रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सेवा: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

ENG

Claim Assistance
Get In Touch
Third Party Vs Comprehensive Insurance
मार्च 30, 2021

थर्ड पार्टी आणि सर्वसमावेशक इन्श्युरन्समधील फरक

रस्त्यावरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि ती आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. पूर्वीच्या काळी, वाहन ही चैनीची वस्तु म्हणून होत जी काही मोजक्याच लोकांना परवडणारी होती. आजकाल, परिस्थिती वेगळी आहे. तो अक्षरशः दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. मोटर वाहन कायद्याने वाहन वापरात असताना किमान वैध थर्ड-पार्टी इन्श्युरन्स असणे अनिवार्य केले आहे. थर्ड-पार्टी इन्शुरन्समध्ये भेडसावणारी एक मोठी कमतरता म्हणजे ती थर्ड पार्टीकडून होणारे नुकसान आणि हानी कव्हर करते. तरीही, पॉलिसीधारकाला स्वत: झालेले नुकसान आणि हानीसाठी काहीही दिले जात नाही. यामुळे एक प्रश्न निर्माण होतो: अशी कोणतीही पॉलिसी अमलात आहे का जेथे तुम्ही तुमचे स्वतःचे नुकसान आणि हानी देखील कव्हर करू शकता? याचे उत्तर 'होय' आहे.’ अशा पॉलिसीला सर्वसमावेशक पॉलिसी म्हणून ओळखल्या जातात. आणि आणखी एक प्रश्न मनात निर्माण होतो. पॉलिसीच्या कार इन्श्युरन्सचा प्रकार काही फरक आहे का? थर्ड-पार्टी आणि सर्वसमावेशक इन्श्युरन्स पॉलिसीमधील फरक काय आहेत याबद्दल खाली अधिक जाणून घ्या.  
फरकाचा मुद्दा थर्ड-पार्टी इन्श्युरन्स सर्वसमावेशक इन्श्युरन्स
अर्थ थर्ड-पार्टी इन्श्युरन्स ही एक पॉलिसी आहे जिथे थर्ड-पार्टी आणि पॉलिसीधारकादरम्यान अपघात झाल्यास थर्ड पार्टीचे नुकसान आणि हानी इन्श्युअर्ड केली जाते. सर्वसमावेशक इन्श्युरन्स थर्ड पार्टीचे नुकसान आणि हानी तसेच विविध परिस्थितीत पॉलिसीधारकाला कव्हर करते.
कव्हरेज बाईक इन्श्युरन्स व कार इन्श्युरन्स पॉलिसीचे थर्ड पार्टी कव्हरेज हे केवळ थर्ड पार्टीला झालेली इजा आणि त्यांच्या वाहनाला झालेल्या नुकसानीपुरते मर्यादित आहे. सर्वसमावेशक इन्श्युरन्समध्ये थर्ड-पार्टीचे नुकसान आणि दुखापती आणि पॉलिसीधारक आणि त्याच्या वाहनाला झालेल्या हानी आणि जखमा कव्हर करणारा अधिक व्यापक दृष्टिकोन असतो.
ॲड-ऑन्सची व्याप्ती थर्ड-पार्टी इन्श्युरन्सकडे ॲड-ऑन्सचा कोणताही वाव नाही. तुमच्या गरजांनुसार सर्वसमावेशक पॉलिसी तयार केली जाऊ शकते. वैयक्तिक दुखापती संरक्षण कव्हर, रस्त्यावरील सहाय्य, इंजिन बदलणे, शून्य घसारा कव्हर यासारख्या सर्वसमावेशक पॉलिसींमध्ये ॲड-ऑन्स उपलब्ध आहेत. अर्थात, हे सर्व उच्च प्रीमियम किमतीसह येतात, परंतु पर्याय उपलब्ध करून दिला जातो.
बेनिफिट्स ● थर्ड-पार्टी इन्श्युरन्स हा रस्त्यावर वाहन चालविण्यासाठी किमान आवश्यक असल्यामुळे तुम्हाला विद्यमान कायद्यांचे पालन करण्यास मदत करते ● हे तुम्हाला थर्ड-पार्टीशी संबंधित अपघातांशी संबंधित आर्थिक जोखमीपासून तुमचे संरक्षण करते. ● यामुळे तुम्हाला मनःशांती मिळते की कोणत्याही दुर्दैवी घटनेत तुमच्या बचतीला कोणताही फटका बसणार नाही. ●        थर्ड पार्टी कार इन्श्युरन्स सर्वसमावेशक पॉलिसीच्या तुलनेत कमी प्रीमियम असतो आणि किफायतशीर