जर तुम्ही भारतीय रस्त्यांवर तुमचे टू-व्हीलर किंवा फोर-व्हीलर चालवत असाल तर वाहनाचा परवाना अनिवार्य डॉक्युमेंट आहे. हे महत्त्वाचे डॉक्युमेंट भारत सरकारद्वारे जारी केले जाते आणि रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस (आरटीओ) द्वारे प्रशासित केले जाते. भारतात, तुम्ही वयाच्या 16 व्या वर्षी वाहन परवान्यासाठी अप्लाय करू शकता, तात्पुरत्या वाहन परवान्याने सुरुवात करू शकता, जे नंतर तुम्ही 18 वर्षांचे झाल्यानंतर कायमस्वरुपी परवान्यामध्ये रूपांतरित केले जाऊ शकते. तथापि, तुम्हाला तुमचा वाहन परवाना प्राप्त करण्यासाठी विशिष्ट डॉक्युमेंट्स सबमिट करणे आणि ड्रायव्हिंग टेस्ट साठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
भारतात वाहन परवाना मिळविण्यासाठी खालील डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत:
- वयाचा पुरावा
- जन्म सर्टिफिकेट
- पॅन कार्ड
- पासपोर्ट
- 10th क्लासची मार्कशीट
- शाळा सोडण्याचे सर्टिफिकेट (ट्रान्सफर सर्टिफिकेट) ज्यावर जन्मतारीख नमूद केली आहे
- ॲड्रेसचा पुरावा
- आधार कार्ड
- पासपोर्ट
- वीज बिल
- मतदार ओळखपत्र
- भाडे करार
- गॅस बिल
- योग्यरित्या भरलेला ॲप्लिकेशन फॉर्म
- पासपोर्ट आकाराची छायाचित्रे
- प्रमाणित सरकारी डॉक्टरांद्वारे जारी केलेला फॉर्म 1A आणि 1
- ॲप्लिकेशन फी
भारतीय रस्त्यांवरील अडचणी आणि वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेऊन, भारत सरकार काही ड्रायव्हिंग आणि ट्रॅफिक नियम बदलण्याची योजना बनवत आहे. या नियमांमधील सुधारणा मोठ्या प्रमाणात भार असलेल्या रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्या लोकांमध्ये अधिक शिस्त आणण्याची अपेक्षा आहे. अशाचप्रकारे, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भारतात वाहन परवाना प्राप्त करण्यासाठी आधार कार्डला अनिवार्य डॉक्युमेंट बनवण्यासाठी लोक सभा मध्ये बिल प्रस्तावित केले. या बिलात ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर मोठा दंड आकारण्याचा आणि वाहन परवाना मिळवण्याची प्रोसेस डिजिटल करण्याचा प्रस्ताव देखील आहे. हे बिल यापूर्वीच लोक सभा मध्ये पास झाले आहे आणि आता राज्य सभा सदस्यांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. तर, होय, वाहन परवान्यासाठी अप्लाय करताना तुम्हाला लवकरच तुमचे आधार कार्ड अनिवार्यपणे सबमिट करावे लागेल. तसेच लक्षात ठेवा की तुमचे वाहन भारतीय रस्त्यांवर चालवताना, वैध वाहन परवान्याव्यतिरिक्त तुमच्याकडे मोटर इन्श्युरन्स पॉलिसी असणे देखील आवश्यक आहे. एक सर्वसमावेशक
टू-व्हीलर इन्श्युरन्स किंवा
कार इन्श्युरन्स पॉलिसी असणे चांगले आहे जेणेकरून कोणत्याही दुर्दैवी घटनेच्या बाबतीत तुम्ही संरक्षित असाल.
Very informative