सकाळचे 9 वाजले आहे आणि श्री. केशव यांना कामावर निघण्यासाठी आधीच उशीर झाला आहे. आपली बॅग पॅक करण्याची गडबड सुरू आहे. त्यामुळे नेहमीच्या सार्वजनिक वाहतूक साधनाच्या ऐवजी त्यांनी स्वत:च्या बाईक वर जाण्याचा निर्णय घेतला. नियमित तपासणीसाठी ट्रॅफिक अधिकारी त्यांना थांबवतात. तेव्हाच श्री. केशवला लक्षात आले की ते त्यांच्या वाहनाचे डॉक्युमेंट्स घरी विसरले आहेत! मोटर व्हेईकल्स ॲक्ट, 2019 मध्ये सुधारणा करण्यात आल्याने विविध वाहतूक कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला आहे. वरील परिस्थितीत, श्री. केशव यांना निःसंशयपणे निष्काळजीपणा केल्याबद्दल त्याच्या खिशावर भुर्दंड पडणार आहे. त्याच्या केसमध्ये, हे नियम निर्दिष्ट करतात की प्रत्येक मोटर वाहन मालकाकडे वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी), पोल्यूशन कंट्रोल सर्टिफिकेट (पीयूसी) आणि
मोटर इन्श्युरन्स पॉलिसी सर्टिफिकेट असावे. परंतु आपणास माहित आहे काय की आपल्याला यापुढे या डॉक्युमेंट्सच्या फिजिकल कॉपी बाळगण्याची आवश्यकता नाही? शेवटी, आपल्यापैकी बहुतांश लोक आता आपल्या खिशात स्मार्टफोन बाळगतात. डिजिटल इंडिया उपक्रमासह, अनेक कायद्यांमधील सुधारणांनी कागद-आधारित डॉक्युमेंट्स बाळगण्याची गरज काढून टाकली आहे. केंद्रीय मोटार वाहन नियमांच्या अलीकडील दुरुस्तीत हेच आढळून आले आहे. ज्यामध्ये असे नमूद केले आहे की एखादी व्यक्ती त्या/ तिचे आरसी, पीयूसी, तसेच दुचाकी वाहनाचे /
कार इन्श्युरन्स पॉलिसी डॉक्युमेंट्स इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये बाळगू शकतात. त्यासाठी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दोन मोबाईल ॲप्लिकेशनला अधिकृत केले आहेत: डिजिलॉकर आणि एम-परिवहन. तुमच्या डॉक्युमेंटची डिजिटल कॉपी यापैकी कोणत्याही ॲप्लिकेशनमध्ये स्टोअर केली जाऊ शकते आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा वाहतूक अधिकाऱ्यांना सादर केली जाऊ शकते.
तसेच वाचा:
भारतात कार चालविण्यासाठी अनिवार्य डॉक्युमेंट्सची यादी
डिजिलॉकर
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचा (मेटी) उपक्रम, डिजिलॉकर आपणांस अधिकृत डिजिटल डॉक्युमेंट्सचा ॲक्सेस देतो. शिवाय, माहिती तंत्रज्ञान (डिजिटल लॉकर सुविधा पुरविणारे मध्यस्थांद्वारे माहितीचे जतन आणि धारणा) नियम, 2016 नुसार या डॉक्युमेंट्सची वैधता फिजिकल डॉक्युमेंट्स इतकीच आहे. तुम्ही मोबाईल तसेच वेबवर ही सुविधा ॲक्सेस करू शकता. डिजिलॉकर सुविधा वापरून, तुम्ही केवळ तुमचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि ड्रायव्हिंग परवाना मिळवू शकत नाही, तर ई-आधार आणि बरेच काही यासारख्या इतर अनेक डॉक्युमेंट्सची पूर्तता करू शकता. तसेच, तुम्ही शिक्षण, बँकिंग आणि इन्श्युरन्स क्षेत्रात नोंदणीकृत संस्थांकडून जारी केलेली डॉक्युमेंट्स देखील इम्पोर्ट करू शकता.
डिजिलॉकरमध्ये डॉक्युमेंट्स कसे स्टोअर करावे?
ही अत्यंत सोपी प्रक्रिया आहे. जिथे तुम्हाले आधार आधारित पडताळणीद्वारे ॲप्लिकेशनमध्ये लॉग-इन करावे लागेल. यानंतर, रजिस्टर्ड डाटाबेसमधून डॉक्युमेंट्स घ्यावे लागतील. या डॉक्युमेंट्समध्ये तुमचा वाहन परवाना आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट समाविष्ट आहे. मोटर इन्श्युरन्स कंपनी डिजिलॉकरसह करारबद्ध आहे. ज्याद्वारे तुमचे डिजिटल कार व
टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी डॉक्युमेंट्स स्टोअर करण्यास मुभा मिळते. तथापि, हे ॲप्लिकेशन तुमचे पीयूसी स्टोअर करत नाही. म्हणजेच तुम्हाला त्याची फिजिकल कॉपी सोबत बाळगणे आवश्यक आहे.
तसेच वाचा:
पीयूसी सर्टिफिकेट: तुम्हाला माहित असावे असे सर्वकाही
एम-परिवहन
एम-परिवहन हे वाहनाचे डॉक्युमेंट्स आणि चालकाचा तपशील सुलभ पडताळणी करण्यासाठी डिझाईन केलेले ॲप्लिकेशन आहे. हे एक सोपे ॲप्लिकेशन आहे जे तुमच्या स्मार्टफोनवर डाउनलोड केले जाऊ शकते. तुमचे वाहन रजिस्ट्रेशन तपशील एन्टर करा ज्यानंतर तुम्ही तुमचे कार किंवा टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसीसह वैध डॉक्युमेंट प्राप्त करू शकता.
एम-परिवहनमध्ये डॉक्युमेंट्स कसे स्टोअर करावे?
गूगल प्ले स्टोअर किंवा iOS ॲप स्टोअरमधून ॲप डाउनलोड करा. तुम्हाला या ॲपमध्ये डॉक्युमेंट पाहण्यासाठी रजिस्टर करण्याची गरज नाही, तर तुम्हाला प्रत्यक्ष डॉक्युमेंटच्या अडचणीशिवाय प्रवास करायचे असताना रजिस्ट्रेशन गरजेचे असते. OTP-आधारित प्रक्रियेवर साईन-इन करणे ही एक सोपी प्रक्रिया आहे. यशस्वीरित्या साईन-अप केल्यानंतर, तुम्ही अकाउंट बनवू शकता आणि तुमचे लायसन्स आणि वाहन रजिस्ट्रेशन सारखे व्हर्च्युअल डॉक्युमेंट्स स्टोअर करू शकता. ॲप अंतर्गत माझे RC आणि माझे DL विभागात नेव्हिगेट करा आणि तुमचे डॉक्युमेंट्स जोडा आणि कोणत्याही चिंतेशिवाय प्रवास करा.
तसेच वाचा:
भारतातील ट्रॅफिक चलन अपडेट्स: संपूर्ण गाईड
वाहन दस्तऐवजांसाठी डिजिटल स्टोरेज
डिजिटल इंडिया उपक्रमासह, अनेक कायद्यांमधील सुधारणांनी कागद-आधारित डॉक्युमेंट्स बाळगण्याची गरज काढून टाकली आहे. केंद्रीय मोटर वाहन नियमांच्या नवीनतम दुरुस्तीतही दिसण्यात आले आहे, ज्यामध्ये नमूद केले आहे की एखादी व्यक्ती त्याचे/तिचे आरसी, पीयूसी, तसेच टू-व्हीलर/कार इन्श्युरन्स पॉलिसी डॉक्युमेंट्स इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये बाळगू शकते. त्यासाठी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दोन मोबाईल ॲप्लिकेशनला अधिकृत केले आहेत: डिजिलॉकर आणि एम-परिवहन. तुमच्या दस्तऐवजांची डिजिटल प्रत यापैकी कोणत्याही ॲप्लिकेशनमध्ये संग्रहित केली जाऊ शकते आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ट्रॅफिक अधिकाऱ्यांना सादर केली जाऊ शकते.
तसेच वाचा:
वर्ष 2019 मध्ये मोटर व्हेईकल अॅक्ट मधील प्रस्तावित सुधारणा
कृपया भारी ट्रॅफिक दंड भरणे टाळण्यासाठी या निफ्टी ॲप्सची दखल घेत असल्याचे सुनिश्चित करा. उपरोक्त उदाहरणाप्रमाणेच, श्री. केशवने टू-व्हीलर इन्श्युरन्स सर्टिफिकेटसह कागदपत्रे सादर करण्यासाठी कोणत्याही एका ॲप्लिकेशनचा वापर केला असता तर दंड टाळता आला असता.
प्रत्युत्तर द्या