Loader
Loader

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

पर्सनल ॲक्सिडेंट इन्श्युरन्स पॉलिसी: पर्सनल गार्ड

आकस्मिक अपघातांपासून संपूर्ण संरक्षण

Personal accident insurance policy by Bajaj Allianz

तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी सर्वसमावेशक ॲक्सिडेंट इन्श्युरन्स प्लॅन

तुमचे लाभ अनलॉक करा

मुलांच्या शिक्षणाचा लाभ

हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केल्याचा भत्ता

अपघाती इजा कव्हर

बजाज आलियान्झ पर्सनल गार्ड पॉलिसी का निवडायची?

एक अपघात 60 सेकंदांपेक्षा कमी वेळात तुमच्या आयुष्यात अपरिवर्तनीय असा बदल घडवू शकतो. हे तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीसोबत घडू शकते; कोठेही आणि कधीही आणि त्यासाठी आपण तयार असणे आवश्यक आहे. भविष्यात काय वाढून ठेवले आहे, हे आपल्याला माहित नसते परंतु आपण त्याचा सामना करण्यासाठी सदैव तयार राहू शकतो.

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स येथे आम्ही हे जाणतो आणि आमची पर्सनल गार्ड इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला कोणत्याही आकस्मिक अपघाताच्या परिणाम सापेक्ष कव्हर पुरविण्यासाठी तयार केली गेली आहे. वैद्यकीय बिले भरून, मुलांच्या शिक्षणासाठी लाभ पुरवून आणि अन्य अनेक प्रकारे ही हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीअपघातानंतर तुमचे आयुष्य पुन्हा सामान्य करण्यासाठी तुमची मदत करते.

आमच्या पर्सनल गार्ड पॉलिसीद्वारे तुमची वित्तीय सिक्युरिटी योग्य हातात आहे, जी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कोणत्याही दुर्घटनेमुळे झालेल्या शारीरिक इजा, अपंगत्व किंवा मृत्यूपासून संरक्षण देते.

या पॉलिसी अंतर्गत उपलब्ध असलेले विविध प्रकारचे कव्हर्स जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा.

Sl / वय

बेसिक

वाईडर

सर्वसमावेशक

मृत्यू

     

परमनंट टोटल डिसॅबिलिटी

     

कायमस्वरुपी आंशिक अपंगत्व

     

तात्पुरते पूर्ण अपंगत्व

     

मुलांचे शिक्षण बोनस

     

सम इन्शुअर्ड

     

वैद्यकीय खर्च + हॉस्पिटल खर्च

     

पर्सनल गार्ड पॉलिसीमध्ये आम्ही बरेच काही देऊ करतो

महत्त्वाची वैशिष्ट्ये

अशी पॉलिसी जी खाली दिलेल्या वैशिष्ट्यांसह तुम्हाला अपघातांपासून संरक्षण प्रदान करते :

  • व्यापक कव्हर

    हि पॉलिसी इन्शुअर करते:

    • मृत्यूः एखाद्या अपघातामुळे मृत्यू झाल्यास, 'सम इन्शुअर्ड'ची 100% रक्कम आपल्या नॉमिनीला दिली जाईल.
    • कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व (पीटीडी):एखाद्या अपघातामुळे कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास 'सम इन्शुअर्ड'च्या 125% नुकसान भरपाई मिळवा.
    • कायमस्वरुपी आंशिक अपंगत्व (पीपीडी): एखाद्या अपघातामुळे कायमस्वरुपी आंशिक अपंगत्व आल्यास आम्ही 'सम अशुअर्ड'ची रक्कम खालीलप्रमाणे लागू असेल त्या टक्केवारीत देऊ:

      लाभांच्या प्रमाणाचे वर्णन

      % 'सम इन्शुअर्ड' म्हणून लाभ

      खांद्याच्या सांध्यावरील हात

      70

      कोपऱ्या वरचा हात

      65

      कोपराखालील हात

      60

      मनगट

      55

      अंगठा

      20

      तर्जनी

      10

      पायाची इतर बोटे

      5

      मध्य मांडीच्या वरचा एक पाय

      70

      मध्य मांडीच्या वरचा पाय

      60

      गुडघा खाली पाय

      50

      मध्य-पोटरीपर्यंतचा पाय

      45

      घोट्या वरून पाय

      40

      पायाचे मोठे बोट

      5

      इतर कोणतेही बोट

      2

      कोणताही एक डोळा

      50

      एका कानाने ऐकू न येणे

      30

      दोन्ही कानाने ऐकू न येणे

      75

      वासाची संवेदना

      10

      चवीची संवेदना

      5

    • तात्पुरते पूर्ण अपंगत्व (टीटीडी): टीटीडीच्या बाबतीत आपण 'सम इन्शुअर्ड'च्या 1% किंवा आठवड्यात 5,000 रुपये प्राप्त करण्यास पात्र आहात, त्यापैकी जे कमी असेल ते.
  • मुलांच्या शिक्षणाचा लाभ

    मृत्यू किंवा कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व असल्यास, अपघाताच्या तारखेला 19 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या प्रत्येक आश्रित मुलाच्या, 2 मुलांपर्यंत, शिक्षणावरील खर्चासाठी रुपये 5,000 एकवेळ देय असेल.

  • हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केल्याचा भत्ता

    जर मृत्यू, कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व, कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व किंवा तात्पुरते अपंगत्व या अंतर्गत क्लेम स्वीकारला गेला असेल तर आम्ही आपल्याला रूग्णालयात दाखल करण्यासाठी पॉलिसीच्या कालावधीत जास्तीत जास्त 30 दिवस, दररोज रु. 1,000 देऊ.

  • अपघाती इजेमुळे होणारे वैद्यकीय खर्च कव्हर करते

    जर मृत्यू, कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व, कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व किंवा तात्पुरते पूर्ण अपंगत्व या अंतर्गत क्लेम स्वीकारला गेला असेल तर आम्ही अपघाती इजेमुळे झालेल्या वैद्यकीय खर्चापोटी वैध दाव्याच्या रकमेच्या 40% किंवा वास्तविक वैद्यकीय बिलांच्या रकमेची परतफेड करू, जे कमी असेल ते.

आमच्या ॲक्सिडेंट इन्श्युरन्स प्लॅन्स बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, व्हिडिओ पाहा.

Video

क्लेम प्रोसेस

कोणतीही अपघाती शारीरिक इजा / मृत्यू झाल्यामुळे केलेल्या क्लेमसाठी कृपया खाली नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण कराः:

  1. तुम्ही किंवा तुमची जवळील व्यक्ती जी तुमच्या वतीने क्लेम करीत आहे, त्याने आम्हाला 30 दिवसांच्या आत लेखी कळवावे.
  2. तुम्ही तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन त्यांनी दिलेला सल्ला आणि उपचार सुरू करणे गरजेचे आहे.
  3. शारीरिक दुखापतीचा परिणाम कमी करण्यासाठी आपण वाजवी पावले उचलली पाहिजेत.
  4. आवश्यक असल्यास, आपण आमच्या वैद्यकीय सल्लागारांकडून स्वत:ची तपासणी करुन घ्यावी. (आवश्यक असल्यास).
  5. आपण, किंवा आपली जवळील व्यक्ती जी आपल्या वतीने दावा करत आहे, त्याने तपासण्यांसाठी आणि क्लेमच्या पूर्ततेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे आणि माहिती पुरविली पाहिजे.
  6. आपल्या मृत्यूच्या बाबतीत, आपली जवळील व्यक्ती जी आपल्या वतीने दावा करीत आहे, त्याने आम्हाला लेखी कळवावे आणि आवश्यक असल्यास, पोस्टमार्टम रिपोर्टची एक प्रत 30 दिवसांच्या आत पाठवावी. (आवश्यक असल्यास).
  7. क्लेम फॉर्मसह प्रस्तुत करण्यासाठीची इतर संबंधित कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेतः:

मृत्यू

  • नॉमिनी / कायदेशीर वारस यांच्या स्वाक्षरीने योग्य प्रकारे पूर्ण केलेला क्लेम फॉर्म.
  • पोलिस पंचनामा / चौकशी पंचनामा, एफआयआर, पोस्टमार्टम रिपोर्ट आणि मृत्यू सर्टिफिकेट ह्याची प्रत्येकी एक प्रत.
  • व्हिसेरा अहवालाची साक्षांकित प्रत (केवळ तो जतन करुन ठेवल्या गेला असेल आणि पुढील विश्लेषणासाठी पाठविला गेला असेल तरच, जे की पोस्टमार्टम अहवालात नमूद आहे).
  • NEFT चा तपशील आणि विमाधारक व्यक्तीचा नामनिर्देशित / कायदेशीर वारस रद्द केलेला धनादेश.
  • आधार कार्ड किंवा इतर कोणतेही सरकारी फोटो आयडी आणि पॅन कार्डची एक कॉपी. पॉलिसी देताना किंवा पूर्वीच्या क्लेममध्ये तुमचे ओळखपत्र पॉलिसीशी लिंक असल्यास हे अनिवार्य नाही.

PTD (कायमस्वरुपी पूर्ण अपंगत्व), PPD (कायमस्वरुपी आंशिक अपंगत्व) आणि TTD (तात्पुरते पूर्ण अपंगत्व)

  • इन्श्युरन्स धारकाद्वारे सही केलेला व विधिवत पूर्ण असा क्लेम फॉर्म.
  • गव्हर्नमेंट रूग्णालयाच्या सिव्हिल सर्जनकडून डिसअ‍ॅब्लिटीची टक्केवारी दर्शविणाऱ्या सर्टिफिकेटची अटेसटेड कॉपी.
  • सरकारी रुग्णालयाच्या सिव्हिल सर्जनकडून अपंगत्वाची टक्केवारी दर्शविणारी अपंगत्वाच्या सर्टिफिकेटची प्रमाणित प्रत.
  • अपंगत्वाचे समर्थन करणारे एक्स-रे आणि वैद्यकीय तपासणीचे अहवाल एफआयआरची साक्षांकित प्रत (जर असेल तर).
  • अपंगत्वाचे समर्थन करणारी, अपघाताच्या आधीची आणि नंतरची रुग्णाची छायाचित्रे.
  • NEFT चा तपशील आणि विमाधारक व्यक्तीचा रद्द केलेला धनादेश.
  • आधार कार्ड किंवा इतर कोणतेही सरकारी फोटो आयडी आणि पॅन कार्डची एक कॉपी. पॉलिसी देताना किंवा पूर्वीच्या क्लेममध्ये तुमचे ओळखपत्र पॉलिसीशी लिंक असल्यास हे अनिवार्य नाही.

मुलांच्या शिक्षणासाठी बोनस

  • शाळा / महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा शैक्षणिक संस्थेचे सर्टिफिकेट.
  • आधार कार्ड किंवा इतर कोणतेही सरकारी फोटो आयडी आणि पॅन कार्डची एक कॉपी. पॉलिसी देताना किंवा पूर्वीच्या क्लेममध्ये तुमचे ओळखपत्र पॉलिसीशी लिंक असल्यास हे अनिवार्य नाही.

रुग्णालयात दाखल झाल्याचा भत्ता / वैद्यकीय खर्चाची भरपाई

  • डॉक्टरांचे कन्सलटेशन लेटर.
  • क्लेम केलेल्या व्यक्तीच्या सहीचा पूर्ण भरलेला फॉर्म.
  • रूग्णालय डिस्चार्ज कार्ड.
  • रूग्णालयातर्फे देण्यात येणाऱ्या बिलात झालेल्या खर्चाची माहिती असावी. बिलामध्ये ऑपरेशन थिएटर(ओटी) शुल्क, डॉक्टरांचे कन्सलटेशन आणि व्हिजिट शुल्क, ऑपरेशवेळी वापरण्यात आलेल्या वस्तू, ट्रान्सफ्युशन, रूमचे भाडे इत्यादींसाठीचे स्पष्ट ब्रेक-अप नमूद केलेले असावे.
  • बिलाच्या पावतीवर रेव्हेन्यू स्टॅंपसह सही असावी.
  • लॅबोरेटरी आणि निदान केलेल्या तपासणीचे सर्व ओरिजिनल रिपोर्ट, उदाहरणार्थ, एक्स-रे, ईसीजी, यूएसजी, एमआरआय स्कॅन, हेमोग्राम इत्यादी.
  • क्लेमसाठी बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्सला आवश्यक असलेली इतर कागदपत्रे.
  • आधार कार्ड किंवा इतर कोणतेही सरकारी फोटो आयडी आणि पॅन कार्डची एक कॉपी. पॉलिसी देताना किंवा पूर्वीच्या क्लेममध्ये तुमचे ओळखपत्र पॉलिसीशी लिंक असल्यास हे अनिवार्य नाही.

एफएक्यू

माझ्याकडे पर्सनल ॲक्सिडेंट कव्हरेज का असावे?

वैयक्तिक अपघात पॉलिसी एखाद्या अपघाताच्या परिणामी मृत्यू / इजा / अपंगत्व आल्यास आर्थिक सहाय्य पुरविते. अनपेक्षित वैद्यकीय खर्च हा आर्थिकदृष्ट्या मोठा धक्का ठरू शकतो. एखाद्या अकल्पित घटनेपश्चातही एक व्यापक वैयक्तिक अपघात इन्श्युरन्स आपणास आर्थिक सुरक्षा प्रदान करतो.

मी माझा क्लेम कसा सादर करू?

जर अपघातामुळे आपल्या शरीराच्या कोणत्याही अवयवाला दुखापत झाली आणि त्याबद्दल आपल्याला क्लेम करावयाचा असेल, तर आपण किंवा आपल्या जवळील व्यक्ती जी आपल्या वतीने दावा करीत आहे, त्याने आम्हाला ताबडतोब किंवा 14 दिवसांच्या आत लेखी कळवावे.

एखाद्या अपघातामुळे मृत्यू झाल्यास, त्वरित आम्हाला लेखी कळविले पाहिजे आणि पोस्टमार्टम अहवालाची एक प्रत 14 दिवसांच्या आत आम्हाला पाठविली पाहिजे.

माझा क्लेम किती दिवसात सेटल होईल?

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स क्लेम सेटलमेंटच्या क्विक प्रोसेसिंगवर विश्वास ठेवते. सर्व आवश्यकता पूर्ण केल्यास, क्लेम प्रस्तुत केल्या तारखेपासून सात कामकाजाच्या दिवसांच्या आत क्लेमवर प्रक्रिया केली जाते.

पर्सनल गार्ड पॉलिसीमध्ये नैसर्गिक मृत्यू किंवा आजारपणामुळे / एखाद्या रोगामुळे झालेल्या मृत्यूचा समावेश होतो का?

नाही, वैयक्तिक संरक्षण पॉलिसीत केवळ अपघात किंवा अपघाती इजेमुळे होणार्‍या मृत्यूचाच समावेश होतो.

पर्सनल गार्ड पॉलिसी अंतर्गत प्रवेशाचे वय किती आहे?

पर्सनल गार्ड पॉलिसीची निवड करण्याची पात्रता खालीलप्रमाणे आहेः:

प्रपोजर आणि जोडीदाराचे प्रवेशाचे वय 18 ते 65 वर्षे दरम्यान असावे.

अवलंबून असलेल्या मुलांचे प्रवेशाचे वय 5 ते 21 वर्षांदरम्यान असावे.

आमच्या सेवांद्वारे स्मितहास्य पसरविणे

आशिष झुंझुनवाला

माझ्या क्लेमच्या पुर्ततेबाबत जो 2 दिवसांच्या आत मंजूर झाला, मला झालेला आनंद आणि समाधान...

सुनिता एम आहूजा

लॉकडाउनच्या काळात इन्श्युरन्स कॉपी वेगाने वितरीत केली गेली. बजाज आलियान्झच्या टीमला सलाम

रेनी जॉर्ज

बजाज आलियान्झ वडोदरा टीमचे, विशेषतः श्री हार्दिक मकवाना आणि श्री आशिष यांचे आभार...

पर्सनल गार्ड इन्श्युरन्स पॉलिसी संपूर्ण सिक्युरिटी आणि मनःशांती ची खात्री देते.

वैयक्तिक अपघाताशी संबंधित सर्व परिस्थिती कव्हर करण्यासाठी टेलर मेड प्लॅन.

ह्या शिवाय, पर्सनल गार्ड सोबत तुम्हाला पुढील अतिरिक्त लाभ मिळतील

ही पॉलिसी अपघातांमुळे होणार्‍या मृत्यू, इजा किंवा अपंगत्व ह्यासाठी विविध लाभांसह संपूर्ण कव्हरेज प्रदान करते:
Family discount

कौटुंबिक सवलत

तुमच्या कुटुंबाचा इन्श्युरन्स उतरवा आणि 10% सवलत मिळवा.

Hassle-free claim settlement

विनासायास क्लेम सेटलमेंट

आमची इन-हाऊस क्लेम सेटलमेंट टीम अखंड आणि जलद क्लेम सेटलमेंट प्रदान करते. अधिक वाचा

विनासायास क्लेम सेटलमेंट

Our in-house claim settlement team provides seamless and quick claim settlement. We also offer cashless facility at more than 18,400+ network hospitals* across India. This comes in handy in case of hospitalisation or treatment wherein we take care of paying the bills directly to the network hospital and you can focus on recovering and getting back on your feet. 

Flexible premium computation

लवचिक प्रीमियम गणना

तुमच्या व्यवसायानुसार ठरविलेल्या विभिन्न जोखीम पातळीच्या बाबतीत प्रीमियम भिन्न असते अधिक जाणून घ्या

लवचिक प्रीमियम गणना

तुमच्या व्यवसायानुसार ठरविलेल्या विभिन्न जोखीम पातळीच्या बाबतीत प्रीमियम भिन्न असते

जोखीम स्तर I: प्रशासकीय/व्यवस्थापन कार्य, अकाउंटंट, डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट्स, शिक्षक.

जोखीम स्तर II: मॅन्युअल लेबर, गॅरेज मेकॅनिक, मशीन ऑपरेटर पेड ड्रायव्हर (कार/ट्रक/हेवी वाहने), कॅश-कॅरी कर्मचारी, बिल्डर, काँट्रॅक्टर, पशुवैद्यकीय डॉक्टर.

जोखीम स्तर III: भूमिगत खाणींमधील कामगार, उच्च ताण पुरवठा असलेल्या विद्युत प्रतिष्ठान, जॉकी, सर्कस कलाकार, मोठ्या खेळाचे शिकारी, गिर्यारोहक, व्यावसायिक रिव्हर राफ्टर्स आणि तत्सम व्यवसाय.

नोंद: वर नमूद न केलेल्या व्यवसायांसाठी, कृपया आमच्यासोबत चौकशी करा.

वार्षिक प्रीमियम रेट

आपल्या आवश्यकतेनुसार आपण प्रीमियम पर्यायांच्या श्रेणीमधून निवड करू शकता:

प्रीमियम दर खाली दिले आहेत (%) - रुपये प्रति 1,000/-

कव्हर

जोखीम सत्र

 

I

ii

iii

बेसिक

0.45

0.6

0.9

वाईडर

1.0

1.25

1.75

सर्वसमावेशक

1.5

2.0

लागू नाही

वैद्यकीय खर्च

प्रिमीयम पेक्षा 25% अधिक

प्रिमीयम पेक्षा 25% अधिक

प्रिमीयम पेक्षा 25% अधिक

रूग्णालयामध्ये अ‍ॅडमिट होणे

Rs 300 प्रति व्यक्ती

Rs 300 प्रति व्यक्ती

Rs 300 प्रति व्यक्ती

Cumulative bonus

संचयी बोनस

प्रत्येक क्लेम-फ्री वर्षासाठी जास्तीत जास्त 50% पर्यंत 10% संचयी बोनसचा लाभ घ्या, जर क्लेम रजिस्टर्ड असेल तर 10% ने कमी होईल.

पर्सनल गार्ड खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवण्याजोगे महत्त्वाचे मुद्दे

  • समावेश

  • अपवाद

पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर

एखाद्या अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास त्यासाठी कव्हर प्रदान करते.

मुलांच्या शिक्षणाचा लाभ

अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास, जास्तीत जास्त 2 अवलंबून मुलांसाठी ‘अपत्य शिक्षण लाभ’ घेण्यास पात्र आहेत.

हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केल्याचा भत्ता

अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास रुग्णालयात दाखल होण्याच्या प्रत्येक दिवसासाठी रोख लाभ लागू राहील.

अपघातामुळे होणारा वैद्यकीय खर्च

मृत्यू किंवा अपंगत्वासाठी क्लेम स्वीकारला गेल्यास, वैद्यकीय खर्चाच्या किंमतीची भरपाई, वैध क्लेम रकमेच्या 40% किंवा वास्तविक वैद्यकीय बिले, यातील जे कमी असेल त्यानुसार केली जाईल.

1 चे 1

आत्महत्या, आत्महत्या करण्याचा प्रयत्न किंवा आजारपणामुळे झालेल्या अपघाती शारीरिक इजा.

दारू किंवा ड्रग्सच्या प्रभावाखाली अपघातग्रस्त इजा / मृत्यू.

कोणत्याही गुन्हेगारी हेतूने कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे झालेली इजा / मृत्यू.

विमान चालवताना किंवा बलूनमध्ये असताना, गिर्यारोहण करताना किंवा उतरताना झालेली अपघाती इजा/ मृत्यू...

अधिक जाणून घ्या

विमानात किंवा बलूनमध्ये चढताना, जगात कुठेही कोणत्याही परवानाधारक प्रमाणित विमानाच्या प्रवाश्याप्रमाणे (भाडे देताना किंवा अन्यथा) प्रवासी (इतर भाड्याने देणे किंवा अन्यथा) सोडून इतर कोणत्याही बलून किंवा विमानात उतरुन किंवा प्रवास करणे, यामुळे अपघाती इजा / मृत्यू.

मोटर रेसिंग किंवा ट्रायल रन चालू असताना ड्राइव्हर, को-ड्राइव्हर किंवा मोटार व्हेइकलचा प्रवासी म्हणून भाग घेतल्यामुळे अ‍ॅक्सिडेंट होऊन झालेली इजा / मृत्यू.

तुम्ही तुमच्या शरीरावर केलेले कोणतेही रोगनिवारक उपचार किंवा बदल.

नेव्हल, मिलेट्री किंवा एअर फोर्सच्या ऑपरेशनमध्ये भाग घेणे, मिलेट्री एक्सरसाइज ब्रेक किंवा युद्ध खेळांशिवाय किंवा परदेशी किंवा देशांतर्गत, शत्रूशी प्रत्यक्ष लढणे.

आपले कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा आपली वास्तविक किंवा आरोपित कायदेशीर जबाबदारी.

रक्तवाहिन्यासंबंधी किंवा लैंगिक संबंधातून पसरणारे रोग.

एचआयव्ही आणि/किंवा एड्स आणि / किंवा उत्परिवर्तित डेरिव्हेटिव्ह्ज किंवा त्यातील बदलांसह एचआयव्ही संबंधित कोणताही आजार.

गर्भधारणा, अपत्यजन्म, मिसकॅरेज, अबॉर्शण किंवा यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्या.

युद्धामुळे उद्भवणारे उपचार (घोषित केले किंवा नसले तरी), गृहयुद्ध, आक्रमण, बाह्य कृत्य...

अधिक जाणून घ्या

युद्धामुळे (घोषित किंवा अघोषित), गृहयुद्ध, आक्रमण, परदेशी शत्रूंचा हल्ला, बंडखोरी, क्रांती, विद्रोह, उठाव, लष्करी किंवा हद्दपार केलेली शक्ती, जप्ती, पकडणे, अटक करणे, बहिष्कार किंवा नजरकैद, जप्ती किंवा राष्ट्रीयकरण किंवा यामुळे होणारे उपचार कोणत्याही शासकीय किंवा सार्वजनिक किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या आदेशानुसार किंवा त्याद्वारे नुकसान भरपाई करणे किंवा नुकसान करणे.

न्यूक्लिअर रेडिएशनमुळे उद्भवणारे उपचार.

1 चे 1

हेल्थ इन्श्युरन्स डॉक्युमेंट्स डाउनलोड करा

तुमची मागील पॉलिसी अद्याप कालबाह्य झाली नाही?

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया तारीख निवडा

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.

कस्टमर रिव्ह्यू आणि रेटिंग

सरासरी रेटिंग:

4.75

(3,912 रिव्ह्यूज व रेटिंगवर आधारित)

Satish Chand Katoch

सतीश चंद कटोच

वेबद्वारे पॉलिसी घेताना कोणत्याही अडचणीशिवाय सर्व पर्यायांचा रिव्ह्यू करता येऊ शकतो.

Ashish Mukherjee

आशिष मुखर्जी

प्रत्येकासाठी खूप सोपी, विनासायास, विना गुंतागुंत. छान काम. शुभेच्छा.

Jaykumar Rao

जयकुमार राव

खूप यूजर फ्रेंडली आहे. मला माझी पॉलिसी 10 मिनिटांपेक्षा कमी वेळेत मिळाली.

बजाज अलायंझ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.

कॉलबॅकची विनंती

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया वैध पर्याय निवडा
कृपया निवडा
कृपया चेकबॉक्स निवडा

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

  • निवडा
    कृपया निवडा
  • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

आमच्यासह चॅट करा