रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सेवा: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

ENG

Claim Assistance
Get In Touch
PMJAY: Ayushman Bharat Yojana
एप्रिल 17, 2022

पीएमजेएवाय स्कीम (आयुष्मान भारत योजना): पात्रता आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन

आकस्मिकपणे उद्भवणाऱ्या आरोग्य समस्या श्रीमंत व गरीब असा भेदभाव करत नाही. सर्वांनाच आकस्मिक आरोग्य संकटांचा सामना करावा लागतो. काही व्यक्तींना इतरांच्या तुलनेने अधिक सामना करावा लागतो. तुमच्या दैनंदिन सवयी आणि जीवनशैली तसेच तुम्ही सेवन करत असलेले खाद्यपदार्थ, तुमच्या सवयी आणि अन्य बाबींवर देखील अवलंबून असते. म्हणून, राष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित ठेवण्यासाठी भारत सरकारने आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे. युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज प्राप्त करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. आयुष्मान भारत स्कीमचा उद्देश "कुणीही वंचित राहू नये" वचनबद्धतेसह शाश्वत विकास साधण्याचा आहे. आयुष्मान भारत योजना सर्वसमावेशक गरज-आधारित दृष्टीकोनासाठी क्षेत्रीय आणि विभागनिहाय बदल करण्याचा विचार करीत आहे. आयुष्मान भारत योजनेचे महत्वाचे दोन भाग आहेत -
  • हेल्थ आणि वेलनेस सेंटर
  • प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (पीएमजेएवाय)

हेल्थ आणि वेलनेस सेंटर

भारत सरकारने 2018 फेब्रुवारीमध्ये सध्याचे उप-केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे हेल्थ आणि वेलनेस सेंटरमध्ये रुपांतरण केले आहे. प्राथमिक उद्देश म्हणजे गरिबांपर्यंत हेल्थ केअर पोहचविणे आणि उपलब्ध करणे हा आहे. या केंद्रांची मुख्य विशेषता म्हणजे विनामूल्य निदान सेवा आणि आवश्यक औषधांसह मातृत्व तसेच बालसंगोपन सेवांची उपलब्धता.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (पीएमजेएवाय)

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा पीएमजेएवाय या आयुष्मान भारत योजनेच्या दुसरा टप्प्याला 23 सप्टेंबर रोजी सुरुवात केली. पीएमजेवायए ही जगभरातील हेल्थ इन्श्युरन्स पैकी सर्वात मोठी योजना मानली जाते . याद्वारे निदान चाचणी, प्री-हॉस्पिटलायझेशन खर्च आणि वैद्यकीय ट्रीटमेंटच्या खर्चासाठी प्रति वर्ष ₹ 5 लाखांचे कव्हरेज प्रदान केले जाते. तसेच, कॅशलेस हेल्थ इन्श्युरन्स वैशिष्ट्य तसेच कागदरहित सुविधा पीएमजेएवाय अंतर्गत उपलब्ध आहे. पीएमजेएवाय अंतर्गत एकूण 40% भारतीय लोकसंख्येला कव्हरेज प्राप्त झाले असून अंदाजित 10.74 कोटींहून अधिक निम्न उत्पन्न गटातील कुटुंबांना थेट लाभ मिळाला आहे. या योजनेअंतर्गत समाविष्ट असलेले लोक ग्रामीण आणि शहरी भागातील सामाजिक-आर्थिक जातीय जनगणना 2011 (एसईसीसी 2011) अंतर्गत संशाधनाची उपलब्धता आणि व्यवसायाच्या निकषांवर आधारित गणना केलेले आहेत. पूर्वीची पीएमजेएवाय ही राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना (एनएचपीएस) म्हणून ओळखली जाते. 2008 मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना (आरएसबीवाय) अंतर्गत समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे, या पूर्वीच्या योजनांतर्गत संरक्षित असलेल्यांना ऑटोमॅटिकरित्या पीएमजेएवाय अंतर्गत समाविष्ट केले जाते, ज्यामुळे त्यांच्या गरिबांपर्यंत पोहोचण्याचा विस्तार होतो.

