रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सेवा: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

ENG

Claim Assistance
Get In Touch
How Music Influences Your Mind, Body And Soul
नोव्हेंबर 23, 2021

संगीत सर्वांसाठी रामबाण: मन, शरीर आणि आत्मा यांसाठी संगीत कसे उपयुक्त ठरते?

संगीताचं अस्तित्व तेव्हापासून आहे. जेव्हा माणसाला जाणीव झाली. दोन काठ्या एकमेकांवर आदळल्यास त्यामधून नाद/कंपनाची निर्मिती होते.. संगीतामुळे मन:शांती मिळते. संगीतातून निर्माण होणारी आनंद, करुणा आणि प्रेमाची भावना प्रोत्साहित करू शकते. संगीत हा कोणत्याही सामुदायिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. यामुळे मन:शांती मिळते. त्यामुळे एक प्रकारची नवी थेरपी म्हणून संगीताचा उदय झाला आहे.

विसाव्या शतकाच्या मध्याला म्युझिक थेरपी ही स्वतंत्र शाखा म्हणून उदयास आली आणि प्रशिक्षित थेरपिस्ट हे उपचारासाठी त्यांचा वापर करू लागले.. आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास यामुळे आपण मेंदूची संरचना आणि कार्य कसे करू शकतो, आपले वर्तन कसे बदलू शकते आणि आपल्या भावनांना कसे प्रोत्साहित केले जाते यावर प्रकाश टाकणे शक्य झाले आहे.

संगीतामुळे मेंदूच्या क्रियाशीलता वाढते

संगीत अध्ययन करण्यामुळे मेंदूच्या कार्यरचनेत मोठा बदल होतो. त्यामुळे अधिक सक्रियता व बळकटी प्राप्त होते. संगीत ऐकल्यामुळे त्यांची विचारप्रक्रिया क्षमता, आकलन, सर्जनशीलता, एकाग्रता व स्मरणशक्ती यांचा विकास करणे सहज शक्य ठरते हे एका अभ्यासातून समोर आलं आहे.

संगीतामुळे तणाव संबंधित हार्मोन्सचे संतुलन

आरामदायी संगीत ऐकल्याने रक्तातील तणावाची हार्मोन्स पातळी कमी होते आणि काही प्रकरणांमध्ये औषधांची गरज देखील भासत नसल्याचे निरीक्षण भूलतज्ज्ञांनी नोंदविले आहे.

संगीतामुळे रोगप्रतिकार शक्तीला बळकटी

संगीत ऐकल्यामुळे मनाची आनंददायी स्थिती प्राप्त केली जाऊ शकते. ज्यामुळे तणाव निवारण व रोगप्रतिकार शक्तीच्या विकासासाठी आवश्यक असलेले मनोवैज्ञानिक बदल करणे सहज शक्य ठरते.

संगीतामुळे कार्यक्षमता वाढते

आपल्या कामादरम्यान एकाग्रता निर्माण करताना असंख्य अडथळे येत असतात.. संगीतामुळे कामामध्ये अधिकाधिक उत्पादकता निर्माण करणं सहज शक्य ठरतं.. संगीत न ऐकणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत संगीत ऐकणाऱ्या व्यक्ती त्यांचे काम अधिक वेगाने पूर्ण करतात व नावीन्यपूर्ण कल्पना मांडतात असे एका अभ्यासातून समोर आलं आहे.

संगीतामुळे स्मरणशक्ती आणि अध्ययन शक्ती बळकट होते

संगीतामुळे व्यक्तींमध्ये एकाग्रता विकसित होण्यास मदत होते. यामुळे स्पेलिंग किंवा गाणे क्षणार्धात आठवण्यास मदत होते. शाळेतील संगीत कार्यक्रमात सहभागी झाल्याने शिक्षण, प्रेरणा आणि वर्तनावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.

संगीतामुळे वेदना कमी होते

संगीतामुळे वेदना कशा कमी होऊ शकतात हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरीही डोपामाइन उत्सर्जनावर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.. मणक्याच्या शस्त्रक्रियेपूर्वी संगीत ऐकण्याची सवय नसणाऱ्यांच्या तुलनेत संगीत ऐकण्याची सवय असलेल्या व्यक्तींना कमी वेदना होतात.

संगीतामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते

ताण आणि चिंता हे प्रमुख घटक आहेत जे झोपेवर परिणाम करतात. तणावमुक्त व चिंतारहित जीवनशैलीसाठी संगीत उपयुक्त ठरते. संशोधनातून समोर आलं आहे की, संगीत ऐकल्याने अधिक आरामदायी झोपे मिळते आणि झोपेच्या पॅटर्नमध्ये सुधारणा होते. काही प्रकरणांमध्ये ते अनिद्रेच्या स्थितीत उपचारासाठी मदत करू शकते.

खास तुमच्यासाठी

जागतिक संगीत दिनानिमित्त श्रवणीय संगीताचा आनंद घ्या. तुमचे शरीर, मन व आत्मा यांना अद्भभूत अनुभूती प्रदान करा.!

माहिती मिळवा मेडिकल इन्श्युरन्स पॉलिसी विषयी. जी बजाज आलियान्झ द्वारे प्रदान केली जाते आणि स्वत:ला तसेच तुमच्या प्रियजनांना सुरक्षित करा.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

  • Johnny - May 3, 2019 at 1:07 pm

    I like folk bands! I really do! And yes, it helps me a lot to relax my mind.

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत