ENG

Claim Assistance
Get In Touch
10 Tips You Should Know in Case the Traffic Police Stops You
मे 16, 2022

मुंबई वाहतूक पोलिस ई-चलन – स्थिती तपासणी आणि ई-पेमेंट प्रक्रिया

मुंबई! मनोरंजन विश्वाची व आर्थिक जगताची राजधानी. कधीही न झोपणार हे शहर 'स्वप्नांचे शहर' म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही सर्वाधिक लोकसंख्या असलेल्‍या शहरांपैकी एक आहे. दररोज अनेक वाहने वर्दळीच्या रस्त्यांवरून धावत असतात. वाहतूक पोलिस सतर्क असतात आणि कोणीही नियम मोडत असल्याचे आढळल्यास त्यासाठी कठोर पावले उचलली जातात. सुदैवाने मुंबईने देखील ई-चलन प्रणालीची अंमलबजावणी केली आहे. याद्वारे स्थानिक वाहतूक पोलिसांना नियम भंग करणार्‍यांंना ओळखण्यास आणि तसेच ई-चलनच्या स्वरूपात एसएमएसद्वारे दंड जारी करण्यास परवानगी दिली आहे. मुंबईमध्ये वाहनावरील चलन, पेमेंट आणि चलन स्थिती कशी तपासावी याविषयी अधिक जाणून घ्या.

ई-चलन म्हणजे काय?

आपण ई-चलन जाणून घेण्यापूर्वी चलन ही संकल्पना सर्वप्रथम जाणून घेऊया. सोप्या शब्दांत सांगायचे तर, चलन हा एक अधिकृत पेपर आहे ज्याद्वारे वाहतूक नियम आणि नियमनांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन मालक/चालकांसाठी जारी केला जातो. म्‍हणून जेव्हा ट्रॅफिक चलन जारी केले जाते, तेव्हा तुम्हाला मोटर व्हेईकल्स ॲक्ट, 1988 नुसार गुन्हाच्या आधारावर दंड भरणे आवश्‍यक आहे. वाहतूक पोलिस विभाग वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करत नसलेल्‍या कोणालाही चलन जारी करू शकतात. नियम हे अंमलबजावणी करण्यासाठी आहे. तुमच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी वाहतूक नियम बनवले जातात. तसेच, भारतीय रस्त्यांवर वाहन चालवताना इन्श्युरन्स पॉलिसी लागू असल्याची खात्री करा. जर नसल्यास तुमच्यासाठी योग्य निवड ठरु शकेल ऑनलाईन मोटर इन्श्युरन्स. ई-चलनची संकल्पना भारतीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय द्वारे अंमलात आणली गेली. आज आपण अशा काळात जगत आहोत जेव्हा जवळजवळ सर्वकाही इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. वाहन ई-चलनाची संगणकाद्वारे निर्मिती केली जाते आणि वाहतूक पोलिसांद्वारे वापरला जातो. भारतातील वाहतुकीच्या सर्व डिफॉल्टर्सना ई-चलन जारी केले जाते. वाहतूक सेवा सोयीस्कर आणि पारदर्शक बनविण्यासाठी भारत सरकारने ही प्रक्रिया सुरू केली आहे.

मुंबईमध्ये वाहन नंबरद्वारे ई-चलन ऑनलाईन कसे तपासावे?

नेमके कसे जारी केले जाते याच्या विचारात आहात? चला तर पुढील प्रक्रिया समजावून घेऊया. मुंबई वाहतूक पोलिस तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत. ही नजर कॅमेरा आणि स्पीड सेन्सरच्‍या रूपात स्थापित केली आहे. कॅमेरा वाहतूक पोलिस कंट्रोल रुमला लाईव्ह फीड पाठवतो. वाहतूक कंट्रोल रुम ही अशी जागा आहे. ज्याद्वारे वाहतूक लाईट्स मॅनेज केले जातात आणि डिफॉल्टर्सवर सातत्यपूर्ण लक्ष ठेवले जाते . हे कॅमेरा वाहन रजिस्ट्रेशन नंबर मिळवण्यासही मदत करतात. यातून, मुंबई वाहतूक पोलिस वाहन मालक/चालकाचे सर्व महत्त्वाचे तपशील प्राप्त करते. डिफॉल्टरच्या नावाने ई-चलन तयार केला जातो, जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर पाठवला जातो. जर सर्व गरज असेल तर ते होम ॲड्रेसवर पाठविले जाऊ शकते. डिफॉल्टरला चलन जारी केल्यापासून 60 दिवसांच्या आत पेमेंट करणे आवश्यक आहे. जारी केलेले ई-चलन तपासण्याचा मार्ग म्हणजे नियमित अंतराने महाराष्ट्र वाहतूक पोलिसांची वेबसाईट तपासणे. ई-चलन तपासण्याच्या स्टेप्स खालीलप्रमाणे:
  1. ई-चलन वेबसाईटला भेट द्या https://mahatrafficechallan.gov.in/payechallan/PaymentService.htm
 