आयुष्मान भारत योजना स्कीमचे लाभ

  • पीएमजेएवाय स्कीम मध्ये रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच्या 3 दिवसांपर्यंत आणि रुग्णालयात दाखल केल्यानंतरच्या 15 दिवसांपर्यंतच्या औषधांचा खर्च समाविष्ट आहे.
  • कुटुंबाचा आकार, वय किंवा लिंगाच्या आधारावर कोणतेही प्रतिबंध नाही.
  • पहिल्या दिवसापासून कोणत्याही पूर्व-विद्यमान आजारांसाठी कव्हरेज. शून्य प्रतीक्षा कालावधी.
  • डेकेअर खर्चासाठी देखील कव्हरेज आहे.
  • या योजनेच्या अंतर्गत नोंदणीकृत व्यक्तींना कागदरहित सुविधेसह कॅशलेस हेल्थ इन्श्युरन्स सुविधा.
  • पीएमजेएवाय अंतर्गत सुविधांचा ॲक्सेस संपूर्ण देशभरात उपलब्ध आहे.

ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येसाठी पीएमजेएवाय पात्रता निकष

आयुष्मान भारत स्कीमचा उद्देश दहा कोटींपेक्षा जास्त कुटुंबांना म्हणजेच अंदाजित 50 कोटींहून अधिक व्यक्तींना थेट लाभ पोहचविण्याचा उद्देश आहे. परंतु शहरी आणि ग्रामीण भागासाठी निकष भिन्न आहेत.

PMJAY रुरल

ग्रामीण भागात आरोग्य सेवांची उपलब्धता ही सर्वात मोठी चिंताजनक बाब ठरत आहे आणि दिवसागणिक वैद्यकीय आरोग्य सेवांवरील खर्चामधील वाढीमुळे चिंतेत भर पडत आहे.. अनेकदा असे दिसून येते की लोक मोठ्या वैद्यकीय बिलांची परतफेड करण्यासाठी कर्जाच्या विळख्यात अडकतात. पीएमजेएवाय खालील प्रकारच्या ग्रामीण भागातील लोकांसाठी उपलब्ध आहे -
  1. कोणत्याही पुरुष सदस्याशिवाय असलेले 16 ते 59 वर्षे वयोगटातील कुटुंब.
  2. कोणत्याही प्रौढ व्यक्तीशिवाय असलेले 16 ते 59 वर्षे वयोगटातील कुटुंब.
  3. दिव्यांग सदस्य असलेले आणि सक्षम शरीराचे प्रौढ सदस्य नसलेले कुटुंब.
  4. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील कुटुंबे.
  5. भूमिहीन कुटुंबे जे त्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग मजूरी द्वारे प्राप्त करतात.
  6. तात्पुरत्या भिंती आणि छतासह एक खोली असलेल्या घरात राहणारे कुटुंब.
  7. सफाई कामगार म्हणून काम करणारे कुटुंब.
  8. घर नसलेले कोणतेही कुटूंब.
  9. मूळ आदिवासी समूह.
  10. कायद्यानुसार वेठबिगार.
  11. आत्यंतिक गरीबीत जीवन जगतात व त्यांचे हातावर पोट आहे.

PMJAY अर्बन

प्रति कुटुंबासाठी ₹ 5 लाख इन्श्युरन्स कव्हरसह, आयुष्मान भारत स्कीम द्वारे शहरी भागातील खालील कॅटेगरी अंतर्गत व्यक्तींना लाभ घेता येईल -
  1. कापड वेचक
  2. भिक्षुक
  3. घरेलू कामगार
  4. फूटपाथवर व्यवसाय करणारे हातगाडी वरील विक्रेते, चांभार किंवा हॉकर्स किंवा अन्य कोणत्याही व्यक्ती.
  5. बांधकाम कामगार, प्लंबर, कामगार, पेंटर्स, वेल्डर्स, सिक्युरिटी गार्ड्स
  6. स्वीपर्स आणि स्वच्छता कर्मचारी
  7. ड्रायव्हर, कंडक्टर, हेल्पर, कार्ट किंवा रिक्षाचालक आणि हेड लोड वर्कर्स यासारखे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस ऑफर करणाऱ्या व्यक्ती.
  8. घरेलू कामगार, टेलर्स आणि हस्तकला कारागीर सह कलाकार.
  9. लघू आस्थापनांमधील दुकानदार, सहाय्यक किंवा व्यक्ती, डिलिव्हरी बॉईज आणि वेटर्स.
  10. वॉशर-मेन किंवा चौकीदार.
वरील व्यतिरिक्त, राष्ट्रीय स्वास्थ्य बीमा योजना (आरएसबीवाय) अंतर्गत समाविष्ट कुटुंबांनाही या योजनेंतर्गत कव्हर केले जाईल.

आयुष्मान भारत योजना स्कीम अंतर्गत नॉन-कव्हर म्हणजे काय?

खालील व्यक्ती किंवा कुटूंब पीएमजेएवाय मधून वगळले जातील -
  1. कोणतेही कुटुंब आयकर कक्षेच्या अंतर्गत असेल आणि प्राप्तिकर किंवा व्यावसायिक कर भरत असेल.
  2. सरकारी कर्मचारी म्हणून सदस्य म्हणून असलेले कुटुंब.
  3. सरकारकडे रजिस्टर्ड बिगर-कृषी उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्ती.
  4. कुटुंबातील कोणताही सदस्य ज्याची मासिक कमाई प्रति महिना ₹ 10,000 पेक्षा अधिक आहे.
  5. ₹ 50,000 च्या क्रेडिट मर्यादेसह किसान कार्डधारक कुटुंब.
  6. दुचाकी, तीनचाकी किंवा चार-चाकी किंवा मोटराईज्ड फिशिंग बोट असलेल्या व्यक्ती.
  7. फ्रीज आणि लँडलाईन फोन असलेले कुटुंब.
  8. ज्यांच्याकडे सिंचन उपकरणासह 2.5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे.
  9. जे पक्क्या घरांमध्ये वास्तव्याला आहेत.

पीएमजेएवाय नोंदणी प्रक्रिया

आयुष्मान भारत योजनेच्या रजिस्ट्रेशन साठी कोणत्याही विशेष प्रोसेसचे अनुसरण करण्याची आवश्यकता नाही. पीएमजेएवाय अंतर्गत लाभार्थींची ओळख सामाजिक-आर्थिक जातीय जनगणना, 2011 (एसईसीसी 2011) आणि आरएसबीवाय योजनेद्वारे निश्चित केली जाते. पीएमजेएवाय योजनेच्या अंतर्गत तुमची पात्रता तपासू शकता - एसईसीसी 2011 द्वारे ओळख निश्चित केल्यानंतर आणि यापूर्वीच आरएसबीवाय योजनेचा भाग असलेल्या सर्व लाभार्थ्यांना लागू होण्यापासून पीएमजेएवायची कोणतीही विशेष आयुष्मान भारत रजिस्ट्रेशन प्रक्रिया नाही. तथापि, तुम्ही पीएमजेएवायचे लाभार्थी होण्यास का पात्र आहात हे याठिकाणी तपासू शकता.
  • प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • 'मी पात्र आहे' बटनावर क्लिक करा.
  • यानंतर, तुमचा मोबाईल नंबर आणि सिक्युरिटी कॅप्चा एन्टर करा आणि 'ओटीपी निर्माण करा' वर क्लिक करा.’
  • तुमचे राज्य निवडण्यासह पुढे सुरू ठेवा आणि तुमचे नाव किंवा एचएचडी नंबर किंवा रेशन कार्ड किंवा मोबाईल नंबरद्वारे सर्च करा.
वरील प्रोसेस मधून तुम्हाला पीएमजेवायए स्कीम अंतर्गत तुमचे कुटुंब कव्हर आहे किंवा नाही याविषयीची माहिती प्राप्त होईल.. अधिक तपशिलासाठी एम्पॅनेल्ड हेल्थ केअर प्रोव्हायडरशी (ईएचसीपी) संपर्क साधून अप्लाय करण्याचा अन्य मार्ग आहे. *मानक अटी व शर्ती लागू इन्श्युरन्स हा विनंतीचा विषय आहे. लाभ, अपवाद, मर्यादा, अटी व शर्तींविषयी अधिक तपशीलासाठी, कृपया सेल्स पूर्ण करण्यापूर्वी सेल्स ब्रोशर/पॉलिसी मजकूर काळजीपूर्वक वाचा.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत