डेप्रीसिएशन म्हणजे काय?
डेप्रीसिएशन म्हणजे वाढत्या आयुर्मानाच्या सोबत संपत्तीच्या मूल्यात होणारी घट आहे. डेप्रीसिएशन वर परिणाम करणारा कालावधी हाच घटक नाही. तर वापर देखील तितकाच महत्वाचा ठरतो.. अशा प्रकारे, वापर आणि वेळ एकत्रितपणे डेप्रीसिएशन वर परिणाम करतात. डेप्रीसिएशन संकल्पना सुलभ शब्दांत जाणून घ्यायची म्हणजे, तुमच्या कारच्या खरेदी आणि विक्री किंमत या दोघांमधील फरक होय. दैनंदिन वापराच्या घर्षणामुळे होणाऱ्या डेप्रीसिएशन मुळे केवळ कारच्या विक्री किंमतीवरच नव्हे तर इन्श्युअर्ड डिक्लेर्ड वॅल्यू किंवा आयडीव्ही वर देखील परिणाम होतो.डेप्रीसिएशनचा तुमच्या कार इन्श्युरन्स प्रीमियमवर परिणाम होतो का?
वर चर्चा केल्याप्रमाणे, तुमच्या कारच्या डेप्रीसिएशनचा परिणाम इन्श्युअर्ड डिक्लेर्ड वॅल्यू वर होतो. वाहनाचे आयुर्मान, नियमित वापरामुळे होणारे घर्षण आणि त्याचे उपयोगी जीवन हे डेप्रीसिएशन रेटची निश्चिती करतात. तुमच्या कार इन्श्युरन्सच्या किंमतीवरील डेप्रीसिएशनचा प्रभाव क्लेमसाठी इन्श्युररने भरलेल्या भरपाई द्वारे कमी केला जातो. रिप्लेसमेंटची आवश्यकता असलेले घटक त्यांच्या आयुर्मानाच्या नुसार कमी केले जातात आणि त्यामुळे, कमी भरपाई दिली जाते. *प्रमाणित अटी लागूआयआरडीएआय द्वारे कोणतेही स्टँडर्ड डेप्रीसिएशन रेट निर्दिष्ट केले आहेत का?
होय, इन्श्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटी ऑफ इंडियाने (आयआरडीएआय) स्वतंत्र स्पेअर्ससाठी स्टँडर्ड कार डेप्रीसिएशन टक्केवारी निर्धारित केली आहे. तुम्ही अधिक तपशीलासाठी IRDAI च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. म्हणून, तुम्हाला प्रत्येक स्पेअर साठी स्वतंत्र प्रकारची भरपाई प्राप्त होऊ शकते. खालील काही स्पेअर्स आहेत. ज्यांच्यासाठी डेप्रीसिएशन रेट नमूद केलेले आहेत:- रबर, नायलॉन आणि प्लास्टिक स्पेअर्सचा डेप्रीसिएशन रेट 50% आहे
- वाहनाच्या बॅटरीसाठी डेप्रीसिएशन 50% सेट करण्यात आले आहे
- फायबरग्लास घटकांसाठी डेप्रीसिएशन रेट 30% आहे
कारचे वय | आयडीव्ही निर्धारित करण्यासाठी डेप्रीसिएशन रेट |
6 महिन्यांपेक्षा जास्त नाही | 5% |
6 महिन्यांपेक्षा अधिक परंतु 1 वर्षापेक्षा अधिक नाही | 15% |
1 वर्षापेक्षा अधिक परंतु 2 वर्षांपेक्षा अधिक नाही | 20% |
2 वर्षांपेक्षा अधिक परंतु 3 वर्षांपेक्षा अधिक नाही | 30% |
3 वर्षांपेक्षा अधिक परंतु 4 वर्षांपेक्षा अधिक नाही | 40% |
4 वर्षांपेक्षा अधिक परंतु 5 वर्षांपेक्षा अधिक नाही | 50% |