Loader
Loader

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

मॅटर्निटी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी

मॅटर्निटी इन्श्युरन्स म्हणजे काय?

मॅटर्निटी इन्श्युरन्स, ज्याला प्रेग्नन्सी हेल्थ इन्श्युरन्स म्हणूनही ओळखले जाते, हे प्रसूती आणि गर्भधारणेशी संबंधित वैद्यकीय खर्च कव्हर करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. यामध्ये प्रसूतीपूर्व काळजीचा खर्च, डिलिव्हरी दरम्यान हॉस्पिटलायझेशन आणि प्रसूतीनंतरच्या काळजीचा समावेश होतो.

या प्रकारचा इन्श्युरन्स अपेक्षित आईंना आर्थिक बोजाशिवाय आवश्यक वैद्यकीय मदत मिळण्याची खात्री देतो, ज्यामध्ये डॉक्टरांचा सल्ला, निदान चाचण्या, औषधे आणि कधीकधी प्रसूतीशी संबंधित गुंतागुंत यासारख्या खर्चांचा समावेश होतो.

हा प्रेग्नन्सी हेल्थ इन्श्युरन्स कव्हरेज मर्यादा, प्रतीक्षा कालावधी आणि ऑफर केलेल्या विशिष्ट लाभांमध्ये बदलू शकतो, त्यामुळे तुमच्या गरजांसाठी अनुकूल असलेली पॉलिसींची तुलना करणे आवश्यक आहे. मॅटर्निटी इन्श्युरन्स मनःशांती प्रदान करते, ज्यामुळे तुम्हाला हेल्थकेअर खर्चाची चिंता न करता आनंदी गर्भधारणा अनुभवावर लक्ष केंद्रित करता येते.

हेल्थ इन्श्युरन्समध्ये मॅटर्निटी कव्हरचे लाभ काय आहेत?

मॅटर्निटी कव्हर हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्समध्ये प्रसूती आणि आई आणि तिच्या नवजात बाळाच्या आरोग्यसेवेचा खर्च सहन करण्यासाठी डिझाईन केलेली तरतूद आहे.

वाढत्या महागाईमुळे प्रत्येक दिवशी मॅटर्नल केअरचा वैद्यकीय खर्च वाढत आहे. याचवेळी हेल्थ इन्श्युरन्स मॅटर्निटी लाभांसह मुख्य भूमिका बजावते.

1) प्रसूतीपूर्व आणि नंतरचे कव्हर:

गर्भवती मातेची सातत्यपूर्ण काळजी घेणे आवश्यक असते. तिची प्रसूती होण्यापूर्वीच, बरेच हेल्थ चेक-अप आणि औषधांची आवश्यकता असते. याव्यतिरिक्त, या तपासण्या आणि औषधे बाळ झाल्यानंतर लगेच थांबत नाहीत. मॅटर्निटी कव्हर आई आणि बाळासाठी नियत तारखेच्या 30 दिवस आधी आणि डिलिव्हरीनंतर 30-60 दिवस (तुमच्या हेल्थ प्लॅन नुसार) सर्व वैद्यकीय खर्चांची काळजी घेते.

2) डिलिव्हरी कव्हर:

अनुभवी प्रोफेशनलच्या मदतीने निरोगी बाळाच्या प्रसूतीसाठी थोडासा जास्त पैसा लागतो. मॅटर्निटी कव्हर ही रक्कम विशिष्ट सब-लिमिटसह प्रदान करेल, जी डिलिव्हरीच्या पद्धतीनुसार बदलते; सामान्य किंवा सिझेरियन.

3) नवजात बालकाचे कव्हर:

जन्मजात आजार आणि इतर जटिलतेसाठी नवजात बाळाला विशेष काळजी घेणे आवश्यक असल्यास, काही हेल्थ प्लॅन्स जन्मापासून 90 दिवसांपर्यंतचा खर्च कव्हर करतात.

4) लसीकरण संरक्षण:

तुमच्या हेल्थ प्लॅनवर अवलंबून, तुमचा मॅटर्निटी लाभ बाळासाठी अनिवार्य लसीकरणही कव्हर करू शकतो. सामान्यपणे 1st वर्षासाठी लसीकरणाचा खर्च, पोलिओसाठी लसीकरण, टिटॅनस, डिप्थीरिया, डांग्या खोकला, गोवर आणि हिपॅटायटीस हे मॅटर्निटी कव्हर अंतर्गत कव्हर केले जातात.

बाळंतपणाशी संबंधित अनेक ओव्हरहेड्सचा खर्च, प्रसूतीपूर्व आणि नंतरची निगा आणि नवजात बालकाच्या वैद्यकीय खर्चाशी संबंधित अनेक खर्च मॅटर्निटी कव्हरमध्ये कव्हर केला जातो. तुमच्या हेल्थ प्लॅनमध्ये मॅटर्निटी कव्हर असल्याने तुमचे मन आनंदी राहते आणि तुम्हाला मातृत्वाचा पूर्णपणे आनंद घेण्यास मदत होते.

अधिक जाणून घ्या हेल्थ इन्श्युरन्स वैशिष्ट्य

तुमचे तपशील शेअर करा

+91
निवडा
कृपया प्रॉडक्ट निवडा
निवडा
कृपया निवडा

तुम्हाला मॅटर्निटी इन्श्युरन्सची आवश्यकता का आहे?

गर्भवती महिलांसाठी हेल्थ इन्श्युरन्स महत्त्वाचा आहे कारण ते गर्भधारणा आणि प्रसूतीशी संबंधित उच्च खर्चासाठी फायनान्शियल कव्हरेज प्रदान करते. त्याशिवाय, प्रसूतीपूर्व काळजी, हॉस्पिटल डिलिव्हरी आणि प्रसूतीनंतरच्या काळजीसाठी वैद्यकीय खर्च मोठ्या प्रमाणात असू शकतात, विशेषत: जटिलता उद्भवल्यास.

मॅटर्निटी इन्श्युरन्स सुनिश्चित करते की अपेक्षित पालक आर्थिक परिणामांची चिंता न करता आई आणि बाळाच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करू शकतात. हे डॉक्टरांच्या भेटी, निदान चाचण्या, हॉस्पिटलमध्ये राहणे आणि प्रसूती दरम्यान आवश्यक असू शकणाऱ्या आपत्कालीन प्रक्रिया यासारख्या खर्चाला कव्हर करून सुरक्षा प्रदान करते.

योग्य मॅटर्निटी इन्श्युरन्समध्ये इन्व्हेस्ट करून, कुटुंब त्यांच्या फायनान्सचे संरक्षण करतात आणि त्यांच्या आयुष्याच्या या महत्त्वाच्या आणि कधीकधी अप्रत्याशित कालावधीदरम्यान गुणवत्तापूर्ण हेल्थकेअर सर्व्हिसेस ॲक्सेस करू शकतात याची खात्री करतात.

तुमच्या प्रेग्नन्सी साठी बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी का निवडावी?

प्रेग्नन्सी दरम्यान बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीची निवड केल्यामुळे तुम्हाला एकाधिक लाभ मिळतात. जे अन्य पॉलिसींच्या तुलनेत निश्चितच लाभदायक ठरतात. गर्भवती महिलांसाठी हेल्थ इन्श्युरन्समधील यथायोग्य ट्रॅक रेकॉर्डसह बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी मॅटर्निटी इन्श्युरन्स पॉलिसीद्वारे सर्वसमावेशक कव्हरेज सुनिश्चित करते. प्रसूतीपूर्व काळजीपासून ते हॉस्पिटलायझेशन पर्यंत आणि नवजात बालक काळजी ते लसीकरणापर्यंत बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीचा मॅटर्निटी इन्श्युरन्स विविध प्रकारचा खर्च कव्हर करतो. याव्यतिरिक्त, पॉलिसी स्पर्धात्मक प्रतीक्षा कालावधी आणि विविध गरजांसाठी तयार केलेले लवचिक प्लॅन्स ऑफर करते, ज्यामुळे मॅटर्निटी पर्यायांसाठी सर्वोत्तम हेल्थ इन्श्युरन्स उपलब्ध आहे. मातृत्व खर्चाचा आर्थिक भार कमी करणे हे पॉलिसीचे प्रधान उद्दिष्ट आहे. ज्यामुळे गर्भवती माता आणि कुटुंबांना आवश्यक वैद्यकीय सहाय्याच्या बाबत तडजोड न करता दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होत असल्याची निश्चितपणे खात्री मिळते.

मॅटर्निटी इन्श्युरन्स पॉलिसीची वैशिष्ट्ये

मॅटर्निटी इन्श्युरन्स पॉलिसीची प्रमुख वैशिष्ट्ये समजून घेणे आवश्यक आहे जेणेकरून ते सुरळीत आणि सुरक्षित गर्भधारणेच्या प्रवासाला कसे सपोर्ट करू शकते हे पाहणे आवश्यक आहे.

फीचर

वर्णन

प्रसूतीपूर्व आणि नंतरची काळजी

डिलिव्हरीच्या 30 दिवस आधीपासून ते डिलिव्हरीनंतर 30 - 60 दिवसांपर्यंत आई आणि मुलासाठी वैद्यकीय तपासणी, सल्ला आणि औषधे कव्हर करतात, ज्यामुळे सतत वैद्यकीय लक्ष सुनिश्चित होते.

डिलिव्हरी खर्च

प्रसूती खर्चाचा आर्थिक भार हलका करण्यासाठी नॉर्मल आणि सिझेरियन डिलिव्हरीचा दोन्ही प्रकारच्या हॉस्पिटलायझेशन खर्चाला कव्हर केले जाते. सब-लिमिट मध्ये प्लॅन निहाय बदल होतो.

नवजात बालकाची निगा

नवजात बाळाच्या काळजीसाठी विस्तारित कव्हरेजचा समावेश होतो. ज्यामध्ये जन्मजात आजार आणि गुंतागुंतींसाठी असलेल्या उपचारांचा समावेश होतो, सर्वसमावेशक हेल्थ सपोर्टसाठी डिलिव्हरी नंतर 90 दिवसांपर्यंत.

या वैशिष्ट्यांमुळे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीला गर्भधारणेसाठी हेल्थ इन्श्युरन्स शोधणाऱ्या पालकांसाठी विश्वसनीय निवड बनते.

मॅटर्निटी इन्श्युरन्समधील समावेश

1. प्रसूतीपूर्व निगा:

मॅटर्निटी इन्श्युरन्समध्ये गर्भधारणेदरम्यान डॉक्टरांचा सल्ला, नियमित तपासणी आणि प्रसूतीपूर्व चाचण्या संबंधित खर्च कव्हर केले जातात.

2. हॉस्पिटलायझेशन खर्च:

यामध्ये सामान्य किंवा सिझेरियन असो, रुम शुल्क, नर्सिंग शुल्क आणि ऑपरेशन थिएटर शुल्कासह डिलिव्हरीचा खर्च समाविष्ट आहे.

3. प्रसूती नंतरची काळजी:

डिलिव्हरी नंतरच्या काळजीसाठी कव्हरेजचा विस्तार, ज्यामध्ये औषधे, निदान चाचण्या आणि फॉलो-अप कन्सल्टेशन्स यांचा समावेश होतो.

4. नवजात बाळाचे कव्हरेज:

तुमच्या हेल्थ प्लॅननुसार, मॅटर्निटी लाभांमध्ये तुमच्या बाळासाठी अनिवार्य लसीकरणासाठी कव्हरेज समाविष्ट असू शकते. यामध्ये अनेकदा राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकानुसार पहिल्या वर्षासाठी लसीकरणाचा खर्च कव्हर केला जातो

मॅटर्निटी इन्श्युरन्समधील अपवाद

  • प्लॅनमध्ये नमूद केलेले टॉनिक आणि व्हिटॅमिन वरील खर्च.
  • नियमित तपासणीसाठी डॉक्टरांच्या भेटी.
  • गर्भधारणेदरम्यान डॉक्टरांसह निदान चाचण्या आणि कन्सल्टेशन्स (9 महिने).
  • वंध्यत्व उपचारांशी संबंधित खर्च

मॅटर्निटी हेल्थ इन्श्युरन्स कधी खरेदी करावा?

तुम्ही खालील कालावधीदरम्यान मॅटर्निटी इन्श्युरन्स खरेदी करण्याचा विचार करावा:

1. कौटुंबिक नियोजनादरम्यान लवकर नियोजन: :

गर्भधारणा करण्याची योजना करण्यापूर्वी मॅटर्निटी हेल्थ इन्श्युरन्स खरेदी करा. हे आवश्यकतेवेळी कव्हरेज सुरू होण्याची खात्री देते.

2. गर्भधारणा नियोजनाच्या दरम्यान:

जर यापूर्वीच गर्भवती असेल तर गर्भधारणेशी संबंधित खर्च कव्हर करण्यासाठी मॅटर्निटी इन्श्युरन्स लवकर खरेदी करा.

3. प्रतीक्षा कालावधीचा विचार:

मॅटर्निटी पॉलिसीमध्ये प्रतीक्षा कालावधी असतो. प्रतीक्षा कालावधीपेक्षा लवकर खरेदी करा आणि विलंबाशिवाय लाभ वापरा.

4. अनपेक्षित घटनांसाठी कव्हरेज:

अनपेक्षित गुंतागुंत किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी गर्भधारणेपूर्वी खरेदी करा.

प्रेग्नन्सी हेल्थ इन्श्युरन्ससाठी अप्लाय करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स

गर्भधारणेला कव्हर करणाऱ्या हेल्थ इन्श्युरन्ससाठी अप्लाय करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स येथे आहेत:

  • पूर्ण भरलेला क्लेम फॉर्म
  • इन्श्युरन्स पॉलिसी डॉक्युमेंट
  • ॲडमिशन सल्ला नोंद
  • डिस्चार्ज सारांश
  • मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट
  • KYC दस्तऐवज
  • कन्सल्टेशन बिल
  • मूळ हॉस्पिटल बिल
  • फार्मसी रीसिट

मॅटर्निटी हेल्थ इन्श्युरन्स ऑनलाईन कसा खरेदी करावा?

मॅटर्निटीसाठी तुम्ही सर्वोत्तम हेल्थ इन्श्युरन्स कसा खरेदी करू शकता हे येथे दिले आहे:

  • विविध इन्श्युररकडून ऑनलाईन मॅटर्निटी इन्श्युरन्स प्लॅन्सचे संशोधन आणि तुलना करा.
  • जलद क्लेम प्रोसेसिंगसाठी बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी निवडा.
  • प्रसूतीपूर्व, हॉस्पिटलायझेशन, प्रसूती नंतरची काळजी आणि नवजात बाळाच्या खर्चासह कव्हरेज तपशील तपासा.
  • कव्हरेज आणि वैयक्तिक माहितीवर आधारित प्रीमियमचा अंदाज घेण्यासाठी ऑनलाईन कॅल्क्युलेटर वापरा.
  • ॲप्लिकेशन फॉर्म अचूकपणे पूर्ण करा आणि आवश्यक डॉक्युमेंट्स ऑनलाईन अपलोड करा.
  • प्रतीक्षा कालावधी आणि अपवादांसह पॉलिसीच्या अटी काळजीपूर्वक रिव्ह्यू करा.
  • सुरक्षित ऑनलाईन पेमेंट करा आणि खरेदीनंतर पॉलिसी डिजिटलपणे प्राप्त करा.

गर्भधारणेसाठी हेल्थ इन्श्युरन्सचा क्लेम कसा करावा

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीसह गर्भधारणेसाठी हेल्थ इन्श्युरन्सचा क्लेम करणे सोपे होण्यासाठी डिझाईन केलेले आहे:

  • इन्श्युररला सूचित करा : नियोजित डिलिव्हरी साठी ॲडमिशन पूर्वी किमान 48 तासांच्या आत किंवा आपत्कालीन परिस्थितीत 24 तासांच्या आत डिलिव्हरीसाठीच्या हॉस्पिटलायझेशन विषयी बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीला सूचित करा.
  • डॉक्युमेंटेशन सबमिट करा : डिलिव्हरी नंतर, हॉस्पिटल डिस्चार्ज सारांश, वैद्यकीय बिल आणि निदान अहवाल यासारखे आवश्यक डॉक्युमेंट्स सबमिट करा.
  • क्लेम सेटलमेंट : एकदा डॉक्युमेंट्स सबमिट केल्यानंतर आणि व्हेरिफाय केल्यानंतर, मॅटर्निटी इन्श्युरन्स पॉलिसीच्या अटींनुसार खर्च कव्हर करणाऱ्या निर्धारित कालावधीमध्ये क्लेमवर प्रक्रिया केली जाते.

क्लेम प्रोसेसची सुलभता ही एक कारणे आहे जी बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी मॅटर्निटीसाठी सर्वोत्तम हेल्थ इन्श्युरन्स मानली जाते.

Frequently Asked Questions

एफएक्यू

मी गर्भवती असताना मला मॅटर्निटी इन्श्युरन्स मिळू शकेल का?

होय, परंतु प्रतीक्षा कालावधीनंतर कव्हरेज सुरू होते. संपूर्ण कव्हरेजसाठी गर्भधारणेपूर्वी मॅटर्निटी इन्श्युरन्स खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो.

प्रतीक्षा कालावधी शिवाय कोणताही मॅटर्निटी इन्श्युरन्स आहे का?

नाही, बहुतांश मॅटर्निटी इन्श्युरन्स प्लॅन्सचा प्रतीक्षा कालावधी 9 महिन्यांपासून ते 4 वर्षांपर्यंत असतो.

मॅटर्निटी इन्श्युरन्स प्लॅन्स अंतर्गत तिसऱ्या प्रसूतीला कव्हर केले जाते का?

होय, इन्श्युररनुसार, काही प्लॅन्स तिसऱ्या प्रसूती पर्यंत कव्हर करतात.

मॅटर्निटी इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी मी काय विचारात घेणे आवश्यक आहे?

प्रतीक्षा कालावधी, कव्हरेज मर्यादा, अपवाद आणि प्रीमियम खर्च तपासा. तुमच्या विशिष्ट गरजा आणि बजेटला पूर्ण करण्याची खात्री करा.

मॅटर्निटी इन्श्युरन्स घेणे चांगले आहे का?

होय, हे गर्भधारणा आणि प्रसूती खर्चासाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करते. ज्यामुळे या महत्त्वाच्या वेळी मनःशांती मिळते.

गर्भधारणेसाठी कोणत्या प्रकारचा इन्श्युरन्स सर्वोत्तम आहे?

मॅटर्निटी साठीच्या सर्वोत्तम हेल्थ इन्श्युरन्स मध्ये सर्वसमावेशक कव्हरेजचा समावेश असावा. ज्यामध्ये प्रसूती पूर्वी, प्रसूती आणि प्रसूती नंतरच्या खर्चाची काळजी घेतली जाईल. बाळाला आणि आईला योग्य प्रकारे वैद्यकीय सेवांची उपलब्धता सहजपणे होऊ शकेल. गर्भवती महिलांसाठीच्या हेल्थ इन्श्युरन्स मध्ये आवश्यक समाविष्ट वैशिष्ट्यांमध्ये संपूर्ण गर्भधारणेच्या दरम्यान नियमित चेक-अप, डॉक्टर सल्लामसलत, निदान चाचण्या आणि आवश्यक औषधोपचांरांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त, विश्वसनीय मॅटर्निटी पॉलिसी मध्ये जन्मजात आजार आणि लसीकरणाच्या उपचारांसह नवजात बालकाची सर्वांगाने काळजी घेतली जाते. वाजवी प्रतीक्षा कालावधी आणि पर्याप्त सब-लिमिट देखील महत्त्वाचे आहेत. कारण यामुळे पॉलिसी व्यावहारिक आणि ॲक्सेस करण्यायोग्य असल्याची सुनिश्चिती मिळते. बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीचा मॅटर्निटी इन्श्युरन्स हे लाभ प्रदान करतो. ज्यामुळे सर्वार्थाने परिपूर्ण निवड ठरते.

मॅटर्निटी इन्श्युरन्ससाठी किमान प्रतीक्षा कालावधी किती आहे?

मॅटर्निटी इन्श्युरन्स प्लॅन्ससाठी प्रतीक्षा कालावधी प्रोव्हायडर निहाय बदलतो. सर्वसाधारणपणे 9 महिन्यांपासून ते 4 वर्षांपर्यंत असतो. कमी प्रतीक्षा कालावधी म्हणजे लाभांचा जलद ॲक्सेस. जो नजीकच्या कालावधीत गर्भधारणेचे प्लॅनिंग करणाऱ्या कुटुंबांसाठी महत्त्वाचा आहे. बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी स्पर्धात्मक प्रतीक्षा कालावधी ऑफर करते जी ॲक्सेसिबिलिटी आणि सर्वसमावेशक कव्हरेज बॅलन्स करते, ज्यामुळे कुटुंबांना त्यांच्या आरोग्यसेवेच्या गरजा आगाऊ प्लॅन करणे सोपे होते. ही लवचिकता पॉलिसीधारकांना मॅटर्निटी कव्हरेजमध्ये विलंब टाळण्यास मदत करते आणि आवश्यकतेवेळी कुटुंबांना पॉलिसीच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह सपोर्टचा लाभ मिळेल याची खात्री करते, ज्यामुळे प्रसूती खर्चाशी संबंधित फायनान्शियल तणाव कमी होतो.

इन्श्युरन्सद्वारे C-सेक्शन कव्हर केले जाते का?

होय, बहुतांश मॅटर्निटी इन्श्युरन्स पॉलिसी नॉर्मल आणि सिझेरियन (सी-सेक्शन) डिलिव्हरी कव्हर करतात. सी-सेक्शनचा त्याच्या शस्त्रक्रियेच्या स्वरुपामुळे सामान्यपणे जास्त खर्च होतो. परंतु बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीकडून गर्भधारणेसाठी हेल्थ इन्श्युरन्स दोन्ही डिलिव्हरी पद्धतींसाठी फायनान्शियल संरक्षण प्रदान करते. नॉर्मल वर्सिज सिझेरियन डिलिव्हरीसाठी वेगवेगळ्या कॅप्स सेट करणाऱ्या काही प्लॅन्ससह कव्हरेज सब-लिमिटच्या अधीन असू शकते. सी-सेक्शन खर्च कव्हर करून, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी सुनिश्चित करते की अपेक्षित आर्थिक बोजाची चिंता न करता नियोजित किंवा आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक वैद्यकीय सेवा प्राप्त करू शकतात. या सपोर्ट मुळे कुटुंबांना प्रसूती दरम्यान निश्चितच मन:शांती मिळते.

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

  • निवडा
    कृपया निवडा
  • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

  • Customer Login

    कस्टमर लॉग-इन

    गो
  • Partner login

    भागीदाराचे लॉग-इन

    गो
  • Employee login

    कर्मचारी लॉग-इन

    गो