रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सेवा: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

ENG

Claim Assistance
Get In Touch
Duplicate Two Wheeler Insurance Copy Online
मार्च 31, 2021

ड्युप्लिकेट टू-व्हीलर इन्श्युरन्स कॉपी ऑनलाईन कशी मिळवावी?

आपण सर्वजण एक गोष्ट निश्चितपणे मान्य करू की, ज्यावेळी बाईकवर असतो तेव्हा गाडीचे डॉक्युमेंट्स सोबत बाळगण्याचा नेहमीच कंटाळा करतो. डॉक्युमेंट्स ठेवण्यासाठी बाईक मध्ये पुरेश्या प्रमाणात जागा देखील असत नाही. त्यामुळे बाहेर पडताना प्रत्येक वेळी सोबत बॅग घेऊन जाणे गैरसोयीचे ठरते. तुम्ही देखील असाच विचार करत आहात का? डॉक्युमेंट्स डिजिटल स्टोअर केल्यास निश्चितच फायदा होईल असं वाटते ना? जर तुम्हीही असा विचार करत असल्यास तुमच्यासाठी आनंदाची बातमी. वाहतूक मंत्रालयाने वाहनाचे डॉक्युमेंट्स डिजिटल स्वरुप स्वीकारण्यासाठी प्रत्येक राज्याच्या वाहतूक पोलिस विभागाला अधिकृतपणे सल्ला दिला आहे. तुम्ही टू व्हीलर इन्श्युरन्स ऑनलाईन प्राप्त करू शकता आणि इतर संबंधित डॉक्युमेंट्स सोबत शासकीय-मान्यताप्राप्त डिजिलॉकर, एम-परिवहन ॲप किंवा ई-वाहन विमा मध्ये स्टोअर करू शकता. जरी हा एक चांगला उपक्रम असला तरी लोकांमध्ये अजूनही संभ्रम आहे की, तरीही बाईक इन्श्युरन्सची सॉफ्ट कॉपी वैध असते का? अधिक सर्वसमावेशक उत्तर मिळवण्यासाठी, चला विस्तृत माहिती जाणून घेऊया.

भारतात गाडी चालवताना तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स सोबत बाळगणे आवश्यक आहे?

मोटर वाहन अधिनियम भारतामध्ये कोणतेही वाहन चालवताना तुम्हाला खालील डॉक्युमेंट्स बाळगणे अनिवार्य आहे:
  • वाहन परवाना: तुम्ही नेहमी चालवत असलेल्या वाहनासाठी तुमच्याकडे वैध वाहन परवाना असणे आवश्यक आहे.
  • रजिस्ट्रेशन कार्ड: तुम्ही चालवत असलेल्या वाहनाची आरसी असणे आवश्यक आहे. याद्वारे तुम्ही चालवित असलेले वाहन कायदेशीर वैध असल्याचे सिद्ध असते.
  • वाहन इन्श्युरन्स: भारत सरकारने वाहनाचे वैध इन्श्युरन्स कव्हर असणे अनिवार्य केले आहे. तुम्ही सादर करण्यास अयशस्वी ठरल्यास बाईक इन्श्युरन्स दंड आकारला जाऊ शकतो.
  • पीयूसी सर्टिफिकेट: पोल्यूशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट हे अनिवार्य आहे. या सर्टिफिकेट मुळे निश्चित होते की, तुमचे वाहन प्रशासनाने निर्धारित केलेल्या मापदंडानुसार आहे.

माझ्या बाईकचे डॉक्युमेंट्स डिजिटली कसे स्टोअर करावे?

बाईक इन्श्युरन्सची सॉफ्ट कॉपी आणि डिजिटल स्टोअर केलेले डॉक्युमेंट्स कसे मिळवावे याविषयी चिंता आहे का?? यासाठी सर्वात महत्वाचे ठरणार आहे ते म्हणजे सरकारद्वारे अधिकृत डिजिलॉकर, एम-परिवहन किंवा ई-वाहन विमा ॲप्लिकेशन प्ले स्टोअर वरुन डाउनलोड करणे. डाउनलोड पूर्ण झाल्यानंतर खालील स्टेप्स फॉलो करा:
  1. तुमच्या मोबाईल नंबरवरुन साईन-अप करा आणि आधार नंबर वापरून प्रमाणित करा.
  2. डॅशबोर्डवर 'अपलोड' पर्याय निवडा.
  3. आरसी, पीयूसी, डीएल आणि बाईक इन्श्युरन्स सॉफ्ट कॉपी फाईल्स निवडा आणि त्यांना ॲप्लिकेशनमध्ये अपलोड करा.
  4. दिलेल्या यादीमधून अपलोड केलेल्या डॉक्युमेंटचा फाईल प्रकार निवडा.
  5. 'सेव्ह' बटनावर क्लिक करा आणि तुम्ही निश्चितपणे पुढे सुरू ठेवू शकता.

बाईक डॉक्युमेंट्स ऑनलाईन स्टोअर करण्याचे लाभ

तुमचे बाईक डॉक्युमेंट्स ऑनलाईन स्टोअर करण्याचे काही लाभ खाली नमूद करण्यात आले आहेत:
  • तुम्हाला फिजिकल फॉरमॅटमध्ये डॉक्युमेंट्स सोबत ठेवण्याची गरज नाही.
  • वाहतूक पोलीस तुमच्या डॉक्युमेंट्सला डिजिटल स्वरुपात प्रमाणित करू शकतात.
  • डॉक्युमेंट्स गहाळ होण्याची किंवा हरवण्याची रिस्क नाही.
  • तुमच्या डॉक्युमेंट्सचा सहज ॲक्सेस, कधीही आणि कुठेही.

जर माझ्याकडे बाईक डॉक्युमेंट्सची सॉफ्ट कॉपी असेल परंतु फिजिकल कॉपी नसेल तर मला अडचण येऊ शकते का?

या प्रश्नाचे थेट उत्तर म्हणजे नाही. तुम्ही तुमच्या बाईकचे डिजिलॉकर, एम-परिवहन किंवा ई-वाहन इन्श्युरन्स ॲपमध्ये व्हेरिफाईड आणि स्टोअर केलेले डॉक्युमेंट्स सादर करू शकता. हे सर्व ॲप्स भारत सरकारद्वारे प्रदान केलेले आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांद्वारे इलेक्ट्रॉनिक फॉरमॅटमध्ये जारी केलेले डॉक्युमेंट्स सोबत बाळगा. त्यामुळे जेव्हा वाहतूक पोलिस तुम्हाला देशाच्या कोणत्याही भागात थांबवतील. तेव्हा तुम्हाला या सरकार मान्यताप्राप्त डिजिटल ॲप्स मधील तुमची आरसी, पीयूसी, परवाना आणि बाईक इन्श्युरन्स सॉफ्ट कॉपी सादर करण्याचा अधिकार आहे.

बाईक इन्श्युरन्सची सॉफ्ट कॉपी कशी मिळवावी?

जर तुम्ही टू-व्हीलर इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी केला असेल तर तुमच्या बाईक इन्श्युरन्सची सॉफ्ट कॉपी मिळवणे अत्यंत सोपे आहे. कोणत्याही डिजिटल डिव्हाईसवर डाउनलोड करण्यासाठी तुम्ही दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करू शकता.
  1. तुमच्या इन्श्युरन्स प्रोव्हायडरच्या वेबसाईटला भेट द्या.
  2. 'पॉलिसीचा प्रकार' असलेला पर्याय निवडा.
  3. पॉलिसी नंबर किंवा विचारलेला इतर कोणताही तपशील एन्टर करा.
  4. ओटीपी मार्फत तुमचे प्रोफाईल व्हेरिफाय करा.
  5. एकदा सिस्टीम तुम्हाला प्रमाणित केल्यानंतर तुम्ही तुमची बाईक इन्श्युरन्स पॉलिसी पाहू, डाउनलोड किंवा प्रिंट करू शकता.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

  1. जर माझ्या बाईकच्या डॉक्युमेंट्सची सॉफ्ट कॉपी डिजिलॉकर किंवा एम-परिवहन ॲपमध्ये स्टोअर केलेली नसेल तर स्वीकारली जाईल का?
दुर्दैवाने, नाही. केवळ सरकार मान्यताप्राप्त डिजिटल ॲप्लिकेशनमध्ये स्टोअर केलेले डॉक्युमेंट्स वैध मानले जातील.
  1. बाईक इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी करणे सुरक्षित आहे का?
होय, तुमच्या बाईकसाठी ऑनलाईन इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. बजाज इन्श्युरन्स, पॉलिसी बाजार इ. सारख्या प्रमाणित स्त्रोताकडून तुम्ही खरेदी करत आहात याची खात्री करा.
  1. मला केवळ माझ्या बाईकसाठी थर्ड-पार्टी इन्श्युरन्स मिळू शकेल का?
आम्ही संपूर्ण लाभ मिळविण्यासाठी तुमच्या बाईकसाठी सर्वसमावेशक इन्श्युरन्स खरेदी करण्याची शिफारस करतो. जर नसेल, बाईकसाठी थर्ड पार्टी इन्श्युरन्स तुम्हाला वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी हे सर्व पुरेसे आहे.

अंतिम विचार

चला काही मूलभूत प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया. बाईक इन्श्युरन्सची सॉफ्ट कॉपी वैध आहे का? या प्रश्नाचे उत्तर 'होय' आहे. तुमच्या बाईक डॉक्युमेंट्सची सॉफ्ट कॉपी शंभर टक्के वैध असेल. मात्र ते सरकारद्वारे अधिकृत ॲप्लिकेशनमध्ये डिजिटल स्टोअर केलेले हवे. त्यामुळे पुढील वेळी, तुम्ही तुमच्या बाईकवर बाहेर पडताना तुमचे बाईक डॉक्युमेंट्स निर्धास्तपणे घरी ठेवा व प्रवासाचा मनमुराद आनंद घ्या.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत