जर तुम्हाला तुमच्या वाहनाची चोरी/अपघात यासारख्या भीषण परिस्थितीचा सामना करावा लागल्यास तुमची मोटर इन्श्युरन्स पॉलिसी तुम्ही आर्थिकदृष्ट्या संरक्षित राहाल याची खात्री करते. सर्वसमावेशक
मोटर इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला यासाठी कव्हर करते:
- वीज पडणे, भूकंप, पूर, टायफून, हरिकेन, वादळ इ. सारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे तुमच्या वाहनाला होणारे नुकसान/हानी.
- बर्गलरी, चोरी, अपघात, दंगा, संप इ. सारख्या दुर्दैवी घटनांमुळे तुमच्या वाहनाचे नुकसान किंवा हानी.
- मालक-ड्रायव्हरसाठी ₹2 लाख (फोर-व्हीलरच्या बाबतीत) आणि ₹1 लाखाच्या (टू-व्हीलरच्या बाबतीत) कव्हरेजसह पर्सनल ॲक्सिडेंट (पीए) कव्हर.
- थर्ड पार्टी (टीपी) कायदेशीर दायित्व जे तुमच्या वाहनामुळे थर्ड पार्टी (लोक/प्रॉपर्टी) चे नुकसान झाल्यामुळे होऊ शकते.
तुम्ही तुमच्या मोटर इन्श्युरन्स प्लॅनसह योग्य ॲड-ऑन कव्हर निवडून तुमच्या सर्वसमावेशक मोटर इन्श्युरन्स पॉलिसीद्वारे प्रदान केलेल्या कव्हरेजमध्ये अधिक वॅल्यू जोडू शकता. पुढील प्रश्न जो तुमच्या डोक्यात आला असेल, तर, विशिष्ट मोटर इन्श्युरन्स पॉलिसीचा खर्च किती आहे? आणि, तुमचे मोटर इन्श्युरन्स प्रीमियम कोणते घटक परिभाषित करतात? तुम्ही वापरू शकता आमचे मोफत
मोटर इन्श्युरन्स कॅल्क्युलेटर, आणि तुमच्या मोटर इन्श्युरन्स पॉलिसीसाठी तुम्हाला भरावयाच्या प्रीमियम रकमेचे अंदाजित मूल्य कॅल्क्युलेट करू शकता. मोटर इन्श्युरन्स पॉलिसीचे प्रीमियम खालील घटकांवर अवलंबून असते:
- तुमच्या वाहनाचे आयडीव्ही (इन्श्युअर्ड डिक्लेर्ड वॅल्यू)
- कपातयोग्य
- एनसीबी (नो क्लेम बोनस), लागू असल्यास
- तुमच्या वाहनाचा दायित्व प्रीमियम, जो दरवर्षी बदलू शकतो
- वाहनाची क्युबिक कॅपॅसिटी (सीसी)
- भौगोलिक क्षेत्र
- ॲड-ऑन कव्हर्स (पर्यायी)
- तुम्ही तुमच्या वाहनात वापरलेल्या ॲक्सेसरीज (पर्यायी)
चला येथे चर्चा करूयात
मोटर इन्श्युरन्स मधील वजावट विषयी. तर, वजावट ही रक्कम असते जी क्लेमच्या वेळी तुमच्या खिशातून भरली जाते. भारतात दोन प्रकारच्या वजावटी आहेत:
- अनिवार्य कपातयोग्य – IRDAI (Insurance Regulatory and Development Authority of India) ने अनिवार्य वजावटीची किमान रक्कम ठरवली आहे, जी तुम्हाला क्लेमच्या वेळी भरायची आहे:
- खासगी कारसाठी (1500 सीसी पर्यंत) - ₹1000
- खासगी कारसाठी (1500 सीसी पेक्षा अधिक) - ₹2000
- टू-व्हीलरसाठी (सीसी विचारात न घेता) - ₹ 100
जर तुमचे वाहन क्लेमची उच्च जोखीम दर्शवत असेल तर तुमची इन्श्युरन्स कंपनी उच्च अनिवार्य वजावट आकारू शकते.
- स्वैच्छिक वजावट - तुम्ही तुमची मोटर इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी/रिन्यू करताना अतिरिक्त सवलत मिळविण्यासाठी प्रत्येक क्लेमच्या वेळी देय करण्याची निवड करता ती ही रक्कम आहे. ही रक्कम अनिवार्य वजावटीपेक्षा अधिक आहे. उदा., जर तुम्ही तुमच्या खासगी कारसाठी ₹7500 चे स्वैच्छिक वजावट निवडले तर तुम्ही तुमच्या प्रीमियम रकमेवर 30% सवलत कमविण्यास पात्र आहात, ज्यात सवलतीची कमाल मर्यादा ₹2000 असेल. त्याचप्रमाणे, तुमच्या टू-व्हीलरसाठी, जर तुम्ही ₹1000 चे स्वैच्छिक वजावट निवडले तर तुम्ही तुमच्या प्रीमियम रकमेवर 20% सवलत मिळवण्यास पात्र आहात, ज्यात सवलतीची कमाल मर्यादा ₹125 असेल.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की उच्च वजावट इन्श्युरन्स प्लॅन निवडावे की कमी वजावट इन्श्युरन्स प्लॅन निवडावे. काळजी नसावी! आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी येथे आहोत. तुम्ही अनिवार्य वजावटी विषयी काहीही करू शकत नसताना, तुम्ही स्वैच्छिक वजावट सुज्ञपणे निवडू शकता. तुम्ही स्वैच्छिक वजावटीची योग्य रक्कम निवडली पाहिजे, जेणेकरून तुम्ही तुमच्या प्रीमियम रकमेवर चांगली सवलत मिळवाल आणि त्याचवेळी मोटर इन्श्युरन्स क्लेम दाखल करताना तुमचा खिशातून होणारा खर्च कमी होईल. आम्ही शिफारस करतो की तुम्ही केवळ प्रीमियमच्या रकमेवर सवलत मिळवण्यासाठीच वजावट निवडू नये, कारण असे होऊ शकते, की तुम्ही तुमचे नुकसानग्रस्त वाहन दुरुस्तीसाठी घेऊन गेले असताना आणि तुमच्या मोटर इन्श्युरन्स पॉलिसीसाठी त्याचा क्लेम करताना तुम्ही विचार केला असेल त्यापेक्षा जास्त खर्च करावा लागू शकतो. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आता तुमच्या मोटर इन्श्युरन्स पॉलिसीमधील वजावटी विषयी सर्वकाही माहित आहे. जर तुम्हाला आणखी शंका असतील तर कृपया खाली कमेंट करा. आम्ही तुमच्या सर्व शंकांची लवकरात लवकर उत्तर देण्याची खात्री करू. आमच्या वेबसाईटला भेट द्या बजाज आलियान्झ
जनरल इन्श्युरन्स मोटर इन्श्युरन्स आणि संबंधित विषयांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी.
process you don’t need to bear the complete cost of repairs but, you will be required to pay the deductibles of your motor insurance policy. The compulsory deductible as well as voluntary deductibles will have to be paid by you for every