प्रत्येक महिला सर्वसामान्य दिवशी हीच नित्याची कार्ये करत असते ... कुटुंबाची काळजी घेणे, डेडलाईन पाळणे आणि नंतर थोड्या आरामासाठी वेळ मिळण्याची आशा करणे. पण या सगळ्यात, आरोग्य आपोआप कसे मागे पडते हे तुमच्या लक्षात आले आहे का? आणि नाही, आम्ही तुमच्या व्यायामाच्या नेमाबदल बोलत नाही आहोत. आम्ही महिलांवर परिणाम करणाऱ्या रोगांविषयी चर्चा करीत आहोत आणि जर तुम्हाला त्यांना प्रारंभिक टप्प्यात प्रतिबंध करायचा असेल तर तुम्ही चुकवू शकत नसलेल्या वैद्यकीय चाचण्यांविषयी बोलत आहोत.
कोलेस्टेरॉल (लिपिड प्रोफाईल) तपासणी
महिलांना कर्करोगापेक्षा हृदयविकाराचा धोका जास्त असतो, असे अभ्यास सांगतात. रजोनिवृत्तीमुळे तुमच्या कोलेस्टेरॉलच्या पातळीमध्ये बदल होतो, त्यामुळे 45 व्या वयापासून सुरू करून ; तुम्ही नियमित कोलेस्टेरॉल तपासणी करावी. खरं तर, जर तुम्ही धुम्रपान करत असाल, तुम्हाला मधुमेह असेल किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यास हृदयाच्या समस्या असतील, तर यापूर्वीही तपासणी करणे सुरू करा.
स्तनाची क्लिनिकल तपासणी आणि मॅमोग्राम
स्तनाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये सर्वात जास्त त्रासदायक कर्करोगांपैकी एक आहे. 20 व्या वयापासून तुमच्या डॉक्टरांकडून क्लिनिकल तपासणी करून घ्या. एकदा का तुम्ही 40 वर्षांच्या झालात की वर्षातून एकदा मॅमोग्राम करून घेण्यास सुरुवात करा.
पॅप स्मीअर
एचपीव्ही संसर्ग तपासण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे, जो गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग टाळण्यास मदत करतो. तुम्ही लैंगिकरित्या सक्रिय होताच किंवा तुम्ही 21 वर्षांच्या होताच लवकर चाचणी करून घेणे सुरू करा. चाचणीच्या परिणामांनुसार, तुम्ही चाचणी किती वेळा करणे आवश्यक आहे याबद्दल तुमचे डॉक्टर तुम्हाला सल्ला देऊ शकतील.
हाड-खनिज घनता चाचणी
रजोनिवृत्तीनंतर, महिलेची हाडांची घनता 5-7 टक्के कमी होऊ शकते. तुम्हाला ऑस्टिओपोरोसिसची जोखीम आहे की नाही हे शोधण्यासाठी, रजोनिवृत्तीनंतर तुमची हाड-खनिज घनता चाचणी घेणे महत्त्वाचे आहे, विशेषत: जर तुम्ही धूम्रपान करत असाल, बारीक असाल किंवा कोणत्याही गैर-आघातजन्य फ्रॅक्चरने ग्रस्त असाल.
कोलोनोस्कोपी
तुम्हाला कोलन कर्करोग होण्याची जोखीम आहे का हे शोधण्यासाठी तुम्ही वयाच्या 50 व्या वर्षापासून दर काही वर्षांनी कोलोनोस्कोपी करून घ्यावी. जर तुमच्या कुटुंबात पूर्वी कोणास हा रोग झाला असेल तर ही चाचणी आधीच करून घ्या.
हृदय-आरोग्य चाचणी
तुम्हाला हृदयविकाराची आणि हृदयाच्या इतर समस्यांची जोखीम नाही याची खात्री करण्यासाठी, नियमित हृदय-आरोग्य तपासणी करा. तुमचे वय 45 पेक्षा जास्त असल्यास आणि हृदयविकाराचा झटका आणि कुटुंबात कोणास अतिरक्तदाब असल्यास हे विशेषतः आवश्यक आहे.
मधुमेह तपासणी
तुमच्या कुटुंबात कोणासही मधुमेह असल्यास किंवा तुम्हाला अतिरक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉलचा त्रास असल्यास, तुम्हाला मधुमेह होणार नाही याची खात्री करण्यासाठी तुम्ही नियमित रक्तातील साखरेची तपासणी करणे आवश्यक आहे.
एचआयव्ही आणि अन्य एसटीडीसाठी चाचणी
लैंगिकरित्या सक्रिय असलेल्या कोणत्याही महिलेने एचआयव्हीसाठी स्क्रीन करून घेणे आवश्यक आहे. तुम्ही इतर एसटीडी जसे की हर्पीस आणि क्लॅमिडियासाठी देखील चाचणी करावी का हे जाणून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. हे जरा अतिच वाटतं, नाही का? परंतु जेव्हा हेल्थकेअरचा विषय येतो, तेव्हा जुन्या म्हणीप्रमाणे - उपचारापेक्षा प्रतिबंध हा कधीही चांगला असतो! माहिती मिळवा
महिलांसाठी हेल्थ इन्श्युरन्स विशिष्ट आजारांसाठी कव्हरेजसह. पाहा आमची संपूर्ण श्रेणी
ऑनलाईन हेल्थ इन्श्युरन्स प्रॉडक्ट्सची आणि आजच इन्श्युअर्ड व्हा!