  1. होमपेजवर, तुम्हाला 'चलन स्थिती तपासा' दिसेल’
  2. वाहन नंबर किंवा चेसिस/इंजिन नंबरचे शेवटचे चार अंक एन्टर करा किंवा तुम्ही चेसिस नंबर देखील एन्टर करू शकता
  3. स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा एन्टर करा
  4. 'सबमिट' वर क्लिक करा’
  5. 'तपशील मिळवा' वर क्लिक करा’
  6. येथे तुम्हाला तुमच्यासाठी जारी केलेल्या चलनांची संख्या दिसेल
आता तुम्हाला माहित आहे की मुंबईमध्‍ये वाहनावरील ऑनलाईन चलन कसे तपासावे. चला पुढे जाऊया आणि तसेच पेमेंट प्रक्रिया देखील समजून घेऊया.

मुंबई ई-चलन ऑनलाईन कसे भरावे?

ई-चलन ऑनलाईन भरणे ही एक सोपी प्रक्रिया आहे. ई-चलन जारी केल्यानंतर खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करा:
  1. आता, तुम्हाला स्क्रीनवर चलनची यादी दिसेल. ज्याचे पैसे भरावयाचे आहे त्‍यावर क्लिक करा
  2. 'आता पेमेंट करा' टॅबवर क्लिक करा
  3. तुम्हाला पेमेंट पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल
  4. तुमच्या सोयीनुसार पेमेंटची पद्धत निवडा
  5. एकदा ई-चलनचे पेमेंट पूर्ण झाले की, एक पावती प्राप्त होईल
आतापर्यंत तुम्हाला वाहन नंबरद्वारे ई चलन मुंबई ऑनलाईन कसे तपासावे आणि ऑनलाईन पेमेंट करायचे याची माहिती झाली आहे. आता, पेटीएममार्फत ई-चलनचे पेमेंट करण्याकडे तुम्हाला नेत आहे.

पेटीएम ॲपद्वारे मुंबई ई-चलन कसे भरावे?

पेटीएम मोबाईल ॲपद्वारे मुंबई ई-चलन देय करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे:
  1. मोबाईलवर पेटीएम ॲप उघडा
  2. 'रिचार्ज आणि बिल पेमेंट्स' च्या खाली स्क्रोल करा’. 'ट्रान्झिट' अंतर्गत 'चलन' वर टॅप करा’
  3. 'ट्रॅफिक अथॉरिटी' एन्टर करा’
  4. वाहन नंबर, चलन नंबर, इंजिन/चेसिस नंबर प्रविष्ट करा आणि 'पुढे सुरू ठेवा' वर टॅप करा’
  5. पेमेंटची योग्य पद्धत निवडा - एकतर कार्ड, पेटीएम यूपीआय किंवा वॉलेट
  6. ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्यानंतर, नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ईमेल वर माहिती पाठविली जाईल

