शतकानुशतके, जहाजे वाहतुकीचे साधन म्हणून वापरली जातात. विमानापुर्वीचे युग व्यापार आणि दळणवळण सुलभ करण्यासाठी समुद्री मार्गांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून होते. परंतु समुद्री मार्ग कधीही धोक्यांपासून मुक्त नव्हते. ते खराब हवामान, टक्कर, अपघात आणि समुद्री चाच्यांद्वारे अपहरण यासारख्या विविध अनिश्चिततेने त्रस्त असायचे. या जोखमींनी मरीन इन्श्युरन्सला जन्म दिला आहे जे सर्वात जुन्या प्रकारच्या इन्श्युरन्सपैकी एक असल्याचे मानले जाते.
मरीन इन्श्युरन्स म्हणजे काय?
मरीन इन्श्युरन्स पॉलिसी जल मार्गाद्वारे होणाऱ्या मालाच्या वाहतुकीला कव्हर करते. हे केवळ मालवाहू जहाज किंवा जहाज साठीच नाही तर त्यात नेत असलेल्या कार्गोसाठी देखील इन्श्युरन्स कव्हर प्रदान करते. मूळ स्थान ते गंतव्य स्थानापर्यंत होणाऱ्या कोणत्याही नुकसानीला
मरीन इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत कव्हर केले जाते. चार प्रकारचे मरीन इन्श्युरन्स कव्हर आहेत जे तुम्ही मिळवू शकता -
हल आणि मशीनरी इन्श्युरन्स
हल ही जहाज किंवा मालवाहू जहाजाची मुख्य रचना असते. हल पॉलिसी जहाजाचे टॉर्सो आणि त्याला होणारे कोणतेही नुकसान कव्हर करते. फक्त जहाजच नाही तर इंस्टॉल केलेली मशीनरी देखील तितकीच महत्त्वाची असल्याने, हल पॉलिसी सामान्यत: हल आणि मशीनरी पॉलिसी म्हणून एकत्रित केली जाते. ती सामान्यपणे जहाज मालकाद्वारे निवडली जाते.
कार्गो इन्श्युरन्स
प्रवासादरम्यान मालाचे मालक त्यांच्या कार्गोची हानी, हरवणे किंवा चुकीच्या पद्धतीने हाताळण्याच्या जोखीमीचा सामना करतात. म्हणून, अशा जोखीमीपासून संरक्षण करण्यासाठी ज्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते, कार्गो पॉलिसी जारी केली जाते. हे पोर्ट, जहाज, रेल्वे ट्रॅक येथे किंवा तुमचा माल लोड करताना आणि अनलोड करताना होणारी हानी कव्हर करते. कार्गो पॉलिसी ऑफर करत असलेले कव्हरेज हे त्यासाठी आकारण्यात येणाऱ्या प्रीमियमच्या तुलनेत खूप जास्त असते.
लायबिलिटी इन्श्युरन्स
प्रवासादरम्यान, त्याच्या कार्गोसह जहाजाला क्रॅश, टक्कर किंवा इतर प्रकारच्या जोखीमींचा सामना करावा लागू शकतो. जिथे घटक जहाज मालकाच्या नियंत्रणाबाहेर असतात, तिथे लायबिलिटी मरीन इन्श्युरन्स पॉलिसी मालकाला कार्गो मालकांनी केलेल्या क्लेमपासून संरक्षित करते.
फ्रेट इन्श्युरन्स
मालवाहतुकीची हानी झाल्यास, शिपिंग कंपनीला नुकसान भरावे लागेल. फ्रेट इन्श्युरन्स या संदर्भात शिपिंग कंपनीचे हित सुरक्षित ठेवते. मालाच्या वाहतुकीशी संबंधित जोखीम प्रत्येक प्रकारच्या प्रवासासाठी भिन्न असते. अशा प्रकारे वेगवेगळ्या कस्टमर्सना वेगवेगळ्या प्रकारच्या मरीन इन्श्युरन्स कव्हरेजची आवश्यकता असते. येथे काही सामाईक प्रकारचे कव्हरेज उपलब्ध आहेत -
- कार्गो लोड करताना किंवा अनलोड करताना कोणतेही नुकसान किंवा हानी.
- माल समुद्रात फेकणे किंवा मालवाहू जहाजातून पाण्यात पडणे.
- मालवाहू जहाज बुडणे आणि अडकणे.
- आगीमुळे नुकसान.
- नैसर्गिक आपत्ती.
- टक्कर, दुर्घटना किंवा अपघात
- एकूण नुकसान कव्हरेज.
बहुतांश मरीन इन्श्युरन्स कव्हरेजमध्ये कार्गोची हानी किंवा नुकसान समाविष्ट असताना, काही प्लॅन्समध्ये सीमापार नागरी त्रास किंवा समुद्री चाच्यांच्या हल्ल्यांच्या संदर्भात मर्यादा असतात. चला आपण तुमच्या मरीन इन्श्युरन्स कव्हरेजमधील अपवाद समजून घेऊया-
- तुमच्या इन्श्युरन्स कव्हर अंतर्गत कोणतेही नियमित नुकसान वगळले जाते.
- मालाच्या अपुर्या आणि चुकीच्या पॅकेजिंगमुळे झालेली हानी.
- वाहतुकीमध्ये डीले झाल्यामुळे होणारे खर्च तुमच्या कमर्शियल इन्श्युरन्स
- नुकसान निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेली कोणतीही हेतूपूर्वक हानी.
- राजकीय अशांतता, युद्ध, दंगली आणि यासारख्याच परिस्थितीमुळे झालेली हानी.
तर मरीन इन्श्युरन्स प्लॅन वापरून तुमच्या कार्गोला इन्श्युअर करण्याची खात्री करा कारण ते तुमच्या बिझनेसला आर्थिक सहाय्य प्रदान करते आणि प्रवासामधील धोक्यांविषयी चिंता करण्याऐवजी विस्तारावर लक्ष केंद्रित करण्यास तुम्हाला मदत करू शकते. समजूतदार बना आणि इन्श्युअर्ड राहा.
प्रत्युत्तर द्या