असते. ● हे थर्ड-पार्टीच्या खर्चासह तुमच्या वाहनाचे नुकसान कव्हर करते. ● तुम्ही ॲड-ऑन्स घेऊ शकता आणि तुमच्या गरजांनुसार तुमची पॉलिसी कस्टमाईज करू शकता. ● हे पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्ती आणि आग आणि चोरी यांसारख्या मानवनिर्मित आपत्तींच्या प्रसंगी नुकसान कव्हर करते. ● जर तुम्ही ॲड-ऑन्स निवडले तर ते तुम्हाला रस्ता सहाय्य आणि शून्य घसारा कव्हर देखील प्रदान करते, जे गरजेच्या वेळी खूपच उपयुक्त ठरू शकते. ● थर्ड-पार्टी इन्श्युरन्सच्या तुलनेत प्रीमियम जास्त आहे.
मर्यादा ● थर्ड-पार्टी इन्शुरन्स पॉलिसीचा मुख्य दोष म्हणजे ती पॉलिसीधारकाच्या वाहनाला झालेल्या नुकसानीची भरपाई करत नाही. ● चोरी किंवा आग यासारख्या परिस्थितीत, ही पॉलिसी तुमच्या मदतीला येणार नाही. ● हे वाहनाच्या वयामुळे झालेले नुकसान आणि झालेली झीज या नुकसानाची भरपाई करत नाही. ● या इन्श्युरन्समध्ये काही वाहनाचे भाग कव्हर केलेले नाहीत. त्यामुळे त्या भागांचे कोणतेही नुकसान झाल्यास, तो खर्च कार इन्श्युरन्स कंपनीला नव्हे तर मालकाला स्वत: उचलावा लागतो. ● आण्विक हल्ला किंवा युद्धासारख्या घटनांमुळे झालेल्या नुकसानीच्या बाबतीत या पॉलिसीचा काहीही उपयोग होणार नाही.
अपवाद ● मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे झालेल्या नुकसानीची प्रकरणे ● जेव्हा चालकाकडे वैध चालक परवाना नसतो● अपघात हे जाणीवपूर्वक केलेले कृत्य असल्याचे सिद्ध झाल्यावर ● ज्या ठिकाणी वाहनाचा वापर बेकायदेशीर कामासाठी केला जात होता ● अपघाताव्यतिरिक्त इतर कोणत्याही परिस्थितीमुळे होणारे नुकसान भरून काढले जाणार नाही. याचा अर्थ असा की कोणतेही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीचे नुकसान देय असणार नाही. ● मद्यपान करून वाहन चालवताना झालेले नुकसान. ● जेव्हा एखादी व्यक्ती वैध परवाण्याशिवाय गाडी चालवत असते● परिणामी नुकसान म्हणजेच, अपघातानंतर होणारे नुकसान, विशेषत: ॲड--ऑन म्हणून घेतल्याशिवाय कव्हर केले जात नाही. ● यांत्रिक बिघाडामुळे होणारे नुकसान हे सर्वसमावेशक इन्श्युरन्स पॉलिसीचा भाग असू शकत नाही. ● युद्ध आणि विद्रोह किंवा आण्विक हल्ल्यामुळे झालेले नुकसान किंवा हानी ● जाणीवपूर्वक केलेला अपघात ● बेकायदेशीर कारणांसाठी वापरलेले वाहन
  एफएक्यू: “मी 10 वर्ष जुनी सेकंड-हँड कार चालवतो. सर्वसमावेशक किंवा थर्ड पार्टी इन्श्युरन्स यापैकी कोणता चांगला आहे??” नैनाने विचारले. जर तुमची कार सेकंड-हँड आणि 10 वर्ष जूनी असेल तर थर्ड-पार्टी इन्शुरन्स पुरेसा असेल कारण कारचे मूल्य त्याच्या मूळ किमतीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहे आणि नुकसान भरपाईसाठी तुम्हाला जास्त खर्च येणार नाही. “माझ्याकडे एक नवीन आणि बरीच महागडी कार आहे आणि मी नियमितपणे माझ्या कामाच्या ठिकाणी गाडी चालवतो. सर्वसमावेशक किंवा थर्ड पार्टी इन्श्युरन्स पॉलिसी कोणती पॉलिसी चांगली आहे??” परेशने विचारले. कारचे मूल्य जास्त असल्याने सर्वसमावेशक पॉलिसी असण्याचा सल्ला दिला जातो आणि नवीन आहे, त्यामुळे जर कारला कोणतेही नुकसान झाले तर ते तुमच्या खिशावर ताण पडू शकतो.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत