या दिवसांत प्रवास सोयीस्कर झाला आहे. नवीन वाहनांसाठी उपलब्ध सोप्या फायनान्स पर्यायांसह, तुमची स्वप्नातील कार किंवा बाईक खरेदी करणे सोपे आहे. परंतु तुम्हाला माहित आहे की, गेल्या दशकात वाहनांच्या मागणीमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे प्रतिकूल पर्यावरणीय परिणाम देखील दिसून येत आहेत का? तसेच, ही समस्या प्रकाशझोतात आली आहे आणि त्यानंतर प्रामुख्याने महत्व प्राप्त होण्यास सुरुवात झाली आहे. या वाहनांनी उत्सर्जित केलेल्या प्रदूषण स्तरांवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता सरकारी संस्थांना भासू लागली.. अशा प्रकारे, केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 नुसार देशात रजिस्टर्ड प्रत्येक वाहनाला वैध पोल्यूशन सर्टिफिकेट असणे अनिवार्य केले आहे.. तसेच
मोटर वाहन कायदा, 2019 वाहनाचे चालक किंवा रायडरकडे नेहमी पीयूसी हे आवश्यक डॉक्युमेंट बनवते. असे करण्यात अयशस्वी झाल्यास सहन करावा लागेल कार/
बाईक इन्श्युरन्स दंड
पीयूसी सर्टिफिकेट म्हणजे काय?
पोल्यूशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट किंवा सर्वसाधारणपणे संक्षिप्त स्वरुपात पीयूसी सर्टिफिकेट म्हटले जाते. या डॉक्युमेंट्स मध्ये तुमच्या वाहनाची इमिशन लेव्हल समाविष्ट असते.. देशातील सर्वसाधारणपणे पेट्रोल पंपाच्या ठिकाणी असलेल्या अधिकृत टेस्टिंग सेंटर्सच्या ठिकाणी तपासणी केली जाते.. तुमच्या वाहनाच्या इमिशन लेव्हलची पडताळणी केल्यानंतर आणि ते स्वीकार्य मर्यादेत आहे की नाही हे प्रमाणित केल्यानंतर हे सर्टिफिकेट जारी केले जाते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटर वाहन कायदा 1989 अन्वये प्रत्येक वाहनासाठी पीयूसी सर्टिफिकेट असणे अनिवार्य केले आहे.
पीयूसी सर्टिफिकेट कसे प्राप्त करावे?
तुमच्या कार किंवा बाईकसाठी पीयूसी सर्टिफिकेट मिळवणे हे सोपे आहे -
- डीलरद्वारे नवीन वाहनांसाठी एक वर्षासाठी वैध असलेले पीयूसी सर्टिफिकेट जारी केले जाते. त्यामुळे तुम्हाला त्यासाठी अप्लाय करण्याची गरज नाही.
- रिन्यूवल करण्यासाठी तुम्हाला अधिकृत टेस्टिंग सेंटरमध्ये जावे लागेल. फीची आवश्यक रक्कम भरा आणि सर्टिफिकेट मिळवा. अशाप्रकारचे पीयूसी सर्टिफिकेट कायदेशीररित्या भारतात वाहन चालविण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्सचा भाग बनते.
मला पीयूसी सर्टिफिकेट ऑनलाईन कसे मिळू शकेल?
सध्या, केवळ अधिकृत इमिशन टेस्टिंग सेंटर्स आणि रस्ते वाहतूक कार्यालय द्वारेच ऑनलाईन पोल्यूशन सर्टिफिकेट बनविले जाते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाद्वारे स्थापित परिवहन पोर्टल पीयूसी सेंटरचे रजिस्ट्रेशन किंवा रिन्यूवल, पीयूसी सर्टिफिकेट ऑनलाईन तपासण्याच्या सुविधेसह तुमच्या पीयूसी सेंटर्सचे ॲप्लिकेशन स्टेशन तपासण्याची सुविधा प्रदान करते.
मी माझे पीयूसी सर्टिफिकेट ऑनलाईन डाउनलोड करू शकतो/शकते का?
होय, तुम्ही तुमचे पीयूसी सर्टिफिकेट ऑनलाईन डाउनलोड करू शकता. डाउनलोड प्रोसेस साठी केवळ तीन सोप्या स्टेप्स आहेत-
#1 परिवहन वेब पोर्टलवर जा. येथे तुम्हाला तुमच्या चेसिस नंबरच्या शेवटच्या पाच अंकांसह तुमच्या वाहनाचा रजिस्ट्रेशन तपशील प्रदान करणे आवश्यक आहे.
#2 सिक्युरिटी कॅप्चा एन्टर करा आणि 'पीयूसी तपशील' बटनावर क्लिक करा.
#3 जर तुमच्याकडे ॲक्टिव्ह पीयूसी सर्टिफिकेट असेल, तर तुम्हाला तुमच्या एमिशन टेस्टचे तपशील असलेल्या नवीन पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल.. तुम्ही 'प्रिंट' बटनावर क्लिक करून त्यास डाउनलोड करू शकता.
नवीन वाहनांना पीयूसी सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे का?
नवीन वाहनांच्या मालकाला पीयूसी सर्टिफिकेट प्राप्त करण्याची कोणतीही विशेष आवश्यकता नाही. या वाहनांची उत्पादनाच्या वेळी चाचणी केली जाते आणि पहिल्या वर्षी पीयूसी तपासणीतून सूट देण्यात आली आहे.. डीलर सामान्यपणे नवीन वाहन खरेदीच्या वेळी घेतलेल्या पोल्यूशन टेस्टचे परिणाम प्रदान करतात.
माझ्या पीयूसी सर्टिफिकेटची वैधता म्हणजे आहे?
विविध इमिशन लेव्हल तुमच्या वाहनाच्या आयुर्मानावर अवलंबून असते. त्यामुळे, वेळेवर तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो आणि तुमचे वाहन पर्यावरणाला अधिक हानी पोहचवत नाही याची खात्री करा. तुमच्या पीयूसी सर्टिफिकेटची वैधता नवीन वाहन किंवा जुने वाहन यावर अवलंबून असते. नवीन वाहनासाठी अप्लाय करण्याची आवश्यकता नाही. वाहनाच्या डिलिव्हरीवेळी डीलरद्वारे प्रदान केले जाईल.. हे सर्टिफिकेट एक वर्षासाठी वैध आहे. या कालावधी समाप्त झाल्यानंतर, तुम्हाला तुमचे पीयूसी सर्टिफिकेट रिन्यू करावे लागेल. हे रिन्यू केलेले पीयूसी सर्टिफिकेट सहा महिन्यांसाठी वैध आहे आणि वेळेवर रिन्यू करायला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, पर्यावरणाचे स्वारस्य म्हणून आणि कायद्याचे पालन करण्यासाठी तुमचे पोल्यूशन सर्टिफिकेट मिळवा.. पीयूसी सर्टिफिकेट न बाळगल्यास तुम्हाला दंडाचा भुर्दंड सहन करावा लागू शकतो. तुम्ही एकतर तुमचे पीयूसी सर्टिफिकेट ऑनलाईन डाउनलोड करू शकता किंवा एम-परिवहन सारख्या ॲप्सचा वापर करू शकता जे या डॉक्युमेंट्सना इलेक्ट्रॉनिक फॉरमॅटमध्ये स्टोअर करण्यास मदत करू शकतात. माहिती मिळवा
कार इन्श्युरन्स आणि
बाईक इन्श्युरन्स प्लॅन्स विषयी. जे बजाज आलियान्झ द्वारे ऑफर केले जातात व तुमचे वाहन ऑनलाईन इन्श्युअर्ड करा!
प्रत्युत्तर द्या