ENG

Claim Assistance
Get In Touch
Harmful Effects of Junk Food
एप्रिल 1, 2021

जंक फूडचे हानिकारक परिणाम

कामावर जाताना झटपट स्नॅक मिळविणे हा नवा ब्रेकफास्ट ट्रेंड ठरत आहे. तसेच, आरोग्यदायी घरगुती खाद्यपदार्थांची जागा आता तुमच्या मनपसंत फास्ट-फूड जॉईंट्स मधून सहजपणे उपलब्ध होणाऱ्या खाद्यपदार्थांनी घेतली आहे. आजकाल लहान मुले जंकफूडला पसंती देताना आणि त्यांची भूक भागवताना दिसून येत आहे. खरंतर यामुळे केवळ जीभेची संतुष्टी होईल. परंतु अशाप्रकारच्या जंक फूडपासून अत्यंत कमी प्रमाणात पोषण मूल्ये शरीराला मिळतात. आपण धावपळीच्या जीवनात जंक फूडचा आस्वाद घेण्यासाठी रिसॉर्टला पसंती देतो. मात्र, जंकफूडच्या नियमित सेवनामुळे मानवी शरीराची न भरुन निघणारी हानी होऊ शकते. अधिक स्पष्टपणे चटकदार खाद्यपदार्थ म्हणून ओळखले जातात. परंतू मानवी शरीरावर जंक फूडचे हानिकारक परिणाम संभवतात. चला तुमचे शरीर तसेच मेंदूवर होणाऱ्या जंक फूडच्या काही हानीकारक परिणामांची माहिती जाणून घेऊया:

लठ्ठपणा

जंक फूडचा सर्वसाधारण व मोठ्या प्रमाणात दिसून येणारा परिणाम म्हणजे माणसांमध्ये आढळणारा लठ्ठपणा होय. जंक फूड्स मध्ये अधिक प्रमाणात साखर, कॅलरी आणि फॅट यांसारखे वजनवाढीस कारणीभूत ठरणारे घटक असतात. तसेच लठ्ठपणा हा मधुमेह, सांधेदुखी आणि विविध हृदय आजार यांसारख्या विकारांसाठी कारणीभूत ठरणारा घटक मानला जातो.

अध्ययन आणि स्मरणशक्ती समस्या

अध्ययन आणि स्मरणशक्ती विकासासाठी परिणामकारक ठरणारी मेंदूची कार्यप्रणाली साखर व फॅटच्या अतिसेवनामुळे प्रभावित होते. अशाप्रकारची स्थिती वाढीच्या अवस्थेतील मुलांमध्ये सर्वाधिक दिसते. कारण त्यांची अध्ययन क्षमता अधिक प्रमाणात विकसित झालेली असते. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासाद्वारे संशोधनाला समर्थन मिळाले आहे. जंक फूड अतिसेवनामुळे अध्ययन क्षमतेवर परिणाम दिसून येतात. मेंदूच्या हिप्पोकँम्पस भागात अचानकपणे दृश्यस्वरुपात परिणाम दिसून येतात. ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती आणि ओळख विकासाची क्षमता प्रभावित होते.

भूक आणि पचन शक्ती गमावणे

अतिसेवन हा जंकफूडचा आणखी एक दुष्पपरिणाम आहे.. ब्लड शुगर लेव्हलमध्ये चढउतार झाल्यामुळे त्यांची परिणीती आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणाच्या खाण्यात होते. यामुळे मेंदू कडून सामान्य आवश्यकतेपेक्षा अधिक सेवनाची मागणी केली जाते. पुढे, अशा खाद्यपदार्थांच्या पाचन क्षमतेत समस्या निर्माण होते. ज्याचा समावेश जंक फूड सेवनाच्या हानिकारक परिणामात होतो.

मानसिक अस्थिरतेतून नैराश्याची उत्पत्ती

जंक फूड्सच्या अतिरिक्त सेवनामुळे मेंदूच्या रासायनिक संरचनेत मोठ्या प्रमाणात बदल होतो. या बदलामुळे तुमचे शरीर अशा जंकफूड वर अधिक अवलंबून राहते आणि तुम्ही अशा पदार्थांच्या अधिक आहारी जातात. हे एखाद्या व्यसनाप्रमाणे कार्य करते आणि जंकफूडचे सेवन न केल्यास माणसामध्ये अस्थिरता निर्माण होते आणि त्यातून नैराश्याची निर्मिती होते. यामुळे शरीरामध्ये हार्मोनल असंतुलन निर्माण होते. ज्यामुळे अधिकाधिक जंकफूड सेवनाची इच्छा निर्माण होते.

अपुरी वाढ आणि विकास

निरोगी शरीराला त्याच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक पोषक घटकांची आवश्यकता आहे. जंक फूडचे हानीकारक परिणाम सुस्पष्ट असतात आणि त्यामध्ये मूलभूत पोषण घटकांचा देखील अभाव असतो.. यासारख्या चुकीच्या सवयी आणि अपुऱ्या पोषण पातळीमुळे मेंदू आणि शरीराच्या अन्य भागाला मोठी हानी पोहोचते.. पोषणतज्ज्ञ नेहमी गरजेपेक्षा अधिक प्रक्रियायुक्त पदार्थ सेवन करण्याचा सल्ला देत नाही. कारण त्यामुळे शरीरावर दीर्घकालीन परिणाम होतात.. त्यामुळे चटकदार चिप्स किंवा मनपसंत ड्रिंक्सचे सेवन करण्यापूर्वी केवळ तुमच्या शरीरावरच नव्हे तर मेंदूवर परिणाम करणाऱ्या जंक फूडच्या हानिकारक परिणाम विषयी निश्चितच विचार करा.. तुम्हाला घरगुती जेवण तयार करण्यासाठी आणि स्वतःला स्वच्छ करण्यासाठी कमी वेळ असू शकतो, परंतु तुमच्या आरोग्याच्या स्वारस्यात ती अतिरिक्त पाऊल उचला आणि गुंतवणूक करा मेडिकल इन्श्युरन्स पॉलिसी कोणत्याही अनपेक्षित आकस्मिकतेपासून स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी. खरंतर, शरीर हीच सर्वार्थाने सर्वात मोठी संपत्ती आहे.   *प्रमाणित अटी लागू इन्श्युरन्स हा विनंतीचा विषय आहे. लाभ, अपवाद, मर्यादा, अटी व शर्तींविषयी अधिक तपशीलासाठी, कृपया सेल्स पूर्ण करण्यापूर्वी सेल्स ब्रोशर/पॉलिसी मजकूर काळजीपूर्वक वाचा.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत