पडताळणी कोड
आम्ही तुमच्या मोबाईल नंबरवर व्हेरिफिकेशन कोड पाठविला आहे
00.00
कोड प्राप्त झाला नाही? पुन्हा पाठवा
रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)
Buy Policy: 1800-209-0144| सेवा: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858
आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा
तुमच्या ट्रिपदरम्यान अनपेक्षित खर्चापासून तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स डिझाईन केलेला आहे. यामध्ये वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, चेक-इन सामान हरवणे, ट्रिप रद्दीकरण आणि बरेच काही कव्हर केले जाते. बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी तुम्हाला तुमच्या गरजा आणि बजेटला अनुरुप सर्वोत्तम फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्रदान करते. जगभरातील फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्सच्या पर्यायांसह, तुम्ही कुठेही आत्मविश्वासाने प्रवास करू शकता.
सुट्टीचे नियोजन करताना, तुमच्या कुटुंबाची सुरक्षा आणि कल्याण याची खात्री करणे खूपच महत्त्वाचे आहे. बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीचा सर्वोत्तम फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स वैद्यकीय खर्च, स्थलांतर, प्रत्यावर्तन आणि आपत्कालीन दातदुखी पासून आराम यांसह सर्वसमावेशक कव्हरेज प्रदान करतो. यामध्ये सामान, पासपोर्ट आणि वैयक्तिक दायित्वाशी संबंधित नुकसान देखील कव्हर केले जाते. उदाहरणार्थ, ट्रॅव्हल कम्पॅनियन प्लॅन वैद्यकीय खर्चासाठी $50,000 पर्यंत आणि हरवलेल्या सामानासाठी $250 पर्यंत प्रदान करतो. असे व्यापक कव्हरेज हे सुनिश्चित करते की तुम्ही आणि तुमच्या प्रियजनांना परदेशात प्रवास करताना अनपेक्षित घटनांपासून संरक्षित केले जाईल, ज्यामुळे तो मनःशांतीसाठी सर्वोत्तम फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स बनतो.
विविध गोष्टीपासून असलेला आरोग्याला धोका जसे की अति प्रदूषण, भेसळयुक्त अन्नपदार्थ व अपघात, विशेष करून मुलांना प्रवासात किती उत्साह असतो हे लक्षात घेऊन फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स घेणे हे अत्यावश्यक झाले आहे. परदेशात वैद्यकीय उपचारांचा खर्चही कितीतरी अधिक पटीने जास्त असतो.
जगाच्या काही भागात रस्त्यांवरील अपघात व सामान चोरीला जाणे हे सुद्धा अगदी सर्वसामान्य आहे. आपण आपल्या सामानाची काळजी घेणे तर आवश्यक आहेच पण फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुम्हाला आणीबाणीच्या प्रसंगात कव्हर देतो.
तुम्ही जपानला जात असाल किंवा युरोपच्या रहस्यांचा शोध घेण्यास जात असाल, तुम्ही तयार असणे या गोष्टीनेच खूप फरक पडतो
म्हणूनच, बजाज आलियान्झ फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्सच्या बऱ्याच योजनांचे पर्याय ऑनलाईन देते ज्यातून तुम्हाला तुमच्या पैशांची पुरेपूर किंमत मिळते व खूप व्यापक कव्हरेज मिळते. कुठची पॉलिसी घ्यावी हे तुम्ही जर ठरवू शकत नसाल किंवा एखाद्या पॉलिसीमध्ये कुठल्या गोष्टींचा कव्हर आहे याबद्दल विचार करत असाल तर तुम्हाला फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्ससबंधीच्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्या वेबसाईटवर मिळतील. थोड्याच क्लिकमध्ये ब्राऊस करा, निवडा, पैसे भरा आणि हे सर्व तुमच्या सोयीनुसार!
फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स ऑनलाईन विकत घेण्याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला अगदी अचूक किंमत ताबडतोब मिळते. म्हणूनच, जेव्हा तुम्हाला फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स विकत घ्यायचा असेल, तुम्ही विविध पॉलिसींमध्ये असलेल्या कव्हर्स, अटी व शर्ती इत्यादींची सहजतेने तुलना करू शकता व या माहितीच्या आधारावर निर्णय घेऊ शकता.
ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन ऑनलाईन विकत घेण्याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला सर्व संबंधित माहिती सहजतेने मिळते. विविध पॉलिसींमध्ये कोणत्या गोष्टींपासून कव्हर आहे हे तुम्ही ताबडतोब तपासून पाहू शकता आणि त्यातील तुमच्यासाठी जी सर्वात योग्य आहे ती निवडू शकता. ही प्रक्रिया अजून सोपी करण्यासाठी, आमचा बोईंग (BOING) या चॅटबॉट मुळे पॉलिसी संदर्भातील कोणत्याही प्रश्नाचे चटकन उत्तर मिळवू शकता.
आम्ही असे सांगितले का की आमची वेबसाईट आमच्या योजना व त्यांची वैशिष्ट्ये सोप्या व सहज रितीने रोचक रितीने सांगते आणि तुम्हाला अती प्रमाणात माहिती (information overload syndrome) देणे टाळते?
परदेश प्रवासाचे नियोजन करता एवढ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते की तुम्हाला नेहमीच वेळ कमी पडतो. तुम्ही परदेशात एखाद्या विद्यापीठाच्या कुठल्याश्या अभ्यासक्रमाविषयी माहिती घेणारे विद्यार्थी असाल किंवा हवाईच्या समुद्रातील लाटांमध्ये आपले पाय ओले करुया अशी स्वप्न बघणारे ज्येष्ठ नागरिक असाल, तुम्हाला तुमच्यासाठी तयार केलेला ट्रॅव्हल इन्श्युरन्स अगदी हॅसल फ्री मिळू शकेल
तुम्ही केवळ आमच्या शब्दावर विसंबून राहू नका! आमच्या वेबसाईटला भेट द्या व बघा की आमच्या ऑनलाईन ट्रॅव्हल इन्श्युरन्सच्या पर्यायांंमुळे तुमचे शोधाशोध करायचे किती तास वाचतात. तो वाचलेला वेळ त्याऐवजी तुमच्या येऊ घातलेल्या प्रवासाच्या नियोजनासाठी वापरा
आम्ही नेहमीच आशा करतो की तुमचा प्रवास कोणत्याही समस्येपासून मुक्त असेल. परंतु जर काहीतरी चुकीचे घडले आणि तुम्हाला क्लेम दाखल करावा लागत असेल तर आम्ही तुमच्यासाठी चोवीस तास उपस्थित असू. तुम्हाला फक्त आमच्या ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन नंबर +91 124 6174720 वर मिस्ड कॉल द्यायचा आहे किंवा आमच्या टोल फ्री नंबर 1800 209 5858 वर कॉल करायचा आहे. तुम्ही आमच्याशी संपर्क साधल्यानंतर, आमचा प्रतिनिधी तुम्हाला संपूर्ण प्रोसेस मध्ये मार्गदर्शन करेल.
तुमचा क्लेम हा कॅशलेस पद्धतीने पूर्ण करायचा आहे की रिइंबर्समेंट पद्धतीने पूर्ण करायचा आहे यावर ट्रॅव्हल इन्श्युरन्सच्या क्लेमची प्रक्रिया अवलंबून राहील.
जर तुमचा कॅशलेस क्लेम असेल:
✓ तुम्ही फोन अथवा ई-मेल द्वारे संपर्क साधा. पुढच्या प्रक्रियेमध्ये काही अडचणी आल्यास आमचा सल्लागार तुम्हाला मदत करेल
✓ हॅसल फ्री क्लेम सेटलमेंट करण्यासाठी, जरूर असलेली कागदपत्रे तयार ठेवा
✓ एकदा तुम्ही कागदपत्रे सूपूर्द केलीत व आम्ही ती पडताळून पाहिली की आम्ही तुम्हाला त्याच्या स्वीकृतीचा निर्णय कळवू
✓ आम्हाला अधिक माहितीची गरज असल्यास आम्ही त्याबाबत खुलासा मागणारे एक चौकशी पत्र तुम्हाला पाठवू
✓ जर तुमचा क्लेम स्वीकारण्यात आला, तर खात्री बाळगा की आम्ही इतर सर्व गोष्टींची काळजी घेऊ. आम्ही तुम्हाला वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्तीसोबत समन्वय साधून त्यांना एक भरपाईची हमी देणारे पत्र देऊ
✓ जर दुर्दैवाने तुमचा क्लेम फेटाळण्यात आला, तर तुम्हाला वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्तीच्या बिलांचा भरणा करावा लागेल
जर तुमच्या क्लेम वर प्रतिपूर्तीद्वारे प्रक्रिया केली जाणार असल्यास, त्यासाठी खालील स्टेप्स आहेत:
✓ हेल्थकेअर प्रोव्हायडर कडून तुमची वैद्यकीय डॉक्युमेंट्स सादर करून तुम्हाला आमच्यासोबत क्लेम दाखल करावा लागेल. यावर आमच्या समर्पित अंतर्गत हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम (HAT) द्वारे प्रक्रिया केली जाईल. त्यांच्याकडून त्यावर त्वरित प्रोसेस केली जाईल
✓ एकदा प्रक्रिया पूर्ण झाली की तुम्ही दिलेल्या माहितीनुसार व तुम्ही निवडलेल्या लाभांनुसार तुमचा क्लेम पडताळून पहाण्यात येईल, कागदपत्रांची सत्यता व इतर माहिती पडताळण्यात येईल
जर कागदपत्रे अपुरी वाटली:
तुमच्या केसप्रमाणे तुम्हाला अजून काही कागदपत्रे सुपूर्द करण्यास सांगण्यात येईल
✓ गरज असलेल्या कागदपत्रांचा तपशील तुम्हाला ई-मेल द्वारे कळवण्यात येईल
✓ एकदा तुम्ही ही अधिकची कागदपत्रे दिलीत की तुमच्या क्लेमची प्रक्रिया पुढे चालू करण्यात येईल. आम्हाला जर का ही कागदपत्रे मूळ पत्राच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत नाही मिळाली नाहीत, तर तुम्हाला एक स्मरणपत्र पाठवण्यात येईल. आम्ही तुम्हाला 3 स्मरणपत्रे पाठ्वू, ज्यानंतरही जर आम्हाला कागदपत्रे मिळाली नाहीत, तर तुमचा क्लेम अपुऱ्या माहितीसाठी म्हणून फेटाळण्यात येईल
✓ तुम्हाला तुमच्या क्लेमच्या मंजूरीची / नाकारल्याची सविस्तर माहिती सुद्धा ई-मेल द्वारे देण्यात येईल
जर तुमचा क्लेम फेटाळण्यात आला:
✓ तुमची क्लेमची याचिका व सुपूर्द केलेली कागदपत्रे पडताळून पाहिल्यावर, पॉलिसीमधील अटी व शर्तींनुसार, तुमचा क्लेम फेटाळलाही जाऊ शकतो
✓ अश्या परिस्थितीमध्ये, आमची कारणे समजावून सांगणारे, क्लेम अस्वीकार केल्याचे पत्र तुम्हाला मिळेल
जर तुमचा क्लेम स्वीकारण्यात आला:
✓ जर सर्व काही योग्य असेल, आणि तुमचा क्लेम हा पॉलिसीमध्ये दिलेल्या अटींनुसार असेल, तर आम्ही त्वरेने तुमच्या क्लेमची सेटलमेंट पूर्ण करण्यासाठी प्रक्रिया करतो. तुम्हाला क्लेमचे पैसे एनईएफटी (NEFT) द्वारे तुम्ही दिलेल्या माहितीनुसार थेट तुमच्या बॅंक खात्यात जमा होतील
येथे क्लिक करा तुमचा क्लेम ऑनलाईन रजिस्टर करण्यासाठी.
ट्रॅव्हल इन्श्युरन्स घेण्यासाठी जलद, सोपी व सुलभ प्रक्रिया.
खूप चांगली वेबसाईट. थोड्याच पायऱ्यांमधे सहजतेने पॉलिसी घेऊ शकता.
ट्रॅव्हल इन्श्युरन्स घेण्यासाठी जलद, सोपी व सुलभ प्रक्रिया.
बजाज आलियान्झ सोबत तुमच्या कुटुंबाला परदेशात असताना संरक्षण द्या!
कोटेशन मिळवा
ट्रॅव्हल कंपॅनियन हा सर्वात मूलभूत प्लॅन आहे जो तुम्ही परदेश प्रवास करत असल्यास घेणे आवश्यक आहे. तुम्ही परदेशात असताना या प्लॅनमुळे तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना वैद्यकीय खर्चाचे कव्हर मिळते.
या प्लॅनमधून पुढील गोष्टी मिळतात:
कव्हरेज | लाभ - युएस $ | |
वैद्यकीय उपचारांचा खर्च, इव्हॅक्युएशन, रिपॅट्रिएशन | 50000 | |
आपत्कालीन दातदुखी सुटका वरील (I) मध्ये समाविष्ट | 500 | |
सामान हरवणे (चेक्ड) नोंद: प्रत्येक बॅगेजमागे कमाल 50 % आणि बॅगेजमधील प्रत्येक वस्तूमागे 10 %. |
250** | |
बॅगेजला विलंब | 100 | |
वैयक्तिक अपघात विमेदार व्यक्ती18 वर्षे वयाखालील असल्यास विमा रकमेच्या फक्त 50% |
10,000*** | |
पासपोर्ट हरवणे | 150 | |
वैयक्तिक दायित्व | 2,000 | |
**प्रत्येक बॅगेमागे जास्तीत जास्त 50% व प्रत्येक वस्तूमागे जास्तीत जास्त 10% *** 18 वर्षांखालील इन्श्युअर्ड व्यक्तीचा मृत्यू झाल्यास सम ॲश्युअर्डच्या फक्त 50%% |
ट्रॅव्हल कंपॅनियन प्लॅनपेक्षा हा प्लॅन तुम्हाला जास्त व्यापक संरक्षण देतो. ट्रॅव्हल कंपॅनियन प्लॅनच्या सर्व लाभांव्यतिरिक्त, या प्लॅनमधून तुम्हाला चेक्ड बॅगेज, अपहरण, आपत्कालीन आगाऊ कॅश इत्यादींमुळे होणाऱ्या नुकसानीपासून सुद्धा कव्हर देतो.
कव्हरेज | लाभ - युएस $ | |
वैद्यकीय खर्च आणि सुटका आणि देश प्रत्यावर्तन | 50000 | |
आपत्कालीन दातदुखी सुटका वरील (I) मध्ये समाविष्ट | 500 | |
पर्सनल ॲक्सिडेंट नोंद: 18 वर्षांखालील इन्श्युअर्ड व्यक्तीचा मृत्यू झाल्यास सम ॲश्युअर्डच्या फक्त 50%% |
10,000** | |
एडीअँडडी कॉमन कॅरियर | 2,500 | |
चेक केलेल्या सामानाचा तोटा** टीप: प्रत्येक बॅगेमागे जास्तीत जास्त 50% व प्रत्येक वस्तूमागे जास्तीत जास्त 10%. |
250** | |
बॅगेजला विलंब | 100 | |
पासपोर्ट हरवणे | 250 | |
हायजॅक | $50 दर दिवशी ते जास्तीत जास्त $ 300 |
|
ट्रिप डिले | $ 20 प्रति 12 तास ते कमाल $ 120 |
|
वैयक्तिक दायित्व | 1,00,000 | |
इमर्जन्सी कॅश अॅडव्हान्स**** नोंद: कॅश अॅडव्हान्स्समध्ये डिलिव्हरी शुल्काचा समावेश असेल |
500 | |
गोल्फर होल-इन-वन | 250 | |
ट्रिप कॅन्सलेशन | 500 | |
होम बर्गलरी इन्श्युरन्स | ₹1, 00,000 | |
ट्रिप कर्टेलमेंट | 200 | |
हॉस्पिटलायझेशन डेली अलाऊंस | दर दिवशी $ 25 ते जास्तीत जास्त $ 100 | |
**प्रत्येक बॅगेमागे जास्तीत जास्त 50% व प्रत्येक वस्तूमागे जास्तीत जास्त 10% *** 18 वर्षांखालील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास इन्श्युरन्स काढल्याच्या रकमेच्या फक्त 50% **** आगाऊ रोख रकमेवर रक्कम पोहोचवण्याचा खर्च |
ट्रॅव्हल टाईम प्लॅन मध्ये सुद्धा ट्रॅव्हल एलिट प्लॅन सारखे कव्हर मिळते. पण या प्लॅनमध्ये कव्हरेजची रक्कम ही खूप जास्त असते.
या प्लॅनअंतर्गत, तुम्हाला पुष्कळ पॉलिसी उपलब्ध आहेत ज्यामधून तुम्ही तुमच्यासाठी योग्य पॉलिसी निवडू शकता यातील प्रत्येक पॉलिसी ही तुमच्या वैयक्तिक गरजेनुसार तयार करून दिली जाते.
तुम्ही 21 वर्षांचे असा अथवा 60 वर्षांचे, तुम्ही व्यावसायिक असा अथवा विद्यार्थी, तुमच्या गरजेनुसार अगदी योग्य असेल अशी पॉलिसी तुम्हाला मिळेल. सर्वसामान्य प्रवाशाच्या ज्या विविध गरजा असतात त्यासाठी आमच्याकडे सुयोग्य असा उपाय आहे.
ट्रॅव्हल टाईम प्लॅन हा, खाली दिल्याप्रमाणे तीन विशेष पर्यायांमध्ये मिळतो:
कव्हरेज | प्रमाणित 50000 युएसडी | रजत 1 लाख युएसडी | कपातयोग्य |
वैयक्तिक अपघात* | 10,000 यूएसडी | 10,000 यूएसडी | निरंक |
वैद्यकीय खर्च आणि सुटका | 50,000 यूएसडी | 100,000 यूएसडी | 100 यूएसडी |
दात दुखीवरील तातडीने केलेल्या उपचारांचा खर्च हा वैद्यकीय उपचाराचा खर्च व ईव्हॅक्युएशनच्या संरक्षणाच्या रकमेमध्ये समाविष्ट आहे | 500 यूएसडी | 500 यूएसडी | 100 यूएसडी |
रिपाटरिएशन | 5,000 यूएसडी | 5,000 यूएसडी | निरंक |
चेक केलेल्या सामानाचा तोटा** | 250 यूएसडी | 250 यूएसडी | निरंक |
अपघाती मृत्यू अथवा अपंगत्व (सार्वजनिक वाहनातून जाताना) (कॉमन कॅरियर) | 2,500 यूएसडी | 2,500 यूएसडी | निरंक |
पासपोर्ट हरवणे | 250 यूएसडी | 250 यूएसडी | 25 यूएसडी |
वैयक्तिक दायित्व | 100,000USD | 100,000USD | 100 यूएसडी |
हायजॅक कव्हर | दर दिवशी 50 युएसडी ते जास्तीत जास्त 300 युएसडी | दर दिवशी 50 युएसडी ते जास्तीत जास्त 300 युएसडी | निरंक |
ट्रिप डिले | दर 12 तासांना 20 युएसडी ते जास्तीत जास्त 120 युएसडी | दर 12 तासांना 20 युएसडी ते जास्तीत जास्त 120 युएसडी | 12 तास |
हॉस्पिटलायझेशन डेली अलाऊंस | दर दिवशी 25 युएसडी ते जास्तीत जस्त 100 युएसडी | दर दिवशी 25 युएसडी ते जास्तीत जस्त 100 युएसडी | निरंक |
गोल्फर्स होल-इन-वन | 250 यूएसडी | 250 यूएसडी | निरंक |
ट्रिप कॅन्सलेशन | 500 यूएसडी | 500 यूएसडी | निरंक |
ट्रिप कर्टेलमेंट | 200 यूएसडी | 200 यूएसडी | निरंक |
चेक्ड बॅगेजला विलंब | 100 यूएसडी | 100 यूएसडी | 12 तास |
होम बर्गलरी इन्श्युरन्स | ₹100,000 | ₹100,000 | निरंक |
इमर्जन्सी कॅश फायदा *** | 500 यूएसडी | 500 यूएसडी | निरंक |
* पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर हे फ्लोटर पद्धतीने मिळत नाही. क्लेम केला गेल्यास सम ॲश्युअर्ड ही पुढील प्रमाणे लागू होईल: • प्रस्तावकासाठी व मिळवत्या जोडीदारासाठी सम ॲश्युअर्डच्या 100 % • न मिळवत्या जोडीदारासाठी व इतर अधिक प्रौढ व्यक्तींसाठी सम ॲश्युअर्डच्या 50% • प्रत्येक मुलाला सम ॲश्युअर्डच्या 25 % ** प्रत्येक बॅगेमागे जास्तीत जास्त 50% व प्रत्येक वस्तूमागे जास्तीत जास्त 10% *** आगाऊ रोख रकमेवर रक्कम पोहोचवण्याचा खर्च |
फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी करण्यापूर्वी विचारात घेण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे येथे दिले आहेत:
✓ वैद्यकीय आणि हॉस्पिटलायझेशन खर्चासह पॉलिसी काय कव्हर करते हे समजून घ्या.
✓ ट्रिप रद्दीकरण आणि ट्रिप कालावधी कमी करणे यावरील कव्हरेज तपासा.
✓ पूर्व-विद्यमान स्थिती सारख्या वगळणुकींविषयी जाणून घ्या.
✓ लक्षात घ्या की स्वत: करून घेतलेली दुखापत आणि नॉन-ॲलोपॅथिक उपचार कव्हर केले जाऊ शकत नाहीत.
✓ पॉलिसी तुमच्या ट्रिपच्या संपूर्ण कालावधीला कव्हर करते याची खात्री करा.
✓ परवडणारे पर्याय शोधत असल्यास, सर्वोत्तम मूल्य शोधण्यासाठी विविध पॉलिसींची तुलना करा.
✓ हे तपशील रिव्ह्यू करणे अनपेक्षित खर्च टाळण्यास मदत करते आणि तुम्हाला तुमच्या फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स गुंतवणुकीमधून सर्वात जास्त लाभ मिळण्याची खात्री देते.
तुम्ही तुमच्या मुलांच्या अफ्रिकन सफारीवर जायच्या सततच्या तगाद्याला शरण गेला असाल किंवा तेथे जाण्याचा मनसुबा तुम्हीही आखला असेल, आम्हाला खात्री आहे की तुम्ही तुमच्या प्रवासातला ओरत्यक क्षण आनंदात घालवाल! पण कुटुंबासोबत प्रवास करण्याआधी पुष्कळ नियोजन करावे लागते.
तुम्ही जरी प्रवासात लागणारी प्रत्येक गोष्ट बरोबर घेतली असली तरीही, तुम्हाला नेहमी असेच वाटत राहते की अजून काही बरोबर घेऊ या, अगदीच गरज पडली तर! जशी की ती नवीन, चकचकीत सेल्फी स्टिक जी तुम्ही मागच्या आठवड्यात सुंदर दृश्य टिपण्यासाठी घेतली होतीत!
आणि मग तुमच्या लक्षात येते की स्वयंपाकघरातील एक सिंक सोडून सर्व काही बरोबर तर घेतले पण प्रवासात ते सर्व सामान ओढून तुमची मनगटे दुखायला लागतील. हो, आणि त्याशिवाय सामानाच्या वजनावर असलेल्या मर्यादा सुद्धा लक्षात ठेवाव्या लागतात! हुश्श! ठीक आहे, आता बघू, विमानाचे आरक्षण, हॉटेल्स... हं, सर्व केले. पण थांबा, फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्सचे काय?
परदेश प्रवास हा जोखीम रहित नाही. आंतरराष्ट्रीय ठिकाणांना जाताना विविध जोखीमींना / अडचणींना सामोरे जावे लागेल व फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुम्हाला यापासून कव्हर करतो. उशीरा येणारे सामान, शारिरीक दुखापती किंवा पासपोर्ट हरवणे ही फक्त तुम्हाला कशा कशाचा सामना करावा लागेल याची काही उदाहरणे आहेत. पण सुदैवाने फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुमचा यातून उद्भवणाऱ्या आर्थिक अडचणींपासून बचाव करतो.
तुम्ही आंतरराष्ट्रीय ठिकाणी असताना, एखादा स्कीईंग करताना झालेला अपघात अथवा सामान हरवणे अश्या प्रसंगांनी तुमची स्वप्नातील सुट्टी ही एक दुर्दैवी घटना होऊ शकते. फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स अश्या सर्व घटनांत तुमची काळजी घेतो
तेव्हा, तुमचे सीटबेल्ट बांधा आणि काळजी न करता तुमच्या प्रिय व्यक्तींबरोबर सुखद वेळ घालवण्यासाठी सहलीवर निघा!
बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी ही भारतातील ट्रॅव्हल इन्श्युरन्ससाठी एक विश्वसनीय नाव आहे, जी सर्वसमावेशक कव्हरेज आणि स्पर्धात्मक किंमतीसह प्लॅन्स ऑफर करते. प्रमुख लाभांमध्ये समाविष्ट आहे:
तुमची ट्रिप छोटी असो वा मोठी, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी तुमचे कुटुंब संरक्षित राहण्याची खात्री देते.
1) तुमच्या आवश्यकतांचे मूल्यांकन करा : तुमच्या ट्रिप तपशिलावर आधारित तुमच्या कुटुंबाच्या विशिष्ट ट्रॅव्हल इन्श्युरन्सच्या गरजा निर्धारित करा.
2) बजाज आलियान्झ पर्याय पाहा : बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीद्वारे ऑफर केलेले ट्रॅव्हल कम्पॅनियन, ट्रॅव्हल एलिट आणि ट्रॅव्हल प्राइम यासारखे प्लॅन्स रिव्ह्यू करा.
3) वेबसाईटला भेट द्या : बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी वेबसाईट वर जा.
4) कोटेशन मिळवा : त्वरित आणि अचूक कोटेशन प्राप्त करण्यासाठी तुमचा प्रवास तपशील एन्टर करा.
5) प्लॅन्सची तुलना करा : प्रत्येक प्लॅनचे कव्हरेज आणि लाभांचे मूल्यांकन करा.
6) सर्वोत्तम पर्याय निवडा : तुमच्या आवश्यकता सर्वोत्तमरित्या पूर्ण करणारा प्लॅन निवडा.
7) खरेदी पूर्ण करा : इन्श्युरन्स प्लॅन ऑनलाईन अंतिम करा आणि खरेदी करा.
8) बजेट-फ्रेंडली : आवश्यक कव्हरेजचा त्याग न करता परवडणारा प्लॅन शोधा.
जेव्हा तुमच्या कुटुंबासाठी एखादी गोष्ट निवडायची असते, तेव्हा तुम्ही सर्वोत्तम गोष्टीचीच निवड करता. फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स काही वेगळे नाही! अनेक वर्षांपासून, आम्ही ट्रॅव्हल इन्श्युरन्स बाबतच्या तुमच्या अत्यंत महत्वाच्या गरजा समजत आलेलो आहोत. आणि त्या गरजा लक्षांत ठेवून आम्ही ग्राहकांसाठी कस्टमाईज्ड फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन्स बनवलेे आहेत.
सीएनबीसीने इन्श्युरन्स कंपनी विभागातील, ट्रॅव्हल इन्श्युरन्स कंपनीचा सर्वोत्तम प्रतिष्ठित पुरस्कार देऊन आमचा गौरव केला आहे. आमच्या फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅनची काही खास वैशिष्ट्ये आणि तुम्हाला होणारे लाभ:
✓ ग्राहकांसाठी जगभरांत कुठेही 24X7 टोल फ्री सहाय्य सेवा.
✓ विम्याच्या क्लेमची सेटलमेंट सहज व जलद रितीने पूर्ण.
✓ ईमरजन्सी कॅश वैशिष्ट्यामुळे तुम्हाला जगभरांत कुठेही रोख रक्कम मिळू शकते.
✓ प्रवासात जर तुमचे सामान हरवले,पासपोर्ट हरवला किंवा आकस्मिक इतर खर्च झाले तर आम्ही तातडीने मदत करतो.
✓ तुम्हाला अथवा तुमच्या कुटुंबातील कोण्या व्यक्तीला शारिरीक इजा झाल्यास हॉस्पिटलचा खर्च.
✓ विमान उड्डाण रद्द होणे अथवा प्रवास अर्धवट सोडावा लागणे यापासून संरक्षण.
✓ चोरीपासून संरक्षण.
✓ क्लेमची प्रक्रिया करणाऱ्या भागीदारांचे अनेक देशांमधील आंतरराष्ट्रीय नेटवर्क.
✓ कॅसलेस उपचाराची सोय.
फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी करणे पैशानुसार योग्य आहे का निश्चितच. याचा विचार करा: केवळ रु. 1400 च्या प्रीमियम मध्ये, तुम्ही यूके मध्ये 15 दिवसांच्या ट्रिपसाठी तुमच्या कुटुंबासाठी यूएस $50,000 किमतीचे कव्हरेज मिळवू शकता.
पारितोषिके व पुरस्कार
आम्हाला सीएनबीसी (CNBC)चा 2010, 2011 व 2014 सालचा बेस्ट ट्रॅव्हल इन्श्युरन्स कंपनी अवॉर्ड मिळाला. तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. त्यामुळे आम्हाला तुमच्या अपेक्षांपेक्षाही अधिक चांगले काम करण्याची स्फूर्ती मिळते!
सुरक्षित कौटुंबिक सुट्टीचे प्लॅनिंग विचारपूर्वक तयारीने सुरू होते. अखेरच्या मिनिटाला त्रास टाळण्यासाठी तिकीट आणि निवास बुक करून अगोदरच सुरू करा. आवश्यक गोष्टींवर लक्ष केंद्रित करून आणि सामान आटोपशीर ठेवण्यासाठी अनावश्यक वस्तू सोडून हुशारीने पॅक करा. बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स सारख्या सर्वसमावेशक फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्समध्ये गुंतवणूक करून तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेला प्राधान्य द्या, जो वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, ट्रिप रद्दीकरण आणि बऱ्याच गोष्टींसाठी कव्हरेज प्रदान करतो. तुमच्या गंतव्य ठिकाणावर संशोधन करून, स्थानिक रिवाज समजून घेऊन आणि आपत्कालीन संपर्क नंबर लक्षात घेऊन माहिती मिळवा. या सक्रिय उपायांसह, तुम्ही चिंता-मुक्त, स्मरणीय सुट्टीचा आनंद घेऊ शकता, हे जाणून की तुमचे कुटुंब अनपेक्षित परिस्थितीपासून संरक्षित आहे.
रिन्यूवल रिमाइंडर सेट करा
तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.
(5,340 रिव्ह्यूज व रेटिंगवर आधारित)
मदनमोहन गोविंदाराजुलु
अगदी सरळ ऑनलाईन ट्रॅव्हल इन्श्युरन्स कोटेशन आणि किंमत. पेमेंट करणे आणि खरेदी करणे सोपे आहे
पायल नायक
खूपच यूजर फ्रेंडली व सुविधाजनक. बजाज आलियान्झ टीम, खूप आभार.
किंजल बोघारा
ट्रॅव्हल इन्श्युरन्सच्या परवडणार्या प्रीमियमसह खूप चांगल्या सर्व्हिसेस
बजेट-सजग प्रवाशांसाठी, आदर्श फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन असा आहे जो परवडणाऱ्या किंमतीत आवश्यक कव्हरेज प्रदान करतो. वैद्यकीय आपत्कालीन कव्हरेज, चेक-इन सामान हरवणे आणि वैयक्तिक दायित्व संरक्षण यासारखे प्रमुख लाभ ऑफर करणारे प्लॅन्स शोधा, जे तुमच्या प्रवासादरम्यान मनःशांती सुनिश्चित करतात. बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीद्वारे ऑफर केलेले असे प्लॅन्स गुणवत्तेशी तडजोड न करता किफायतशीर फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स शोधणाऱ्या कुटुंबांसाठी परिपूर्ण आहेत.
जगभरातील फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स निवडताना, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, स्थलांतर, ट्रिप रद्दीकरण आणि चेक-इन सामान हरवणे यासारख्या प्लॅन्सला प्राधान्य द्या.
परवडणारा जगभरातील फॅमिली ट्रॅव्हल इन्श्युरन्स शोधण्यासाठी, विविध प्लॅन्सच्या वैशिष्ट्यांची तुलना करा. बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी वैद्यकीय कव्हरेज आणि सामान संरक्षण यासारख्या आवश्यक लाभांसह बजेट-फ्रेंडली पर्याय ऑफर करते, जास्त खर्च न करता विश्वसनीय कव्हरेज सुनिश्चित करते.
बजाज अलायंझ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.
कॉलबॅकची विनंती
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
पडताळणी कोड
आम्ही तुमच्या मोबाईल नंबरवर व्हेरिफिकेशन कोड पाठविला आहे
00.00
कोड प्राप्त झाला नाही? पुन्हा पाठवा
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा