थर्ड पार्टी इन्श्युरन्स प्लॅन ही अनिवार्य पॉलिसी आहे जी तुम्हाला कायदेशीररित्या वाहन चालवण्यासाठी आवश्यक आहे. दुर्दैवी अपघाताच्या घटनेमध्ये, थर्ड पार्टी प्रॉपर्टीला झालेले कोणतेही नुकसान, शारीरिक दुखापती किंवा पीडित व्यक्तीचा मृत्यू या पॉलिसीअंतर्गत कव्हर केले जाते. तुमचा इन्श्युरर थर्ड पार्टीला भरपाई देईल आणि तुम्हाला त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागणार नाही. परंतु प्रत्येक वाहनाला सारखीच थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स किंमत मिळते का? तर, चला हा प्रश्न पाहूया आणि प्लॅनच्या काही अधिक तपशिलासह
टू-व्हीलर इन्श्युरन्स थर्ड पार्टी किंमत कशी निर्धारित केली जाते हे समजून घेऊया.
थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स अंतर्गत काय कव्हर केले जाते?
इन्श्युरन्स प्रोव्हायडरद्वारे कव्हर केले जात असलेले काही प्रमुख पैलू येथे आहेत:
थर्ड पार्टीच्या शारीरिक दुखापती किंवा मृत्यू
अनपेक्षित अपघातामुळे, थर्ड पार्टीला शारीरिक दुखापती होऊ शकतात किंवा मृत्यूही होऊ शकतो. या बाबतीत, तुम्हाला पीडित व्यक्तीच्या वैद्यकीय उपचारांसाठी पैसे भरावे लागतील किंवा मृत्यूसाठी भरपाई ऑफर करावी लागेल. परंतु थर्ड पार्टी प्लॅनसह, तुमचा इन्श्युरन्स प्रोव्हायडर आर्थिक दायित्वाची काळजी घेतो आणि त्यामुळे, तुम्हाला स्वत:च्या खिशातून पैसे भरावे लागत नाही.
थर्ड पार्टीच्या प्रॉपर्टीचे नुकसान
जर तुमचे वाहन थर्ड पार्टीच्या प्रॉपर्टी जसे त्यांच्या वाहनावर धडकते आणि नुकसान किंवा हानी पोहचवते, तर थर्ड पार्टी इन्श्युरन्स तुम्हाला सुरक्षित करते. इन्श्युरर नुकसानीचा खर्च कव्हर करेल आणि पीडित व्यक्तीला योग्य भरपाई मिळेल. अशा नुकसानीला कव्हर करण्यासाठी ₹7.5 लाखांची मर्यादा सेट केली आहे.
पॉलिसीधारकाचा मृत्यू (रायडर)
थर्ड पार्टी इन्श्युरन्समध्ये पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर अंतर्गत अपघाती मृत्यू देखील कव्हर केले जाते, जे सर्व रायडर्ससाठी अनिवार्य आहे. त्यामुळे, जर दुर्दैवी दुर्घटनेमुळे रायडरचा मृत्यू झाला, तर नॉमिनीला नुकसान भरपाई दिली जाईल. कव्हरेजची रक्कम किमान ₹15 लाख असावी.
पॉलिसीधारकाचे अपंगत्व (रायडर)
जर अपघातामुळे रायडरला कायमस्वरुपीचे अपंगत्व आले तर इन्श्युरन्स प्रोव्हायडर तुमच्या पाठीशी असेल. पॉलिसी पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर अंतर्गत अटी व शर्तींनुसार भरपाई देईल.
अनिवार्य लाँग टर्म थर्ड पार्टी इन्श्युरन्स प्लॅन
Insurance Regulatory and Development Authority of India (IRDAI) नुसार, 1 सप्टेंबर 2018 नंतर खरेदी केलेली नवीन बाईक तसेच कार यांच्यासाठी लॉंग टर्म थर्ड पार्टी कव्हर खरेदी करणे आवश्यक आहे. किमान पाच वर्षाची थर्ड पार्टी इन्श्युरन्स पॉलिसी असणे आता अनिवार्य आहे. त्यामुळे, तुम्हाला पाच वर्षाच्या कव्हरसाठी प्रीमियम रक्कम अगोदर भरावी लागेल आणि तेच सर्वसमावेशक पॉलिसींसाठी
टू-व्हीलर इन्श्युरन्स किंमती याचा घटक देखील असेल. परंतु जर तुमच्याकडे सर्वसमावेशक इन्श्युरन्स असेल तर हे केवळ थर्ड पार्टी घटकावर लागू होते आणि ओन डॅमेज (ओडी) वर नाही. हा नियम जुन्या पॉलिसीधारकांना प्रभावित करत नाही ज्यांना त्यांचा इन्श्युरन्स प्लॅन रिन्यू करायचा आहे आणि केवळ नवीन वाहन मालकांनाच लागू होतो.
टू-व्हीलर इन्श्युरन्स थर्ड पार्टी किंमती कशा कॅल्क्युलेट केल्या जातात?
टू-व्हीलरच्या इंजिन क्षमतेवर आधारित बाईक इन्श्युरन्स 3rd पार्टी किंमत निर्धारित केली जाते. तर, तुम्हाला माहित असाव्या अशा टू-व्हीलर थर्ड पार्टी इन्श्युरन्स किंमतीची यादी येथे दिली आहे:
|
थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स किंमती |
इंजिन क्षमता |
2018-19 |
2019-20 |
75सीसी पेक्षा कमी क्षमता |
₹ 427 |
₹ 482 |
75सीसी ते 150सीसी दरम्यान |
₹ 720 |
₹ 752 |
150सीसी ते 350सीसी दरम्यान |
₹ 985 |
₹ 1193 |
350cc पेक्षा अधिक |
₹ 2323 |
₹ 2323 |
2019-2020 साठी थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स किंमत IRDAI द्वारे अधिसूचित केल्याप्रमाणे 31 मार्च 2020 च्या पुढे वाढविण्यात आली आहे. ती आर्थिक वर्ष 2020-21 साठी वाढवली जाणार नाही, जे आर्थिक वर्ष 2020-21 आहे. आता तुम्हाला माहित आहे की बाईकच्या किंमतीसाठी 3rd पार्टी इन्श्युरन्स कसा सेट केला जातो आणि सध्याचा रेट काय आहे, तर तुम्ही तुमचे वाहन सुरक्षित करण्यासाठी योग्य इन्श्युरन्स प्लॅन मिळवू शकता. बजाज आलियान्झसह, तुम्ही आता तुमच्या घरातून आरामात काँटॅक्टलेस इन्श्युरन्सच्या मदतीने पॉलिसी प्राप्त करू शकता. परंतु तुमच्या वाहनासाठी प्रीमियम खर्चाचा अंदाज मिळवण्यासाठी, तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय
टू-व्हीलर इन्श्युरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर वापरू शकता. यामुळे पॉलिसीची सहज तुलना करण्यात मदत होईल आणि तुम्हाला परवडणारी प्रीमियम किंमत मिळवण्यास मदत होईल!
प्रत्युत्तर द्या