्श्युरन्स कंपनीद्वारे प्रदान केलेली कोणतीही वैयक्तिक किंवा कौटुंबिक पॉलिसी पोर्ट करण्याची अनुमती आहे. 

मला माझी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट करायची आहे. प्रक्रिया काय आहे?

हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट करण्यासाठी तुम्हाला या स्टेप्सचे पालन करणे आवश्यक आहे:

  •  इन्श्युअर्ड व्यक्तीचे नाव आणि वय यासह विद्यमान इन्श्युरन्स तपशिलासह पोर्टेबिलिटी फॉर्म भरा.
  •  नवीन इन्श्युरन्स कंपनीच्या संपूर्ण तपशिलासह प्रपोजल फॉर्म भरा.
  •  संबंधित डॉक्युमेंट्स सबमिट करा.

हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी दरम्यान माझा संचयी बोनस आणि प्रतीक्षा कालावधीचे काय होते?

तुम्ही तुमचा संचयी बोनस कॅरी फॉरवर्ड करू शकता आणि प्रतीक्षा कालावधी निरंतर कमी होण्यासह पॉलिसीचे लाभ सुरू ठेवू शकता. त्यामुळे, हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी वेळी तुमचा प्रतीक्षा कालावधी आणि सातत्य लाभ गणला जातो.

कोणतेही अतिरिक्त पोर्टेबिलिटी शुल्क आहे का?

नाही, हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटीसाठी कोणतेही पोर्टेबिलिटी शुल्क नाही. जरी काही इन्श्युरन्स कंपन्या अशा पद्धतींमध्ये विचार करू शकतात. तरीही बजाज आलियान्झ सह तुम्ही निश्चिंत राहू शकता की असे कोणतेही शुल्क नाही. 

इन्श्युरन्स कंपनी बदलताना मी माझा सम इन्श्युअर्ड बदलू शकतो का?

होय, तुम्ही नवीन इन्श्युरन्स कंपनीकडे तुमची सम इन्श्युअर्ड बदलू शकता, तथापि, सुधारित इन्श्युररच्या प्राधान्यावर स्वीकृती असेल. 

जर मी हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी निवडली तर मला कोणतीही वैद्यकीय तपासणी करावी लागेल का?

हे नवीन इन्श्युररद्वारे प्रदान केलेल्या पॉलिसीच्या नियमांवर अवलंबून असते. जर तुम्हाला वैद्यकीय औपचारिकता कालावधी दिला असल्यास त्यादरम्यान तुम्हाला दिलेल्या कालावधीमध्ये हे करणे आवश्यक आहे. 

मी पोर्टेबिलिटीसाठी कधी अप्लाय करावे?

तुम्ही तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीच्या रिन्यूवल तारखेच्या 60 दिवसांपूर्वी अप्लाय करावे. हे कारण कालबाह्यता तारखेपूर्वी पोर्ट करत नाही आणि सध्याच्या इन्श्युरन्स प्रोव्हायडरला प्रीमियम भरण्यास अयशस्वी झाल्यास पॉलिसीमध्ये गॅप्स दिसून येईल आणि पोर्टेबिलिटी नामंजूर करण्याचा ठोस आधार ठरेल. 

माझी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट करताना मी काहीही गमावतो का?

नाही, तुम्ही जमा केलेला संचयी बोनस आणि प्रतीक्षा कालावधीची रक्कम यासारख्या गोष्टी गमावत नाहीत.

मी कधीही हेल्थ इन्श्युरन्स पोर्ट करू शकतो का?

नाही, तुमची सध्याची पॉलिसी कालबाह्य होण्यापूर्वी तुम्ही केवळ हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट करू शकता. म्हणून, तुम्हाला तुमच्या विद्यमान हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीच्या रिन्यूवल तारखेच्या 45 दिवसआधी इन्श्युररला सूचित करणे आवश्यक आहे.

माझी हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी विनंती नाकारण्यात आली आहे. मी पुढे काय करावे?

इन्श्युररने तुमची विनंती नाकारण्याच्या मागील कारणे निर्दिष्ट केलेले असावेत. म्हणूनच, तुम्ही फॉर्म सबमिशन मधील अंतराबाबत स्पष्टीकरण देण्यावर काम करणे आवश्यक आहे.. तुम्हाला तुमच्याविषयी आणि वर्तमान इन्श्युरन्स पॉलिसीच्या तुमच्या क्लेम रेकॉर्ड विषयी संपूर्ण माहिती इन्श्युररला प्रदान करणे आवश्यक आहे.. आवश्यक डॉक्युमेंट्स सबमिट करण्यास कोणताही डीले होऊ नये. 

दोन वेगवेगळ्या इन्श्युरन्स कंपन्यांकडून हेल्थ इन्श्युरन्स कव्हरेज खरेदी करणे चांगली कल्पना आहे का?

जर तुम्ही विविध इन्श्युररकडून समान कव्हरेज प्लॅन्स खरेदी करण्याची योजना बनवत असाल तर त्यामध्ये विशेष फरक पडणार नाही. त्यामुळे, तुम्ही दोन भिन्न इन्श्युररद्वारे प्रदान केलेल्या कव्हरेज प्लॅन्समधील फरक विचारात घेणे आणि तुमच्या गरजा पूर्ण करणाऱ्या प्लॅन्स आणि कंपन्यांसह पुढे जाणे आवश्यक आहे. विविध इन्श्युररकडून दोन भिन्न कव्हरेज खरेदी करणे तुम्हाला अतिशय वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत मदत करू शकते.

कोणत्याही प्रतिकूल रेकॉर्डच्या बाबतीत प्रीमियमवर कोणतेही लोडिंग असेल का?

जर कोणताही प्रतिकूल वैद्यकीय रेकॉर्ड असेल तर आयआरडीए सह दाखल केलेल्या प्रॉडक्ट स्टँडर्ड मार्गदर्शक तत्त्वांनुसार लोडिंग लागू केले जाऊ शकते.

पोर्टेबिलिटी विनंती नाकारण्याची कारणे

  • परिपूर्ण माहितीमध्ये अभाव असू शकतो.
  • कदाचित डॉक्युमेंट्स सबमिट करण्यात डीले झाला असेल किंवा सादर केलेल्या डॉक्युमेंट्समध्ये दोष असू शकतो.
  • अंडररायटिंग नकार- क्लेम रेकॉर्ड, वैद्यकीय प्रोफाईलिंग, मागील इन्श्युरन्स कंपनीचे कव्हरेज आणि नवीन इन्श्युरन्स कंपनीद्वारे निवडलेले प्रॉडक्ट यामधील फरक.
  • हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी विनंती नाकारण्याचे आणखी एक कारण पॉलिसी रिन्यूवल मध्ये ब्रेक-इन असू शकते.
  • जर वय निकषांपेक्षा जास्त असेल तर.

पोर्टिंग ऐवजी मी माझ्या वर्तमान हेल्थ इन्श्युरन्स प्रोव्हायडर सह माझा प्लॅन बदलू शकतो का?

होय, तुम्ही तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीच्या रिन्यूवलच्या वेळी प्लॅन आणि कव्हरेज मध्ये बदल करू शकता.. हे बदल करण्यासाठी तुम्हाला हेल्थ इन्श्युरन्स पोर्ट करण्याची गरज नाही. 

कस्टमर रिव्ह्यू आणि रेटिंग

सरासरी रेटिंग:

4.75

(3,912 रिव्ह्यूज व रेटिंगवर आधारित)

विक्रम अनिल कुमार

माझे हेल्थ केअर सुप्रीम पॉलिसी रिन्यूवल करण्यात तुम्ही मला सहकार्य केले त्याबद्दल मला खरोखर आनंद वाटतो. खूप खूप धन्यवाद. 

पृथ्वी सिंग मियान

लॉकडाउन असूनही चांगली क्लेम सेटलमेंट सर्व्हिस. त्यामुळे मी अधिकाधिक कस्टमरना बजाज आलियान्झ हेल्थ पॉलिसी उपलब्ध केली

अमागोंड विट्टप्पा अराकेरी

बजाज आलियान्झ द्वारे सर्वोत्तम सर्व्हिस, त्रासमुक्त सर्व्हिस, कस्टमर्स साठी फ्रेंडली साईट, समजण्यास व ऑपरेट करण्यास सोपी. आनंदी मनाने कस्टमर्सना सर्व्हिस दिल्याबद्दल धन्यवाद टीम ...

बजाज अलायंझ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.

कॉलबॅकची विनंती

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया वैध पर्याय निवडा
कृपया निवडा
कृपया चेकबॉक्स निवडा

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

  • निवडा
    कृपया निवडा
  • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे