ENG

Claim Assistance
Get In Touch
Central KYC & Bike Insurance: Guide
मार्च 31, 2021

मोटरसायकल खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला काय माहिती असावे?

नवीन बाईकची खरेदी करणे हा नेहमीच रोमांचक अनुभव असतो. विशेषत: मुलांसाठी. किशोरवयीन असतानाच प्रत्येक मुलाने त्याची पहिली बाईक घेण्याचे आणि संपूर्ण शहरात राईड करण्याचे स्वप्न पाहिलेले असते. सर्वसाधारणपणे काळ सरत जाते तशी बालपणीची स्वप्ने मागे पडतात. परंतु मुलं व त्यांच्या बाईकच्या स्वप्नांबाबत असे घडत नाही. विशेष म्हणजे मोठे झाल्यानंतरही बाईक खरेदी करण्याचा उत्साह एखाद्या लहान मुलाप्रमाणे कायम असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही बाईक खरेदी करण्याचे तुमचे लहानपणीचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असेल, तेव्हा तुमच्या बजेटमध्ये येणारी बाईक खरेदी करण्याची व्यावहारिकता विचारात घेणे आवश्यक आहे आणि इतर आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे. आता जेव्हा तुम्ही या पेजवर पोहोचला आहात. तुम्ही स्वत:ला विचारले पाहिजे की मोटरसायकल खरेदी करण्यापूर्वी मला काय माहिती असावी? हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या ब्लॉगसह, आम्ही तुम्हाला मोटरसायकल खरेदी करण्यापूर्वी काय जाणून घ्यावे याविषयी सर्व आवश्यक माहिती समजून घेण्यास मदत करू. चला सुरू करूयात.

बाईक खरेदीपूर्वी विचारात घ्यावयाचे घटक

बाईक खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला स्वत:ला मूलभूत प्रश्न विचारायला हवा. तुम्हाला बाईकवर कोणत्या प्रकारची राईड अपेक्षित आहे. विविध मोटरसायकलची रचना विशिष्ट प्रकारची रायडिंग करण्यासाठी केली गेली आहे. तीन बेसिक कॅटेगरी किंवा बाईकच्या स्टाईल्स पुढीलप्रमाणे:  
  1. स्ट्रीट बाईक
या भारतातील सर्वसाधारण आणि प्रचलित प्रकारच्या बाईक आहेत. सामान्यपणे एक मर्यादित बॉडी डिझाईन ऑफर करतात आणि सर्वोत्तम इंधन कार्यक्षमता देण्यासाठी सुसज्ज असतात. विभिन्न प्रकारच्या ट्रॅफिक स्थितीत चालविण्यास आणि बाईकवर नियमित प्रवास करणाऱ्यांद्वारे प्राधान्याने त्याचा वापर केला जातो.  
  1. स्पोर्ट्स बाईक
तरुणांमध्ये या सेगमेंटच्या बाईकसाठी मोठी मागणी असल्याचे दिसून येते. स्पोर्ट्स बाईकचे डिझाईन क्रिएटिव्ह स्वरुपाचे असते आणि अधिक स्पीड प्राप्त करणे शक्य ठरते. या बाईकला अधिकांशतः कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी आणि हाय-स्पीड रायडर्स यांची पसंती मिळते. तथापि, कम्फर्ट आणि स्टोरेज स्पेसचा अभाव यामध्ये दिसतो.  
  1. क्रूजर बाईक
क्रूझर बाईकची एर्गोनॉमिक डिझाईन आहे आणि अत्यंत आरामदायी असते. त्यांची पॉवर अधिक असते आणि शहराभोवती विकेंड वर जाण्यासाठी परिपूर्ण असतात. या बाईक आरामदायी असतात आणि जर तुम्हाला स्टाईल सोबत कम्फर्ट हवे असेल तर तुमच्यासाठी हा अचूक पर्याय आहे.  

मोटरसायकल खरेदी करण्यापूर्वी विचारात घेण्याच्या 5 गोष्टी

नवीन बाईकची खरेदी तुम्हाला गोंधळात टाकू शकते. म्हणून, दिलेल्या मुद्द्यांच्या माध्यमातून तुम्हाला मोटरसायकल खरेदी करण्यापूर्वी नेमकं काय जाणून घ्यावे याचे उत्तर मिळेल?

1. तुमची इंजिन साईझ जाणून घ्या

नवीन बाईक खरेदी करताना इंजिन पॉवर ही एक आवश्यक गोष्ट आहे जी तुम्ही लक्षात ठेवणे आवश्यक आहे. इंजिनची साईझ क्यूबिक सेंटीमीटर (सीसी) मध्ये मोजली जातो आणि मोटरसायकलची पॉवर दर्शविते. खालील गोष्टींची नोंद घ्या:  
  • जितकी अधिक पॉवर त्याप्रमाणात तुमची बाईक अधिक महाग असते.
  • नियमित प्रवासासाठी 125cc -250cc ची इंजिन साईझ असलेल्या बाईकचा विचार करा.
 

2. बाईकची उंची आणि वजन विचारात घ्या

बाईक खरेदी करताना बहुतांश लोक बाईकची उंची आणि वजन याचा विचार करत नाहीत ही आढळणारी सर्वसाधारण चूक आहे. चांगले नियंत्रण आणि सुरक्षेसाठी, तुमच्या पायाचा सहजपणे जमिनीला स्पर्श होणे आवश्यक आहे. तसेच, बाईकचे वजन अधिक असू नये कारण त्यामुळे कमी स्पीड स्थितीत बाईकचे असंतुलन होऊ शकते. त्यामुळे, बाईकच्या सुरळीत रायडिंग साठी तुमची उंची आणि स्नायू शक्तीशी जुळणारी बाईक तुम्ही खरेदी करीत आहात याची खात्री करा.

3. बाईकची इंधन कार्यक्षमता

नवीन बाईक खरेदी करताना इंधन कार्यक्षमता हा विचारात घेण्याचा आणखी महत्त्वाचा पैलू आहे. तुम्हाला अशी बाईक खरेदी करायची नाही जी इंधन कार्यक्षमता आहे आणि त्यामुळे तुमचा सर्वाधिक खर्च बाईकचा टँक भरण्यासाठी करावा लागेल.. अधिक इंजिन पॉवर असलेली बाईक सामान्यपणे बाईकच्या इंजिनला कार्यक्षमतेने चालविण्यासाठी अधिक इंधन वापरतात. उंच पर्वतीय क्षेत्रांमध्ये राईड करण्यासाठी तुम्ही तुमची बाईक वापरत नसल्यास अधिक इंधन कार्यक्षमता प्रदान करू शकणारी मध्यम पॉवर असलेली बाईक खरेदी करण्याची शिफारस केली जाते.

4. तुमच्या बाईकसाठी इन्श्युरन्स खरेदी

बाईकची किंमत ही बाईक खरेदी करताना तुम्हाला खर्च करावयाची एकमेव रक्कम नाही. तुम्हाला खरेदी करावा लागेल बाईक इन्श्युरन्स वाहतूक कायद्यांचे पालन करण्यासाठी. याशिवाय, इन्श्युरन्स मिळवणे हा एक उत्तम लाभ आहे कारण ते तुमच्या बाईकचे कोणत्याही प्रकारच्या फायनान्शियल नुकसानीपासून संरक्षण करते. बाईक इन्श्युरन्स तुम्हाला कव्हर करण्यास मदत करू शकतो:  
  • बाईकचे कोणतेही नुकसान.
  • बाईकची चोरी.
  • अपघाताच्या बाबतीत थर्ड-पार्टी वाहनाला झालेले कोणतेही नुकसान.
  वाजवी किंमतीत टू-व्हीलर इन्श्युरन्स बजाज इन्श्युरन्स कडून ऑनलाईन खरेदी करू शकाल.

5. संपादन आणि मेंटेनन्स खर्च

बाईकच्या वास्तविक संपादन खर्चाव्यतिरिक्त मेंटेनन्स खर्चाचा विचार करण्याची देखील आवश्यकता आहे. प्रत्येक वाहनाची त्याच्या सुरळीत ऑपरेशनसाठी काही नियमित मेंटेनन्सची आवश्यकता असते. सामान्यपणे, तुम्ही निवडलेल्या बाईक नुसार बाईकचा सरासरी सर्व्हिस खर्च ₹ 1000 - 3000 पर्यंत आहे.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

  1. टू-व्हीलर इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी करण्यासाठी किती पैसे खर्च होतात?
हे बाईक इन्श्युरन्स किंमत नवीन बाईकसाठी बाईकचे रजिस्टर्ड शहर, बाईकची किंमत, थर्ड-पार्टी इन्श्युरन्स किंवा सर्वसमावेशक इन्श्युरन्स खरेदी इ. सारख्या विविध घटकांवर अवलंबून असते.  
  1. नवीन बाईक खरेदी करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत?
तुम्हाला भारतात नवीन बाईक खरेदी करण्यासाठी ओळखीचा पुरावा, ॲड्रेस पुरावा आणि दोन पासपोर्ट साईझ फोटोची आवश्यकता असेल.

निष्कर्ष

आता जेव्हा तुमच्याकडे तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, मोटरसायकल खरेदी करण्यापूर्वी मला काय माहिती असावे? वर दिलेल्या सर्व घटकांचा विचार करून तुम्ही नवीन बाईक खरेदी करण्यासाठी तुमचा रिसर्च सुरू करू शकता. लक्षात ठेवा, केवळ बाईकच्या डिझाईनद्वारे जाऊ नका आणि तुमच्या साईझसाठी बाईक योग्य आहे आणि तुमची सर्व मूलभूत आवश्यकता पूर्ण करीत आहे याची खात्री करा.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत