Buy Policy: 1800-209-0144| सेवा: 1800-209-5858
सर्व्हिस चॅट: +91 75072 45858
आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा
नेतृत्व
बजाज आलियान्झ मध्ये, बदल वरच्या बाजूने सुरू होतो. डिजिटल उपक्रमांपासून ते प्रॉडक्ट विकासापर्यंत, आमच्या लीडरशीप टीमकडे 100 वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा सामूहिक अनुभव आहे. उद्योजकीय भावना आणि कस्टमरच्या यशासाठीच्या उत्साहासह एकत्रितपणे, ते आजच्या बाजारातील सर्वात फायदेशीर इन्श्युरर पैकी एक म्हणून कंपनीच्या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी उत्प्रेरक ठरले आहेत. लोकांच्या समुदायाचे मार्गदर्शक म्हणून, आम्हाला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
श्री. तपन सिंघेल हे 2001 मधील स्थापनेपासून बजाज आलियान्झ सोबत आहेत आणि रिटेल मार्केटमध्ये इन्श्युरन्स बिझनेस सुरू करण्यासाठी टीमचा अविभाज्य भाग होते.
तपन सिंघेल यांनी एमडी आणि सीईओ म्हणून पदभार स्वीकारला ते वर्ष होते सन 2012 गेल्या 12 वर्षांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली, कंपनीने नवकल्पना, इंडस्ट्री-फर्स्ट उपक्रम राबवले आणि कस्टमर केंद्रिततेवर लक्ष केंद्रित केले आहे. इन्श्युरन्स सेल, वितरण आणि कस्टमर प्रतिबद्धता त्यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल झाले.
यापूर्वी, ते बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्सचे चीफ मार्केटिंग ऑफिसर (सीएमओ) होते. त्यांनी कंपनीमध्ये रिजनल मॅनेजर, झोनल हेड आणि सर्व रिटेल चॅनेल्सचे हेड यांसारख्या विविध भूमिका सीएमओ म्हणून हाताळल्या आहेत.
बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्सचे MD आणि CEO म्हणून त्यांनी इंडस्ट्रीत विकास, नफा आणि खर्चाची लीडरशीप सुनिश्चित केली आहे. सध्या, ते जीआय-काउन्सिलचे अध्यक्ष आहेत आणि ते इन्श्युरन्स आणि पेन्शन संबंधीच्या सीआयआय राष्ट्रीय समितीचे चेअरमन देखील आहेत. त्यांनी 25th एशिया इन्श्युरन्स इंडस्ट्री अवॉर्ड्स 2021 मध्ये 'लाईफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड' जिंकला. त्यांनी आयडीसी फ्यूचर एंटरप्राईज अवॉर्ड्स 2021 मध्ये भारत आणि आशिया-पॅसिफिक रिजनसाठी 'सीईओ ऑफ द इअर' जिंकला आहे. त्यांना क्वांटिक्स बीएफएसआय एक्सलन्स अवॉर्ड्स 2021, इंडिया इन्श्युरन्स समिट अँड अवॉर्ड्स 2019, 22nd एशिया इन्श्युरन्स इंडस्ट्री अवॉर्ड्स 2018 आणि इंडियन इन्श्युरन्स समिट 2017 मध्ये 'पर्सनालिटी ऑफ द इयर' म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यांना 2019 आणि 2018 मध्ये 'लिंक्डइन टॉप व्हॉइस इन इंडिया' म्हणून ओळखले गेले आणि द इकॉनॉमिक टाइम्स ग्लोबल बिझनेस समिट 2018 मध्ये आशियातील 'मोस्ट प्रॉमिसिंग बिझनेस लीडर' म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे.
Anckur Anil Kanwar is the Chief Financial Officer of Bajaj Allianz General Insurance. In his role, he oversees financial matters at the Company and Business Vertical levels. Additionally, his responsibilities include providing strategic inputs to achieve optimal outcomes for the Company.
With over 20 years of experience in the insurance sector across finance, reinsurance and underwriting domains, Anckur brings deep expertise to the Company. Prior to this, he served as the Deputy CFO at ICICI Lombard and has held key leadership roles as part of his extensive experience. Anckur is a Chartered Accountant from the Institute of Chartered Accountants of India.
के.व्ही. दीपू हे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स मध्ये ऑपरेशन्स आणि कस्टमर सर्व्हिसचे सीनिअर प्रेसिडेंट आहेत. रिटेल फायनान्स ऑपरेशन्समध्ये त्यांना समृद्ध मॅनेजमेंटचा अनुभव आहे. त्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये सेल्स, बिझनेस डेव्हलपमेंट, ऑपरेशन्स, प्रोसेस री-इंजिनीअरिंग आणि प्रॉडक्ट मॅनेजमेंट यांचा समावेश होतो.
त्यांना GE Capital सह सेल्स, प्रॉडक्ट मॅनेजमेंट, सिक्स सिग्मा आणि ऑपरेशन्स मध्ये 19 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. ते एक प्रमाणित लीन सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट आहेत आणि विविध इंडस्ट्री कॉन्फरन्स आणि बिझनेस स्कूलमध्ये स्पीकर आहेत. ते हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू ॲडव्हायजरी काउन्सिलचे सदस्य आहेत, जी बिझनेस प्रोफेशनल्सची ऑप्ट-इन रिसर्च कम्युनिटी आहे.
अल्पना सिंह या जनरल इन्श्युरन्स सेक्टर मधील अनुभवी व्यक्ती म्हणून परिचित आहेत. ज्यांच्याकडे विविध नेतृत्व क्षमतांमध्ये काम करण्याचा 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. वर्ष 2004 पासून बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स सोबत कार्यरत आहेत आणि तेव्हापासून विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. सध्या, त्या हेड - बँकॲश्युरन्स, ॲग्री आणि गव्हर्नमेंट बिझनेस पदावर आहेत ; त्या कंपनीच्या सेल्स ट्रेनिंगच्या देखील हेड आहेत. त्यांचे सातत्य, ध्येयवादी दृष्टीकोन आणि कठोर प्रयत्नांमुळे केवळ कंपनीत नव्हे तर भारतातील जनरल इन्श्युरन्स इंडस्ट्रीमध्ये बँकअश्यूरन्स चॅनेल महत्वाचा घटक बनला आहे.. त्यांची स्टार्ट-अप मानसिकता आहे आणि स्वेच्छापूर्वक आव्हान स्विकारण्याकडे त्यांचा दृष्टीकोन आहे.. अंतर्गत आणि बाह्य दोन्ही कस्टमर त्यांचे स्वभाव गुण आणि आंतरवैयक्तिक कौशल्यामुळे आकर्षित होत आहे.
मेघालय राज्यातील शिलाँग स्थित सेंट मेरी महाविद्यालयातून त्यांनी इंग्लिश ऑनर्स मध्ये पदवी संपादित केली आहे.. त्यासोबतच आयआयएम इंदौर येथून क्रिएटिव्ह इनोव्हेशन मधून पदवी संपादित केली आहे.
विक्रमजीत हे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीचे एचआरचे चीफ, आयएलएम आणि ॲडमिनिस्ट्रेशन आहेत. बजाज आलियान्झ GIC च्या आधी विक्रमजीत यांचा L&T, वोडाफोन आणि डॉएश्च बँक सारख्या प्रमुख कंपन्यांसह एक उपक्रमपूर्ण आणि समृद्ध संबंध होता. एक तरुण आणि ज्वलंत नेता, विक्रमजीत नेहमीच नाविन्यपूर्ण आणि नवीन मार्गाने HR उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी वचनबद्ध आहेत. त्यांनी मजबूत परफॉर्मन्स मॅनेजमेंट फ्रेमवर्क्स आणि संस्कृतीत बदल घडवून आणून लोकांच्या अजेंड्यामध्ये मोठे योगदान दिले आहे.
In this current role, Aashish heads Agency, Health Distribution, and Travel for the organization. Aashish carries a significant experience of more than 30 years, with close to 25 years in the insurance sector, in senior leadership positions in Life (Tata AIA Life Insurance), Health (Apollo Munich Health Insurance), and General (Bajaj Allianz General Insurance). This gives him the unique distinction of having worked in all three businesses of the insurance industry.
He has managed a spectrum of verticals, including Bancassurance, Pensions, Retail and Institutional Strategy & Distribution Management, Alliances, Corporate Business, and Digital & Rural businesses.
Aashish holds a graduate degree in hospitality management, followed by a 2-year course with the ITC Management Institute (Gurugram) and Certificate Courses on Strategy & Execution from IIM Ahmedabad and Innovation from Harvard Business School.
श्री. मुझुमदार हे वर्ष 2001 पासून बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीचे अविभाज्य घटक आहेत. विविध इन्श्युरन्स प्रोफाईलला सर्व्हिस देणाऱ्या अनेक कार्यांमध्ये काम करून त्यांनी कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. कंपनीच्या स्थापना वर्षात ते कोलकाता येथे कंपनीच्या तांत्रिक भूमिकेत क्लेम व्यवस्थापित आणि अंडररायटिंग करणे यासाठी सामील झाले आणि अखेरीस मॅनेजिंग सेल्स मध्ये त्यांनी ठसा उमटविला. आधी कोलकाता, त्यानंतर बंगलोरचे रिजनल हेड बनले आणि त्यानंतर झोनल हेड-साऊथ म्हणून जबाबदारी स्विकारली.. सध्या, मोटर डिस्ट्रीब्यूशन मध्ये नॅशनल हेड आहेत.. इन्श्युरन्स क्षेत्रातील तीस दशकांहून अधिक अनुभवामुळे श्री. मुझुमदार हे प्रभावशाली नेतृत्न ठरले आहेत आणि त्यांचे मुख्य ध्येय संभाव्यतेवर राहिले आहे.
ते B.Com आणि बीए - इंग्रजी ऑनर्स सह पदवीधर आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्श्युरन्सचे फेलो आहेत आणि सीआयआयचे (यूके) सहयोगी सदस्य आहेत. श्री. मझुमुदार हे ओपेक्स मध्ये सर्टिफाईड ब्लॅक बेल्ट आहे.
अविनाश यांच्याकडे रिटेल फायनान्शियल सर्व्हिस मध्ये पेमेंट, लेडिंग आणि ई-कॉमर्स इंडस्ट्री अशा करिअरच्या व्यापक स्पेक्ट्रम संबंधित ग्रोथ मार्केटिंग बिल्डिंग आणि मॅनेजमेंट, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, B2B पार्टनरशिप, सेल्स डिस्ट्रिब्यूशन आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आणि प्रोग्राम व प्रॉडक्ट मॅनेजमेंट यांचा दोन दशकांहून अधिक कालखंडाचा समृद्ध अनुभव आहे. मागील काळात श्री. अविनाश हे बजाज फायनान्स संबंधित होते आणि विद्यमान आणि नवीन कस्टमरला प्रॉडक्ट प्राप्त आणि सेल करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉ्र्म निर्मितीत कार्यरत होते.. आजवरच्या करिअरच्या वाटचालीत, त्यांनी नवीन प्रॉडक्ट लाँच, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, ई-कॉमर्स पार्टनरशिप आणि परफॉर्मन्स मार्केटिंग मध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.. अविनाश हे एनएमआयएमएस मधून एमबीए पदवीधर आहेत आणि मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इंजिनिअरिंग मध्ये पदवी संपादन केली आहे.
सतीश केडिया हे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लि. येथे कॉर्पोरेट बिझनेस ग्रुप आणि लायबिलिटीचे प्रमुख आहेत. ते 2005 पासून कंपनीसोबत आहेत आणि त्यांच्या कालावधीदरम्यान विविध भूमिका बजावल्या आहेत. त्यांच्या वर्तमान स्थितीत, ते कमर्शियल आणि लायबिलिटी बिझनेसचे नेतृत्व करण्यासाठी, B2B वितरण नेटवर्क तयार करण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी नाविन्यपूर्ण विक्री धोरणे तयार करण्यासाठी आणि शाश्वत, स्केलेबल आणि संलग्न बिझनेस मॉडेल वितरित करण्यासाठी जबाबदार आहेत.
सतीश यांना दोन दशकांचा अनुभव आहे आणि कॉर्पोरेट रिलेशनशिप मॅनेजमेंट मध्ये प्रवीण आहेत. सांघिक वातावरण निर्माण करण्यास आणि सांघिक बांधिलकी दृढ करण्यास त्यांना ओळखले जाते. ते चार्टेड इन्श्युरर (ACII, UK) आणि इन्श्युरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FIII) यांचे फेलो आहेत. त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून सस्टेनेबल बिझनेस स्ट्रॅटेजी अँड डिस्रप्टिव इनोव्हेशन अँड स्ट्रॅटेजीचे प्रमाणित कोर्सेस देखील केले आहेत.
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा