तुमच्या भविष्यासाठी नियोजन करणे ही प्राथमिकता असावी. तुम्ही कमाई सुरू केल्यापासूनच, आपण नेहमीच बफर उत्पन्न निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. तुमचे भविष्य सुरक्षित करण्याच्या संदर्भात, दोन सामान्य आणि व्यापकपणे वापरली जाणारी फायनान्शियल इन्स्ट्रूमेंट ही लाईफ इन्श्युरन्स आणि हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी आहेत. दोघांची वेगवेगळी उद्दिष्टे असताना, ते तुमच्या फायनान्शियल प्लॅनचा महत्त्वपूर्ण भाग बनवतात. चला आपण फरक पाहूया लाईफ इन्श्युरन्स वर्सिज हेल्थ इन्श्युरन्स. परंतु त्यापूर्वी, ते कशा संदर्भात आहेत ते समजून घेऊया.
लाईफ इन्श्युरन्सचा उद्देश काय आहे?
लाईफ इन्श्युरन्स पॉलिसीचे उद्दिष्ट तुमच्या अनुपस्थितीमध्ये तुमच्यावर अवलंबून असलेल्यांना फायनान्शियल सिक्युरिटी प्रदान करणे आहे. लाईफ इन्श्युरन्स कव्हर घेऊन, पॉलिसीधारक हे सुनिश्चित करू शकतो की त्याच्यावर अवलंबून असलेल्यांच्या जीवनशैलीवर फायनान्शियल अडचणींमुळे फारसा परिणाम होणार नाही. लाईफ इन्श्युरन्स पॉलिसीमधून मिळणारे उत्पन्न कुटुंबाला मृत व्यक्तीच्या उत्पन्नासह बदलण्याची परवानगी देते, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात फायनान्शियल सामान्यता रिस्टोर होण्यास मदत होते. तसेच, बहुतांश प्रकारच्या प्लॅन्ससाठी मृत्यू लाभ टॅक्स-फ्री असतात; त्यामुळे, संपूर्ण सम ॲश्युअर्ड लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते.
हेल्थ इन्श्युरन्सचा उद्देश काय आहे?
लाईफ इन्श्युरन्स प्लॅन्सच्या विपरीत, हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी वैद्यकीय उपचार घेण्यासाठी पेआऊट प्रदान करते. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत इन्श्युअर्डला फायनान्शियल सुरक्षा कवच प्रदान करण्याचा हा करार आहे. जर
मेडिकल इन्श्युरन्स प्लॅन तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला वैद्यकीय खर्चाचा भार सहन करावा लागेल. तथापि, जर तुमच्याकडे हेल्थ इन्श्युरन्स असेल तर तुमच्या इन्श्युरन्स पॉलिसी आणि वैद्यकीय सुविधा जेथे उपचार केले जातात त्यावर आधारून कॅशलेस पद्धतीने हे खर्च रिएम्बर्स किंवा सेटल केले जाऊ शकतात. पुढे, जेव्हा तुम्ही हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करता, तेव्हा काही प्लॅन्समध्ये प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीची सुविधा देखील असते. या पॉलिसी इन्श्युअर्ड साठी वैद्यकीय तपासणीच्या सुविधा उपलब्ध करून देतात तर इतर काही पॉलिसी प्रीस्क्रिप्शन औषधांचा खर्चही कव्हर करतात.
लाईफ इन्श्युरन्स वर्सिज हेल्थ इन्श्युरन्स:
लाईफ इन्श्युरन्स |
हेल्थ इन्श्युरन्स |
लाईफ इन्श्युरन्स ही अशी पॉलिसी असते जी तुमच्या कुटुंबाला तुमच्या अकाली मृत्यूच्या बाबतीत फायनान्शियल कव्हर प्रदान करते. पॉलिसी कराराच्या आधारावर सम-ॲश्युअर्ड किंवा तुमच्या नॉमिनीला दिले जाणारे पैसे पूर्व-निर्धारित असतात. |
दुसऱ्या बाजूला, हेल्थ इन्श्युरन्स तुमच्या वैद्यकीय खर्चासाठी एक फायनान्शियल कव्हर असते. कोणत्याही आजार किंवा अपघाताच्या बाबतीत उपचार, हॉस्पिटलायझेशन आणि इतर सहाय्यक खर्च या पॉलिसीमध्ये कव्हर केले जाऊ शकतात. |
लाईफ इन्श्युरन्स प्लॅनसाठीचे प्रीमियम हे खरेदी केलेल्या पॉलिसीच्या प्रकारावर आणि पॉलिसीधारकाच्या वयावर अवलंबून असू शकतात. काही लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी इन्श्युरन्स वैशिष्ट्यांसह गुंतवणूकीचा घटक देखील ऑफर करतात. |
हे हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियम हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीसाठी पॉलिसीधारकाच्या वय आणि आरोग्यानुसार ठरवले जाते. हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचा उद्देश संरक्षण प्रदान करणे असून गुंतवणूक करणे नाही. त्यामुळे सर्व हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये केवळ इन्श्युरन्स वैशिष्ट्ये असतात. |
हे एक दीर्घकालीन इन्श्युरन्स प्रॉडक्ट आहे, ज्यासाठी वेळेवर रिन्यूवल आवश्यक असू शकते किंवा असू शकत नाही. |
हे एक अल्पकालीन इन्श्युरन्स प्रॉडक्ट आहे जे सामान्यपणे वर्षातून एकदा रिन्यू करणे आवश्यक असते. |
इन्श्युअर्डच्या मृत्यू किंवा इन्श्युरन्स कालावधी पूर्ण झाल्यावर पॉलिसी समाप्त होते. |
पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यावर हेल्थ पॉलिसी कालबाह्य होतात. |
प्रामुख्याने लाईफ इन्श्युरन्स मृत्यू लाभ ऑफर करतात, परंतु लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत सर्व्हायवल लाभ देखील उपलब्ध असतात. |
हेल्थ इन्श्युरन्स विशेषत: तुमच्या भविष्यातील वैद्यकीय गरजा पूर्ण करतो. हे इन्श्युअर्डला सर्व्हायवल ही नाही किंवा मृत्यू लाभ ही ऑफर करत नाही. |
हे लाईफ इन्श्युरन्स वर्सिज हेल्थ इन्श्युरन्समधील काही प्रमुख फरक आहेत. तुम्हाला निवडण्याबद्दल काळजी वाटत असल्यास, दोन्ही पॉलिसी समान महत्त्वाच्या आहेत आणि तुमच्या फायनान्शियल प्लॅनचा भाग असणे आवश्यक आहे; एक तुम्ही जिवंत असताना खर्च कव्हर करण्यासाठी आणि दुसरे तुम्ही गेल्यानंतर तुमच्या प्रियजनांची काळजी घेण्यासाठी. भारतातील विविध
हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सचे प्रकार पाहा जे बजाज आलियान्झ ब्लॉग्स द्वारे ऑफर केले जातात.
प्रत्युत्तर द्या