मुंबईमध्ये वाहतूक उल्लंघन आणि दंड

खालील तक्त्यात वाहतूक नियमांच्या उल्लंघनानुसार सुधारित दंडात नमूद केला आहे:
रायडिंग/ड्रायव्हिंग करणे शिवाय बाईक/ कार इन्श्युरन्स पॉलिसी ₹2000
सीटबेल्टशिवाय वाहन चालवणे ₹1000
रायडर आणि को-रायडरचे हेल्मेटविना रायडिंग ₹1000
कोणताही वाहन परवाना नसणे ₹5000
जर वाहन तुम्ही चालवत असाल तर त्यावेळी फोन वापरू नका ₹5000
मद्यपान सेवन केले असतांना वाहन चालवणे ₹ 10,000 उल्लंघन पुनरावृत्ती स्थितीत ₹ 15,000
अतिवेगाने चालवणे एलएमव्ही ₹1000 ते ₹ 2000 एचपीव्ही/ एमपीव्ही ₹ 2000 ₹ 4000 (परवाना जप्त)
मोबाईल हातात असतांना रायडिंग/ड्रायव्हिंग ₹5,000
गती/रेसिंग ₹5000 उल्लंघनाची पुनरावृत्ती ₹ 10,000
सायलेंट झोनमध्ये हॉर्न वाजविणे ₹2000 उल्लंघनाची पुनरावृत्ती ₹ 4,000
टू-व्हीलरचे ओव्हरलोडिंग ₹2,000 आणि परवाना अपात्रता
फोर-व्हीलरचे ओव्हरलोडिंग ₹200 प्रति अतिरिक्त प्रवासी
रजिस्टर्ड डॉक्युमेंट्सशिवाय वाहन चालवणे ₹5,000 पुनरावृत्ती उल्लंघन: ₹ 10,000
अल्‍पवयीन अपराध ₹ 25,000, एका वर्षासाठी रजिस्ट्रेशन रद्द, अल्‍पवयीनच्‍या वयाच्या 25 वर्षांपर्यंत डीएल साठी अपात्र असेल
कोणत्याही आवश्यक तिकीटाशिवाय वाहन चालवणे ₹500
अवजड वाहनांचे संचलन रू. 5,000 ते रू. 10,000
रायडिंग/ड्रायव्हिंग अयोग्य ठरल्यानंतर ₹10,000
आपत्कालीन वाहन जात असताना अडथळा आणणे ₹10,000
ब्राईब ऑफरिंग (लाच देणे) दंडाची दुप्पट रक्कम, ज्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला
अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न करणे ₹2,000
स्रोत: https://trafficpolicemumbai.maharashtra.gov.in/fine/

जर तुम्ही तुमचे ई-चलन भरले नाही तर काय होते?

जर एखादा अपराधी 60 दिवसांच्या आत ई-चलन भरण्यात अयशस्वी झाला तर ई-चलन पुढे लोक अदालतकडे फॉरवर्ड केले जाते. कोर्ट प्रामुख्याने ई-चलन रक्कम वाढवू शकते किंवा अपराधीला 03 महिन्यांसाठी कारावासात देखील पाठविले जाते. ट्रॅफिक पोलिसांनी खटलापूर्व नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. दंड भरण्यासाठी लोक अदालत समोर अपराधी उपस्थित राहणे आवश्यक आहे. मोटर वाहन मालकांना एक टेक्स्ट मेसेज पाठविला जातो ज्यामध्ये एक लिंक असते. PDF फॉरमॅटमध्ये असलेली सूचना डाउनलोड करण्याची ती लिंक आहे. लोक अदालतमध्‍ये अनुपस्थित असलेल्या कोणत्याही मोटर वाहन मालकाला न्यायालयाद्वारे कार्यवाहीचा सामना करावा लागेल आणि अखेरीस अधिक दंड भरावे लागतील.

तुम्हाला जारी केलेले ई-चलन किती दिवसांत भरावे लागेल?

आदर्शपणे, पुढील कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी, ई-चलन जारी केल्यापासून 60 दिवसांच्या आत भरावे.

सारांश

दंड किंवा कायदेशीर परिणाम टाळण्यासाठी, तुम्ही भारतातील कायदे आणि नियमांचे पालन करत असल्याची खात्री करा. हे नियम रस्त्यावरील सुव्यवस्था आणि सुरक्षितता सुनिश्चित करतात. तुमचे इन्श्युरन्स पेपर्स तपासा. अडचणी टाळण्यासाठी तुम्ही तपासू शकता कार व टू व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी आणि तुम्ही पुरेसे इन्श्युअर्ड आहात हे निश्चित करा. कायद्यांचे पालन करा आणि जबाबदारीने वाहन चालवा! इन्श्युरन्स हा विनंतीचा विषय आहे. लाभ, अपवाद, मर्यादा, अटी व शर्तींबद्दल अधिक तपशिलांसाठी, कृपया खरेदी करण्यापूर्वी सेल्स ब्रोशर/ पॉलिसी मजकूर काळजीपूर्वक वाचा.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत