रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सेवा: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

ENG

Claim Assistance
Get In Touch
Understand the Types Of Health Insurance Frauds In India
डिसेंबर 12, 2024

हेल्थ इन्श्युरन्स फसवणूक समजून घेणे: प्रकार आणि परिणाम

भारतातील हेल्थ इन्श्युरन्स विषयी जागरुकता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत दिवसागणिक भर पडत आहे.. हे खूपच स्वागतार्ह चित्र आहे. परंतु हेल्थ इन्श्युरन्स इंडस्ट्री समोरील सर्वात महत्वाची समस्या म्हणजे हेल्थ इन्श्युरन्स फ्रॉडच्या संख्येत होणारी मोठ्या प्रमाणातील वाढ. हे निश्चितपणे समजू शकतो की अनेकवेळा फ्रॉड हे हेतूपूर्वक घडत नाहीत. परंतु त्यामुळे पॉलिसीधारक तसेच इन्श्युरन्स कंपन्यांवर परिणाम होतो.. पुढे सविस्तर वाचन करण्याद्वारे आम्हाला आशा आहे की तुम्हाला फ्रॉड नेमका कशाप्रकारे घडतो याविषयी सविस्तर माहिती मिळेल मेडिकल इन्श्युरन्स प्लॅन्स मध्ये फ्रॉड कशाला समजले जाते याविषयीची सविस्तर माहिती मिळेल आणि ते टाळण्याचे मार्ग देखील समजतील.

हेल्थ इन्श्युरन्स फ्रॉडचे प्रकार

क्लेम फ्रॉड

हा भारतात सर्वसाधारण आढळून येणारा हेल्थ इन्श्युरन्स फ्रॉड आहे. पॉलिसीधारकाला अयोग्य आर्थिक लाभ मिळवण्यास कारणीभूत असलेला कोणताही बेकायदेशीर क्लेम हा इन्श्युरन्स क्लेम फ्रॉड मानला जातो. खालील स्थिती या भारतात हेल्थ इन्श्युरन्स क्लेम फ्रॉड मानल्या जातात:
    1. फ्रॉड/ड्युप्लिकेट मेडिकल बिल सादर करणे
    2. आरोग्य सेवेसाठी झालेल्या खर्चाची वस्तुस्थिती पेक्षा भिन्न माहिती
    3. चुकीचा अपघाती इजा क्लेम
    4. न घेतलेल्या उपचारांसाठी क्लेम दाखल करणे
    5. वैद्यकीय डॉक्युमेंट्स फोर्स करणे (जसे नाव, तारीख इ. बदलणे.

ॲप्लिकेशन फ्रॉड

एखाद्या व्यक्तीला हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्याची इच्छा असलेल्या इन्श्युरन्स कंपनीचा प्रपोजल फॉर्म भरावा लागेल. या प्रपोजल फॉर्ममध्ये विनंती केलेला तपशील म्हणजे पॉलिसीअंतर्गत कव्हर करावयाच्या लोकांची वैयक्तिक माहिती, कोणताही तपशील आधीचे वैद्यकीय आजार आणि इतर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीची माहिती (जर असल्यास). आता हा प्रपोजल फॉर्म भरताना तुम्ही कोणतेही तपशील चुकवू शकता पूर्वी पासून असलेले रोग किंवा चुकीच्या पद्धतीने जन्मतारीख एन्टर करू शकता. अशाप्रकारच्या त्रुटी सुरुवातीला छोट्या वाटू शकतात, परंतु त्यांना ॲप्लिकेशन फ्रॉड मानले जाईल. पॉलिसीअंतर्गत कव्हर केलेल्या सदस्यांविषयी पूर्व-विद्यमान आजार प्रकट न करणे किंवा अचूक तपशील प्रदान न करणे अशा काही परिस्थिती ॲप्लिकेशन फ्रॉड प्रकरणाच्या अंतर्गत येतात.

एलिजिबिलिटी फ्रॉड

अनेकवेळा लोक हेल्थ इन्श्युरन्स क्लेम , निर्दिष्ट आजार पॉलिसी अंतर्गत कव्हर्ड आहेत किंवा नाही हे जाणून घेतल्या शिवाय किंवा पॉलिसी अंतर्गत कव्हर्ड नसलेल्या व्यक्तीसाठी क्लेम सबमिट करणे. अशी सर्व प्रकरणे एलिजिबिलिटी फ्रॉड अंतर्गत येतात. पॉलिसीधारकांनी केलेला फ्रॉड कदाचित हे हेतूपूर्वक नसू शकतो. परंतु त्यामुळे निश्चितच अप्रिय परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. ज्यामध्ये क्लेम नाकारणे किंवा भविष्यातील कव्हरेज नाकारणे यांसारख्या स्थितीचा समावेश असू शकतो. तसेच वाचा: हेल्थ इन्श्युरन्स मध्ये प्रतीक्षा कालावधी

हेल्थ इन्श्युरन्स फ्रॉड करण्याचे परिणाम

हेल्थ इन्श्युरन्स कंपन्या जाणूनबुजून किंवा अनावधानाने फ्रॉड करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे पाऊल उचलतात.. भारतात हेल्थ इन्श्युरन्स फ्रॉड करणाऱ्यांना खालील परिणामांना सामोरे जावे लागेल:
  1. जर फ्रॉड खूपच गंभीर असेल तर तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी रद्द होऊ शकते.
  2. जर तुम्ही फ्रॉड मध्ये स्थितीत दोषी आढळल्यास तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो.
  3. तुम्हाला स्वत: ला संपूर्ण वैद्यकीय उपचारांचा खर्च अदा करावा लागेल.
  4. तुम्ही नेटवर्क हॉस्पिटल्समध्ये गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळविण्याची संधी गमावू शकता.
  5. तुमची विद्यमान पॉलिसी रिन्यू करताना तुम्हाला समस्या देखील येऊ शकते.
अनेकदा लोकांचा असा विश्वास असतो की इन्श्युरन्स कंपन्या क्लेमची पूर्ण रक्कम कधीही देत नाहीत आणि त्यामुळे अधिकचा क्लेम दाखल करतात. ज्यामुळे अनेकवेळा फ्रॉड घडून येतो.. तसेच, अनेक लोक आहेत ज्यांना त्यांच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीच्या वैशिष्ट्ये आणि कव्हरेजबद्दल माहिती नसते आणि त्यामुळे त्याची परिणिती फ्रॉड करण्यामध्ये होते किंवा घेतलेल्या उपचारांसाठी त्यांना खिशातून मोठ्या प्रमाणात पैसे भरावे लागतात.. तुम्ही तुमचे पॉलिसी डॉक्युमेंट काळजीपूर्वक वाचणे आणि इन्श्युरन्स क्लेम पॉलिसी सुरू होण्यापूर्वी. खरं तर, भारतात हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीज 15 दिवसांच्या फ्री लुक कालावधीसह येतात. तुम्ही या 15 दिवसांमध्ये हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीची उपयुक्तता आणि प्रासंगिकता तपासू शकता आणि त्यासह सुरू ठेवण्याचा किंवा बंद करण्याचा पर्याय निवडू शकता. आजच्या अनिश्चित जगात आजारी पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे संकटाच्या काळात फायनान्शियल सिक्युरिटी असणे सर्वोत्तम ठरते.. वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे भारतातील हेल्थ इन्श्युरन्सच्या प्रमाणात दिवसागणिक वाढ दिसून येत आहे. तथापि, तथापि, हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीच्या यशस्वी आणि शाश्वत वापराचा मार्ग अजूनही खडतर आहे.. आम्हाला आशा आहे की, या लेखाच्या सहाय्याने निश्चितच हेल्थ इन्श्युरन्सचे प्रकार तुमच्या शंका दूर होतील. फसवणुकीला सामोरे जावे लागणार किंवा अनाहूतपणे तुमच्या हातून कोणती फसवणूक घडणार नाही. तसेच वाचा: आजच्या गतिमान काळात तुमच्याकडे हेल्थ इन्श्युरन्स असण्याची 3 कारणे

निष्कर्ष

शेवटी, भारतातील हेल्थ इन्श्युरन्स जागरुकता वाढत असताना, फसवणूकीमधील वाढ एक महत्त्वपूर्ण आव्हान आहे. जाणूनबुजून असो किंवा नसो, या फसवणुकीमुळे क्लेम नाकारणे, पॉलिसी रद्दीकरण आणि भविष्यातील कव्हरेज समस्या निर्माण होऊ शकतात. अशा जोखीम टाळण्यासाठी, पॉलिसीधारकांनी त्यांच्या पॉलिसी समजून घेणे, अचूक माहिती प्रदान करणे आणि फसवणूक पद्धतींपासून सतर्क राहणे आवश्यक आहे. हे अनपेक्षित गुंतागुंतीचा सामना न करता त्यांच्या कव्हरेजचा लाभ घेण्याची खात्री करते. *प्रमाणित अटी लागू इन्श्युरन्स हा विनंतीचा विषय आहे. लाभ, अपवाद, मर्यादा, अटी व शर्तींविषयी अधिक तपशीलासाठी, कृपया सेल्स पूर्ण करण्यापूर्वी सेल्स ब्रोशर/पॉलिसी मजकूर काळजीपूर्वक वाचा.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत